ताज्या घडामोडी

“आधुनिक तंत्रज्ञान वातावरणातील आधुनिक पिढी ही बलशाली भारताचे प्रमुख आधारस्थान” : ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत ल.नायकुडे

“आधुनिक तंत्रज्ञान वातावरणातील आधुनिक पिढी ही बलशाली भारताचे प्रमुख आधारस्थान” : ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत ल. नायकुडे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 07/04/2024 :
येथील शासनमान्य भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट या संस्थेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने इंग्रजी आणि मराठी या विषयांच्या घेण्यात येणाऱ्या कॉम्प्युटर टायपिंग कौशल्य चाचणी परीक्षेच्या आधारावर भक्ती संस्थेमध्ये कॉम्प्युटरवर या विषयांचा कौशल्य चाचणी चा सराव उपलब्ध करून देत असलेल्या सुविधाचे उद्घाटन अकलूज येथील ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक, एन.यू.बी.सी. अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोगाचे महाराष्ट्र राज्य संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांचे शुभहस्ते करण्यात आले.


याप्रसंगी उद्घाटक नायकुडे हे बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएट तथा पोस्ट ग्रॅज्युएट होण्यापूर्वीच विविध व्यवसायाभिमुख, तंत्रशुद्ध अभ्यासक्रम परिपूर्ण केले तर विविध शासकीय-निमशासकीय, विविध महामंडळे आदी स्तरावरील विविध खात्यांमध्ये ज्यावेळेस लिपिक (क्लार्क) तथा विविध पदांवरील भरती निघते त्यावेळेस असे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र हातात असेल तर असे नोकरी इच्छुक उमेदवार वेळीच त्या स्पर्धा परीक्षांना पात्र ठरू शकतात.
भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज या शासनमान्य संस्थेच्या माध्यमातून मराठी, इंग्रजी व हिंदी या विषयांतील 30, 40, 50, 60 शब्द प्रति मिनिट स्पीड विषयासाठी प्रवेश घेऊन उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी आज शासकीय, निमशासकीय, महामंडळे आदी विभागात सेवा बजावत आहेत हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या जडणघडणीत भक्ती कॉम्प्युटर टायपिंग अत्यंत मोलाचा वाटा आहे हे विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत आपले भवितव्य घडवणारी युवा पिढी ही बलशाली भारताचे प्रमुख आधारस्थान आहे. विविध कार्यक्षेत्रात ही युवा पिढी विविध आव्हाने स्वीकारत व ती लिलया पेलत आज भारत देशाचे नाव जागतिक स्तरावर नावारूपास आणत आहे व आपल्या कार्याचा ठसा देखिल उमटवत आहे. आजच्या संगणक युगात अकलूज येथील प्रसिद्ध असलेल्या भक्ती संस्थेने संगणक टायपिंगचे योग्य व तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन कुशल आणि गतिशील संगणक टायपिस्ट (टंकलेखक) घडवत यातून नोकरीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असून तसेच त्या त्या कार्यक्षेत्रातील तथा व्यक्तिगत स्वरूपातील कामकाज गतिमान होते आहे.
त्या अनुशंघानेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कॉम्प्युटर टायपिंग कौशल्य चाचणीत अधिकाधिक विद्यार्थ्यांना यश मिळावे या दृष्टीने विशेष अशा कौशल्य चाचणी सरावाचे या उद्घाटनाच्या निमित्ताने अकलूज व अकलूज परिसरातील विद्यार्थ्यांना भक्ती संस्थेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इंग्रजी व मराठी विषयांची संगणक टायपिंग कौशल्य चाचणी परीक्षेसाठी ही सरावाची संधी उपलब्ध करून दिल्याने शासकीय, निमशासकीय संस्थांमध्ये विविध पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. भक्ती संस्थेचे 29 वर्षापासूनचे त्यादृष्टीने चाललेले हे अविरत प्रयत्न व वाटचाल निश्चितच प्रशंसनीय आहे असे मत नायकुडे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी विविध शासनस्तरावरील क्लार्क तथा विविध पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग नोंदवत या परीक्षा देणार असलेल्या ऋषिकेश काटकर, सुरज लोंढे, श्रीमंत बर्वे, अनिकेत भोसले, ऋतूज कवडे देशमुख, तनवीर शेख, रणजीत शेजाळ, ज्योती तरंगे, साजिया तांबोळी, दिपाली जाधव, स्मिता गवसणे, सुप्रिया बोरकर, बाई बोडरे यांना उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.


याप्रसंगी पत्रकारितेतील अनेक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय सल्लागार समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्याचबरोबर “राष्ट्रीय पीछडा आयोग” या आयोगावर महाराष्ट्र राज्य संपर्क व प्रसिद्धीप्रमुख प्रमुख या पदावर नियुक्त झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत नायकुडे यांचा संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ यांनी केले, तर आभार ज्ञानदीप जवंजाळ यांनी मानले.


याप्रसंगी “वृत्त एकसत्ता” या पक्षिकाचे कार्यकारी संपादक विलासनंद गायकवाड तसेच संस्थेतील ज्ञानेश कटके, कुमार डोंगरे, अतुल भिताडे, योगेश मोहिते, निलेश शिंदे, सागर लोखंडे, अजिंक्य वाघमारे, सुबोध वाघमारे, अतुल सोनवणे, शिवशरण कुंभार, मनोज कांबळे, सुचित्रा इंगळे, शिवानी लोंढे आदी विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button