ताज्या घडामोडी

गवती चहा

गवती चहा

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज

संग्राहक : प्रविण सरवदे/आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 11/10/ 2024 : गवती चहा (Lemon Grass) एक तृणवर्गीय वनस्पती आहे. हे बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. चहाला चव येण्यासाठी याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहा बरोबर किंवा चहा शिवाय उकळतात. खोड आखूड व जमिनीत वाढते आणि काही भाग जमिनीवर येतो. मुळे आखूड, तंतुमय आणि मोठ्या संख्येने व दाटीवाटीने वाढलेली असतात. पाने लांब, टोकाला निमुळती होत गेलेली आणि हिरवी असतात.
उपयोग
# ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. # तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे. # तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनतो. # हे तेल सांधेदुखीवर उपयुक्त आहे.# कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.# पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. # सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य प्रसाधनांत, तसेच अत्तर म्हणून होतो. # साठवण्याच्या धान्यांमध्ये आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात.
चहा पिणे हे जरी शरीरासाठी हितकारक नसले तरी बहुतेकांची सकाळची सुरुवात मात्र चहा घेतल्या शिवाय पूर्ण होतच नाही. जर चहा प्यायची इच्छा झालीच तर गवती चहा हा योग्य पर्याय ठरू शकेल. सध्या सगळीकडे पाऊस सुरू आहे, अशा वातावरणात फिरायला कुठे गेलाच तर अशा स्वरूपाचा चहा बहुतेक ठिकाणी मिळतोच. चहा हे उत्तेजिक पेय म्हणून ओळखले जाते. हा गरमागरम वाफाळता चहा मात्र नक्की पिऊन बघाच. कारण अशा वातावरणात सर्दी, पडसे होण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी गवती चहा पिल्याने होणाऱ्या सर्दीला अटकाव येतो. तसेच थोडीशी कणकण जाणवू लागल्यास गवती चहा पिल्याने शरीरातून घाम फुटू लागतो आणि तापेमुळे वाजणारी थंडी दूर होते. तसेच शारीरिक थकवा किंवा डोकेदुखी यावर उपाय म्हणून अशा स्वरुपाचा चहा पिणे योग्य ठरते.
एवढेच नव्हे तर संधिवात झालेल्या व्यक्तीसाठी देखील हा चहा पिणे योग्य ठरते, तसेच शारीरिक पचनक्रिया सुधारते, यातील आवश्यक घटकामुळे बॅक्टेरियाचा नाश होऊन शरीरातील घाण बाहेर निघण्यास मदत होते. त्यामुळे साहजिकच चेहऱ्याचा पोत सुधारून चेहऱ्यावर वेगळीच चमक येऊ लागते. तसेच यात ‘अ जीवनसत्त्व’ भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेसाठी ते फायदेशीर ठरते. गवतीचहा पासून तेलही मिळवले जाते. असे तेल संधिवात मध्ये फायदेशीर ठरते. गवती चहा बाजारातून विकत आणण्यापेक्षा आपल्या परसबागेत किंवा अगदीच जागा कमी असेल तर एखाद्या कुंडीत देखील याची लागवड करू शकता. हे घरात लावल्याने मच्छरांपासूनही सुटका होते.

संदर्भ : विकिपीडिया
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button