ताज्या घडामोडी

मनाची शुद्धता

मनाची शुद्धता

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 28/12/2025 :
अहंकार माणसाला संपवतो. न कळत अहंकारी माणूस इतरांपासून दुरावतो. कोणाला तो मनातून आवडत नाही तर कोणी उघडपणे व्यक्त होतात. कर्तव्यशून्य अहंकारी माणसे जास्त काळ कोणी सहन करत नाहीत.
योग्य वेळीच कोणीतरी जागे करणे, कोणी गुरू भेटणे महत्वाचे असते. जेणेकरून ती व्यक्ती जरा माणसात येते. व्यवहाराने वागायला व बोलायला शिकते. त्यांच्या सभोवतालचे लोक पण त्यामुळे समाधानी होतात.
माणसाने अहंकार करूच नये. कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नसते. परिस्थितीत चढउतार चालू असतात. त्यामुळे गर्व कशाचा करायचा? काय घेऊन आलो? काय घेऊन जाणार आहे?
आजचा संकल्प
कोणाला चार हिताच्या गोष्टी सांगता आल्या तर त्या नम्रपणे सांगू, कोणाला मदत करता आली तर निरपेक्षपणे करु व त्यागच करायचा असेल तर तो अहंकाराचा करू अन् जीवनाचा आनंद लुटू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button