क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

⭕अकलूजच्या अंबादास ओरसे द्वारे नाशिकच्या वकिलाची रु.दहा लाखाची फसवणूक 🟣नाशिक शहर सरकार वाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल.

⭕अकलूजच्या अंबादास ओरसे द्वारे नाशिकच्या वकिलाची रु.दहा लाखाची फसवणूक

🟣नाशिक शहर सरकार वाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल.

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 25/8/2023 : येथील अंबादास सायबु ओरसे (रा. प्रतापसिंह नगर इंदापूर रोड अकलूज) यांनी आपली दहा लाख रुपयाची आर्थिक फसवणूक केली असल्याची फिर्याद ॲड. विकास पंढरीनाथ थोरात राहणार नाशिक यांनी नाशिक शहर सरकार वाडा पोलीस ठाणे येथे आज दि.25/8/2023 रोजी दुपारी दाखल केली. भारतीय दंड संहिता 1860 चे, कलम 420, 504, 506 अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर 239 /2023. फिर्याद नोंद झाली आहे.
दोन कोटी रुपये प्रतिमहा एक टक्का व्याज दराने देतो असे सांगून अंबादास सायबु ओरसे यांनी फिर्यादी ॲड. विकास पंढरीनाथ थोरात यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी कडून आगाऊ तीन महिन्याचे एक टक्का व्याज दराने व्याज म्हणून सहा लाख रुपये व टीडीएस म्हणून चार लाख रुपये असे एकूण दहा लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यात स्वीकारले व फिर्यादीला कोणत्याही प्रकारचे कर्ज न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली म्हणून नाशिक शहर सरकार वाडा पोलीस ठाणे येथे अंबादास ओरसे यांच्या विरोधात रजिस्टरला गुन्हा दाखल झाला आहे. पीएसआय पी‌.बी. पाटील पुढील तपास करीत आहेत.
या संदर्भात फिर्यादी ॲड. विकास पंढरीनाथ थोरात यांनी नाशिक येथून भ्रमणध्वनी वरून अकलूज वैभव बरोबर संपर्क साधून सविस्तर माहिती कथन केली. यासंदर्भात सविस्तर माहिती सांगताना ॲड. विकास थोरात म्हणाले की,”मी नाशिक येथे वकिलीचा व्यवसाय करीत असल्याने त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर माझे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. संतोष शिवराम गाडे (राहणार त्रंबक रोड, आंबेडकर चौक, राजवाडा, पिंपळगाव बहुला, सातपूर, नाशिक यांना मी ओळखतो. संतोष गाडे मार्फतीने माझी ओळख त्याचा मित्र विष्णू कारभारी चेधरी (राहणार साकोरी तालुका राहता, जिल्हा अहमदनगर) याचे सोबत झाली होती. माझ्या वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी मला पैशाची आवश्यकता असल्याचे मी संतोषला सांगितले होते म्हणून संतोषने मला त्याचा व विष्णूच्या ओळखीचा अंबादास सायबू ओरसे (राहणार प्रतापसिंह नगर, इंदापूर रोड, अकलूज. तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) नावाचा एक मित्र असल्याचे सांगून तो व्याजाने पैसे देतो असे सांगितले होते. त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये मी, संतोष व विष्णू असे तिघेजण अंबादास ओरसे यास भेटण्यासाठी अकलूजला त्याचे राहते घरी गेलो होतो. त्यावेळी अंबादास याने मला तो दोन कोटी रुपये प्रतिमहा एक टक्का व्याज दराने कर्ज स्वरूपात देत असल्याचे सांगून, त्याने मला सुरक्षिततेच्या दृष्टीने तीन महिन्याचे आगाऊ व्याज रुपये सहा लाख मागितले होते. त्याचे वर मी विश्वास ठेवून माझे नातेवाईक व मित्रमंडळी यांचे कडून उसनवार पैसे घेऊन आयसीआयसीआय बँक शाखा शरणपूर रोड, नाशिकचे माझे खाते क्रमांक 002701597239 यावरून आय एम पी एस द्वारे दिनांक 8/2/2023 व दिनांक 9/ 2/ 2023 रोजी असे एकूण सहा लाख रुपये अंबादास ओरसे याचे आयडीएफसी बँक शाखा अकलूज चे खाते क्रमांक 10114119980 यावर जमा केले. त्यानंतर ओरसे यांनी मला संपर्क साधून असे सांगितले की, “मी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करतो परंतु मला त्यास टीडीएस लागतो” असे सांगून दोन कोटी रुपये पाठवायचे असतील तर मला चार लाख रुपये टीडीएस लागणार असल्याचे सांगून सदर रक्कम मागितली. म्हणून मी पुन्हा 16/2/2023 रोजी माझे खाते वरून ओरसे याच्या याचे अकलूज येथील आयडीएफसी बँकेचे खात्यावर चार लाख रुपये जमा केले. असे एकूण दहा लाख रुपये अंबादास ओरसे याचे खात्यावर जमा केले. त्यांने मला दोन दिवसात दोन कोटी रुपये माझ्या खात्यात जमा होतील असे सांगितले. परंतु दोन दिवस उलटून गेल्यावरही माझे खात्यात रक्कम जमा झाली नाही. म्हणून मी त्यास संपर्क साधला असता तो मला उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर मी वेळोवेळी संपर्क साधून मला दोन कोटी रुपये द्यायचे नसतील तर राहू दे. पण माझे दहा लाख रुपये तरी परत कर. असे सांगितले असता तो मला माझे वर जातीवाचक गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊ लागला. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागला. अशा मजकुराची तक्रार दाखल केल्याचे ॲड. थोरात यांनी सांगितले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.