अस्थिरतेचा पॅटर्न.. प्रकाश आंबेडकर…
अस्थिरतेचा पॅटर्न.. प्रकाश आंबेडकर..
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/04/2024 :
ॲड.प्रकाश आंबेडकरांचे राजकारण कायम धरसोडीचे, कोणतीही भरीव गोष्ट किंवा मजबूत चळवळ उभी राहू न देण्याचे आहे. एकप्रकारे त्यांचा कल काहीतरी सोल्युशन देणारे निर्माणात्मक राजकारण करण्याऐवजी आहे ते विस्कटून टाकणारे विध्वंसक राजकारण करण्यावर आहे असे दिसते. जेथे काही होताना दिसते त्या ठिकाणी खोड़ा घालायचा, कोणालाही टिकू द्यायचे नाही आशा वृत्तीने ते राजकारण करतात.
एड. प्रकाश आंबेडकरांसोबत सुरुवातीच्या काळात व त्यानंतरच्या विविध टप्प्यात नीलम गोऱ्हे, निळू फुले, राम नगरकर, शांताराम पंदेरे, माधवराव नाईक (हिंगोली), हरिभाऊ शेळके (नांदेड), माधवराव पिसाळ (पूर्णा), अनंत पाटील (मंगरूळ पीर), लिंबाजी गाभणे (शिरपूर), डॉ. ज्ञानेश्वर शेवाळे (गणेशपूर), मखराम पवार, रामदास बोडके, सुखदेवराव जाधव, प्रसेनजीत पाटील, हनुमंतराव उपरे, डॉ. सुभाष राठोड, डॉ. सुभाष पटनाईक (प्राचार्य अकोला) ही वेगवेगळ्या जातीतीत नेतेमंडळी सोबत होती. यापैकी एकालाही प्रकाश आंबेडकरांनी मोठे होऊ दिले नाही.
यापैकी अनेकांनी निवडणुकीत लक्षणीय मते मिळवूनही त्यांना दुसऱ्यांदा तिकीट दिले नाही.मखराम पवार यांना अपमानित करून राजीनामा देण्यास भाग पाडले. भाजपचे प्रमोद महाजन यांना विजयी करण्यासाठी नीलम गोऱ्हे हिला उभे करण्यात आले ही बाब जेंव्हा तिच्या लक्षात आली तेव्हा नीलम गोऱ्हेनी प्रकाश आंबेडकरांचा पक्ष सोडला.
महादेव राठोड मंगरुळपीरहून १९९९ मध्ये भारिपकडून उभे होते आणि केवळ १३०० मतांनी पडले. डॉ. गाभणे २००० मतांच्या फरकाने पडले. यांना प्रकाश आंबेडकरांनी दुसऱ्यांदा तिकीट दिली नाही. प्रा. हनुमंतराव उपरे १० वर्षे भारिपचे अध्यक्ष होते. त्यानाही प्रकाश आंबेडकरांनी हाकलून लावले. बौद्धांपैकी राजा ढाले, अविनाश महतेकर,अर्जुन डांगळे, प्रा.रणजीत मेश्राम ( नागपूर ) सुरेश गायकवाड ( नांदेड), बाबुराव पोटभरे (बीड) चंद्रकांत हंडोरे (मुंबई) प्रा.अविनाश डोळस,एड.वैशाली चांदणे (पुणे),उज्वला जाधव, भीमराव केराम,एल.के.मडावी अशा कितीतरी नेत्या/कार्यकर्त्यांच्या राजकीय करिअरची प्रकाश आंबेडकरांनी अक्षरशः माती केली आहे.
वंजारा, बारी, आदिवासी, हटकर, धनगर, कुणबी, मराठा, मातंग अशा कितीतरी जातीतील दमदार नेते/कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर यांनी वेगवेगळ्या निवडणुकीत दिलेल्या वेगवेगळ्या घोषणांकडे आकर्षित झाले. त्यांना एकदा निवडणुकीत उभे केले गेले. या उमेदवारांनी बऱ्यापैकी मते घेतली.त्यांचा आपण ‘निवडणूक जिंकू शकतो’ असा जेव्हा आत्मविश्वास वाढला त्यावेळी त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले किंवा तिकीट नाकारण्यात आले.
प्रत्येक निवडणुकीत पक्ष-आघाडीचे नवीन नाव घ्यायचे,नवी घोषणा द्यायची, नवीन लोकांना आकर्षित करायचे. यानुसार आपला उमेदवार किती मतं घेऊ शकतो, हे जोखायचं आणि दुसऱ्यांदा त्याच्या मतांवरून सौदा करायचा असा पॅटर्न प्रकाश आंबेडकर प्रत्येक निवडणुकीत अवलंबितात.
२०१९ मध्ये त्यानी भारिपच्या जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना अडगळीत टाकुन रा.स्व. संघाचा कट्टर कार्यकर्ता, मनोहर भिडेचा विश्वासू सेवक गोपीचंद पडळकर यांस प्रकाश आंबेडकरानंतरचा वंचित आघाडीचा मुख्य चेहरा म्हणून पुढे केला.त्याला लोकसभेत लक्षणीय मते मिळाली त्यानंतर तो भाजप मध्ये प्रवेश करून आमदार झाला.
२०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडी कडून लोकसभा तसेच विधानसभा निवडणुक लढविणारे बहुतेक सर्व लोक आता अन्य पक्षात निघून गेले आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या आधी ‘सर्वांना सोबत घेऊ, सत्ताधारी बनू ‘भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची’ ‘माझा पक्ष, सत्ताधारी पक्ष’ मी लाचारी पत्करणार नाही, स्वाभिमान अशा काहीतरी नावाने जुनेच प्रयोग नव्या नावानिशी करायचे व निवडणूक संपली की जुने सहकारी, नेते,कार्यकर्ते यांना वाऱ्यावर सोडून द्यायचे.आंबेडकरी राजकारण वाऱ्यावर सोडून द्यायचे ही एड. प्रकाश आंबेडकरांची कार्यपद्धती आहे. ही कार्यपद्धती दलित/बौद्ध/वंचित यांच्या हितांपेक्षा ब्राह्मणी राजकारणाचे हित जपणारी आहे असे खेदाने म्हणावे लागते. त्यांच्या या धरसोड वृत्तिमुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकित त्याना जेवढी मते मिऴाली ती केवळ तीन महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत निम्म्यावर आली होती.
मागील ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यानी कधीही कोणताही मुद्दा सातत्याने लावून धरलेला नाही. पक्षाचे संघटन उभे केले नाही. दुय्यम फळीतिल नेतृत्व उभे रहू दिले नाही. त्यांचा पक्ष म्हणजे त्यांचे एकखांबी कौटुंबिक अफेयर आहे. यामुळेच येत्या लोकसभा निवडणुकीनंतर एड. प्रकाश आंबेडकरांचे राजकारण संपलेले असेल.
- Sunil Khobragade यांच्या वॉलवरुन .