किरकोळ कारणावरून अकलूजात एकाचा खून, आरोपींना अटक

किरकोळ कारणावरून अकलूजात एकाचा खून, आरोपींना अटक
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 07/04/2024 :
महिलेस शिवीगाळ करणाऱ्याला आठ जणांनी मिळून कुऱ्हाड, कोयता व काठ्यांनी डोक्यात मारहाण करीत गंभीर जखमी केले असुन उपचारापुर्वीच त्याच्या मृत्यु झाल्याने मयताच्या बहिणीने अकलुज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरुन पोलीसांनी आठजणां विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन सहाजणांना अटक केली तर दोघे विधी संघर्ष बालक असल्याने त्यांच्या पालकांना समज पत्र दिले आहे.
याबाबत अकलुज पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकलूजमधील राऊतनगर येथील रिक्षा चालक विक्रम जगदीश चौगुले वय ३५ याचे हरीदास वाघमोडे याच्याशी टॅक्टरला रिक्षाचा कट लागल्याच्या कारणावरुन भांडण झाले होते. यावेळी विक्रम चौगुले याने हरीदास वाघमोडेस मारहाण केली होती त्यामुळे हरीदास वाघमोडे याने विक्रम चौगुले विरुध्द अकलूज पोलीस ठाणेत तक्रार दिल्यावरुन गुन्हा दाखल झाला होता व त्याबाबत पोलीसांकडून कारवाई झाली आहे. त्यावेळी हरीदास वाघमोडे यास विक्रम चौगुले याचे नांव माहिती नव्हते.प्रियंका अनिल गायकवाड हिने त्याचे नांव हरीदास वाघमोडेला सांगितल्या त्याचा राग विक्रम चैगुले याचे मनात होता. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विक्रम चौगुले याने प्रियंका गायकवाड यांना माझे नांव हरीदास वाघमोडे यास का सांगितले या कारणावरुन शिवीगाळ केली. त्यानंतर रात्री ९ वा. च्या सुमारास विक्रम चौगुले हा त्याचे मुलीसह बहिण स्वाती अनिल चव्हाण यांचे घरी जेवन करत असताना अभिजीत संजय भोसले, अमित अनिल गायकवाड, आदित्य गोपीनाथ भोसले, संजय शंकर भोसले, अमित गोपीनाथ भोसले, बापु तोंडस, रवि कीर्ते, सनी किर्ते सर्व रा.जुना सराटी रोड राऊतनगर यांनी घरात घुसून जेवण करत असलेल्या विक्रम चौगुलेस तुला खलास करतो असे म्हणत कु-हाड,कोयता,काठयांनी डोक्यात मारहाण केली. त्या वेळी त्याची बहिण,मुलगी,भाची यांनी आरडाओरड केला असता विक्रम चौगुलेचा मेव्हुणा,बहिणीचा दिर, शेजारी राहणारा ईश्वर भोसले हे पळत आल्यानंतर मारहाण करणारे लोक दमदाटी करुन निघून गेले त्यावेळी विक्रम चैगुले हा गंभीर जखमी झाल्याने त्यास नातेवाईकांनी उपचारासाठी अकलाई हाॅस्पीटल येथे दाखल केले परंतु डाॅक्टरांनी तो उपचारापुर्वीच मयत झाल्याचे घोषीत केले.सदर घटनेची माहिती अकलूज पोलीसांना मिळताच अकलुज पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे,पोसई सुधीर खारगे,दिलीप शिंदे,बबन साळुंके,पोहेकाॅ श्रीकांत निकम,सुहास क्षिरसागर,विक्रम घाटगे,शिवकुमार मदभावी,सोमनाथ माने,प्रविण हिंगणगावकर,शहर चौकीचे पोलीस अंमलदार दिलीप जाधव,विशाल घाटगे,विशाल पोरे,प्रविण काळे,अमोल पवार यांनी घटनास्थळी धाव घेवुन सदर घटनेबाबत विक्रम चौगुले याची बहिण स्वाती अनिल चव्हाण यांनी अकलूज पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरुन आठजणा विरुद्ध भा.द.वि.सं.क. ३०२,१४३,१४७,१४८,१४९,४५२,३२३ ५०६,४२७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन गुन्हयातील सर्व आरोपींचा रात्रीत शोध घेऊन अटक करण्यात आली.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे करत आहेत.