सद्दाम अल्ताफ तांबोळी आत्महत्या प्रकरणी उलट सुलट चर्चा

सद्दाम अल्ताफ तांबोळी आत्महत्या प्रकरणी उलट सुलट चर्चा
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
अकलूज दिनांक 18/04/2024 :
बागवान गल्ली अकलूज, (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील रहिवासी युवक सद्दाम अल्ताफ तांबोळी (अंदाजे वय 22 वर्षे) यांने दिनांक 18/4/2024 रोजी पहाटेच्या सुमारास टाऊनशिप परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोस्टमार्टम झाले. तथापी “या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्यांवर रीतसर कारवाई करा तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही” अशी भूमिका मयताच्या नातेवाईकांनी घेतल्याने या प्रकरणी उलट सुलट चर्चा सुरू आहे. मयत सद्दाम तांबोळी हा ड्रायव्हिंग चा व्यवसाय करीत असे. त्याचबरोबर व्यवसायासाठी खाजगीत घेतलेल्या कर्जाऊ पैशाच्या देवाण-घेवाणीतून की भिशीच्या व्यवहारातून आत्महत्या केली याचा तपास होईलच.