मेंढपाळांनी मुलांच्या शिक्षणावर भर द्यावा – संजय वाघमोडे

मेंढपाळांनी मुलांच्या शिक्षणावर भर द्यावा – संजय वाघमोडे
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 16 जानेवारी 2025 :
डोनोली मेंढपाळानी आपल्या मुलांच्या शिक्षणावर जास्तीत जास्त लक्ष द्यावे जी मुलं शिकत आहेत त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. आणि शिक्षणाची आवड नसलेल्या मुलास मात्र इतर व्यवसायात न घालता आपल्या पारंपरिक मेंढीपालन व्यावसायात घालावे. परंतु तोही आधुनिक पध्दतीने करावा.असे प्रतिपादन यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य मेंढपाळ विकास समितीचे सदस्य संजय वाघमोडे यांनी केले. ते डोनोली (ता. शाहुवाडी) येथे यशवंत क्रांती संघटनेच्या शाखा नामफलक अनावरण निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेंढपाळ मेळाव्यात बोलत होते. यावेळी डॉ. सावंत, प्रदिप जानकर, सुभाष वगरे, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रितेश शिंदे, डॉ. सावंत जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे, संघटक पिंटू गावडे सचिन लांडगे, अतुल धनगर डोणोली गावचे सरपंच, इत्यादी उपस्थित होते.
संजय वाघमोडे बोलताना पुढे म्हणाले की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. भविष्यात स्पर्धेत टिकून रहायचे असेल तर शिक्षण हे गरजेचे आहे. जी मुलं चांगल्या पद्धतीने शिकण घेत आहेत. त्यांना शिकवुया जर एखाद्याची आर्थिक परिस्थिती गरिबीची असेल परंतु शिकण्याची जिद्द असेल तर आपण सर्वजण मिळून त्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्याला आयपीएस किंवा आयएएस करूया. परंतु ज्या मुलांना शिक्षणात रुची नाही किंवा शिक्षणाबाबत आवड नाही अशा मुलांना मात्र इतर व्यवसाय घालण्यापेक्षा आपल्या शेळ्या मेंढ्या पालन याच व्यवसायात घालावे. भविष्यात आधुनिक पद्धतीने मेंढी पालन व्यवसाय केल्यास चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते.
मेंढपाळांना मार्गदर्शन करताना डॉ. सावंत म्हणाले की शेळी मेंढ्याचे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी शेळ्या मेंढ्यांची वाढ निकोप होणे गरजेचे आहे. त्यासाठी चांगल्या प्रकारचे खाद्य घालून मेंढ्यांची प्रजनन क्षमता कशा पद्धतीने वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच कोकरांची वाढ निकोप व निरोगी व्हायचे असेल तर आपल्या कळपात असणारा नर मेंढा हा दर तीन वर्षांनी बदलणे गरजेचे आहे. याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. एखादा आजार आल्यास परस्पर विचारून औषध उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषध उपचार करावा.
यशवंत क्रांती संघटनेची अडचणीत मदत मेंढपाळांना व समाजबांधवांना होत असल्याने संघटनेविषयी समाजात आपुलकी निर्माण होऊन गावागावातील समाज आपापसातील मतभेद विसरून यशवंत क्रांती संघटनेमुळे एकत्र येत आहे. ही एकजूट कायम ठेवली तर सरकारवर दबाव निर्माण करून आपल्या मागण्या मान्य करून घेऊन विकास साधता येईल असे सुभाष वगैरे यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले प्रदीप जानकारी यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. भीमराव दादू जानकर शाखा संपर्कप्रमुख, कृष्णात युवराज जानकर अध्यक्ष, सागर मधुकर जानकर उपाध्यक्ष, मायाप्पा बापू शिरसाट सेक्रेटरी, शामराव जानकर खजिनदार, प्रकाश जानकर, महादेव जानकर, सर्जेराव जानकर, काशिनाथ जानकर, सर्जेराव शा. जानकर, (चेअरमन) शुभम जानकर, निलेश जानकर, समाधान जानकर, अनिल जानकर, रोहित शिसाळ, (चरण) आशिष शिसाळ (पैलवान) बाजीराव संदीप शिसाळ, भगवान शिसाळ, पोपट नागावकर (आवळी) महिपती बंडगर बांबवडे, करण बंडगर, यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. कार्यक्रमास अशोक मुंडळे, वसंत वगरे, तानाजी लांडगे, दत्ताजी लांडगे, प्रताप वाघमोडे , रायशिंग शिसाळ शाखा प्रमुख राजेंद्र शिसाळ शाखा अध्यक्ष पार्थ शिसाळ उपाध्यक्ष सुनील शिद ओंकार शिसाळ काशिनाथ शिसाळ संदीप (रवी )शिसाळ उत्तम जानकर संदीप जानकर दिनकर जानकर, तसेच बांबवडे, सोनवडे, चरण, शिवारे, तसेच परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.