अखेर माकडींणीने आपली पिल्ले पायाखाली घेतली
प्रासंगिक…..✍️
अखेर माकडींणीने आपली पिल्ले पायाखाली घेतली
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
अकलूज दिनांक 04/04/2024 :
आपण सर्वांनीच लहानपणी माकडीण आणि तिचे पिल्लू आणि ही गोष्ट ऐकली आहे. एका हौदामध्ये माकडीणीला उभे करून त्यावर त्यामध्ये पाणी ओतण्यात येते प्रथम पायापर्यंत पाणी असते तोपर्यंत पिल्लू माकिडीला चिकटून गळ्यापाशी असते हळूहळू पाण्याची पातळी वाढल्यावर माकडीण पिल्लू डोक्यावर घेते शेवटी नाका तोंडात पाणी जाऊ लागल्यानंतर ती आपल्या पिल्लाला खाली टाकते व त्यावर उभारते यात वेळप्रसंगी आपल्या पिल्लाचा बळी देऊन माकडीण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करते.
ही बोधकथा आज आपणास आठवणीत आणून देण्याची कारण
“चौदावे रत्न दाखवा अगर उलटे करून मारा”
आपण क्रांतिकारकांच्या अनेक कथा वाचल्या असतील त्यामध्ये आपल्या सहक्रांतीकारकांचे व मदत करणाऱ्यांची नाव पोलिसांचा प्रचंड छळ सहन करून सुद्धा क्रांतिकारक सांगत नसत.
मी पण वकिली व्यवसायातील अनुभवात असे अनेक आरोपी पाहिले आहेत त्यांना प्रचंड छळाला तोंड द्यावे लागले तरी ते आपल्या सह आरोपींची किंवा मदत करणाऱ्यांची नावे पोलिसांना सांगत नाहीत.
82 चे 87 या कालावधीत मी अनेक हिंदू एकताचे जिगरबाज कार्यकर्ते पाहिले आहेत. प्रचंड छळ होऊन सुद्धा त्यांनी कधीही आपल्या सहकाऱ्यांची नावे सांगितली नाहीत.
आपणास कदाचित ठाऊक नसेल सीबीआय व ईडी यांच्या कस्टडीत त्या अधिकाऱ्यांना आरोपींना मारहाण करण्याची त्यांचा छळ करणे त्यांना चौदावे रत्न दाखवण्याची परवानगी नसते. सातत्याने प्रश्न विचारून आरोपीकडून सत्य उघडकीला आणण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असते
कट्टर इनामदार केजरीवाल गेले सहा महिने अटकेस घाबरत नाही. माझा छळ केला तरी मी घाबरत नाही. अशा वल्गना करत होता.11 दिवसाच्या इडी कस्टडीमध्ये त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची व शराब घोटाळ्यात गुंतलेल्या आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे सांगीतली.
आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांचाही या खटल्यात, या गुन्ह्यात, या भ्रष्टाचारात हात आहे हे केजरीवाल यांनी सांगून टाकले. आपल्या अस्तित्वाचा, जीवाचा अगर सुखाचा प्रश्न निर्माण झाला की आपली सुटका व्हावी म्हणून इतरांची नावे सांगणारा केजरीवाल भगतसिंगाचा आदर्श वारंवार सांगत असतो.
धूर्त परीवारवादी अर्थात ही व्यक्ती अतिशय धूर्त व परिवार वादी आहे. आतिशी आणि सौरभ हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. त्यांचा परस्पर काटा निघावा म्हणून धूर्तपणे अगर भीती पोटी या दोघांची नावे अधिकाऱ्यांच्या पुढे सांगून त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यात आले व आपली पत्नी हिचा मुख्यमंत्री पदासाठी मार्ग रिकामा केला असेही असू शकते.
पण आपल्या जीवावर आल्यावर आपल्या पिल्लाला पायाखाली घेणारी माकडीण व आपल्याच सहकाऱ्यांच्या भविष्यावर व जीवावर उठलेला केजरीवाल हे दृश्य पहावयास मिळत आहे. रात्रंदिवस शहिदांची नावे घेऊन आपल्या तुंबड्या भरणाऱ्या स्वार्थी व परिवार वादी नेत्यांना काय म्हणावे
ॲड अनिल रुईकर
98 232 550 49
इचलकरंजी
🔰संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे