ताज्या घडामोडी

गर्व कशाचा करताय…?

गर्व कशाचा करताय…?

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 15/12/2023 :
सत्ता आयुष्याच्या शेवटपर्यंत तर नसतेच पण, ती जीवनात कधी…? , काय…?? आणि कसे…??? करुन जाईल काहीही सांगता येत नाही…! तेंव्हा अती तेथे माती होण्याअगोदर सत्तेत आज असलात तर उद्या नाही, म्हणून जमिनीवर रहा म्हणजे माणसांत रहाल…! नाहीतर केसीआर…!! व्हायला वेळ लागणार नाही. आपल्याला एकहाती सत्ता दिली त्या टि आर एस म्हणजे तेलंगणा राष्ट्र समिती चे बी आर एस म्हणजे भारत राष्ट्र समिती असे नामाभिमान करीत देश जिंकायला निघालेल्या के सी आर अर्थात के. चंद्रशेखर राव यांची राज्यातील सत्ता तर गेलीच पण त्यांना स्वतःचे डिपॉझिटही राखता आले नाही. अहंकाराने देशावर राज्य करायला निघालेले केसीआर बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने त्यांचा खुबा मोडला. आणि आत्ता तर त्यांना धड दोन पावलेही चालता येत नाहीत. बाथरुममध्ये पाय घसरुन पडणे हे निमित्त आहे पण खरेतर सर्वसामान्य जनतेच्या कराच्या पैशाचा अपव्यय करीत मनात काहीतरी काळेबेरे घेऊन पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला फुकटचा आयता आव आणत एक नाही दोन नाही तर तब्बल पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन ते गेले होते त्याचाच तो परिणाम होता. तरीपण एवढ्या सहजासहजी पावणारा तो पांडुरंग नव्हे…?
माणसाचे दिवस बदलायला वेळ लागत नाहीत. परिस्थितीचा माज परमेश्वरासमोर नाही दाखवायचा, तर त्याला हृदयापासून शरण जायचे असते आणि सदैव सत्कर्म करत राहायचे असते तरच चांगली फलनिष्पत्ती होते. अन्यथा…जो सत्तेवर असेल त्याने तर कायम जमिनीवर राहून व्यवहार करायचा असतो. लहान-थोरांचा मान ठेवायचा असतो. कोणाचाही अपमान करायचा नसतो. मोठ्ठे लोक जे मनानेही असतात आणि मानानेही असतात ती मोठ्ठया मनाचीच असतात म्हणून ती लगेच व्यक्त होत नसतात. कारण ती त्या पदापर्यंत पोहोचलेली असतात म्हणून सुधारण्याचा एक मोका ती देत असतात. ती शांत असतात म्हणजे ती आपल्याला घाबरलीत असा समज कोणीही करुन घेऊ नये…! नाहीतर शेवट हा क्रुरतेने होणार हे अटळंच आहे…
यातून बोध घेऊन सुधारण्याऐवजी जर तो मस्तीतच वागू लागला तर अल्पावधीतच त्याच्या दिव्यातील तेल संपत चालले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
आज अशा मस्तीखोरांच्या पाठीशी जे कोण आहेत ते नेहमीच असतील असे होत नाही, आणि ज्यावेळेस आजचे पाठीराखे पाठ फिरवतील त्यावेळी “भीक नको पण कुत्रे आवर” अशी त्याची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. आज मी आहे तुझ्या पाठीशी तु असं कर? कोण काय करतंय पाहू? असं म्हणणारे फक्त आपला फायदा पहात असतात. वेळ प्रसंगी हेच पाठीराखे कधी पाठीत काय…? खुपसतील सांगता येत नाही, म्हणून सत्तेवर असणाऱ्यांनी कायम जमिनीवर राहून म्हणजे माणसांत राहून, सत्कर्म करत रहावं बाकी कर्ता करविता तोच असतो आणि तोच न्यायनिवाडाही करत असतो.
माणसाला फुकटचा अहंकार असतो आणि तोच अहंकार त्याला मातीमोल केल्याशिवाय राहत नाही.‌
मला कोणी काही विचारायचे नाही… आणि सांगायचेही नाही… मी पैसे खर्च करून खुर्चीवर बसलो आहे… मी बघतो काय करायचे ते… तुम्ही मला सांगणारे कोण…?, अशा प्रकारे जेंव्हा गर्वाने वागाल तेंव्हा निश्चितच तुमचा के सी आर व्हायला वेळ लागणार नाही. धोक्याची घंटा कधी वाजू शकेल काहीही सांगता येत नाही, कारण नियती आपलं काम चोखपणे बजावत असते…!

वर्षा गायकवाड

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button