ताज्या घडामोडी

नारी अबला नहीं अब सबला है !

नारी अबला नहीं अब सबला है !

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 26/12/2023 :
स्त्री ही अबला नाही तर तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तिला घरात डांबून ठेवून चुल आणि मुल सांभाळ म्हटल्या गेले. तिला सुधारण्याचा मोका दिला नाही. स्त्रिला भोगवस्तू समजून नुसती बाहुली असल्यासारखे तिला ठेवण्यात आले. त्यामुळे घराघरात कली शिरुन स्त्री अबला बनली. स्त्री सारखी जगात दुसरी मोहिनी नाही. तिच्या सारखी रणांगणात गेली असता दुसरी रणचंडिका नाही. स्त्री हीच देवीचे रुप आहे. देवीची पूजा करण्यापेक्षा आपल्या स्त्रिला देवीसमान मानायला हवे. व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या लहर की बरखा मध्ये म्हणतात.
नारी नहीं अबला है, इसको क्यो किया बदनाम है?।
मौका नहीं तूने दिया, देखा न उसका काम है ।।
आदर्श देवी जानकर, तू शक्ती उसको माँगता।
यह भी समय आता की, अबला को सबल जब जानता।।
राष्ट्रसंत सांगतात की, “जिच्या हाती पाळण्याची दोरी, तिच जगाते उद्धारी” म्हणजे स्त्री ही एक आई आहे. तीच जगाचा उद्धार करु शकते कारण ती शंभर गुरुपेक्षाही महान आहे. स्त्री ची महती वर्णावी तेवढी कमी आहे. उत्तम पुरुष व उत्तम नारी या दोघांचे मिलन झाले तर स्वर्गसम संसार होतो. पुरुक्षापेक्षा स्त्री काकणभर अधिक ठरते.
प्रल्हादाची कयाधू आई, छत्रपतीची जीजाबाई
कौसल्या देवकी आदि सर्वहि, वंदिल्या ग्रंथी।।
ज्या स्त्री चे पुत्र जन कल्याणासाठी झिजले. प्रल्हादाची कयाधू आई काय वर्णावी तिची थोरवी तर शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांची माता जिजाऊ यांच्या अमोल मार्गदर्शनाने स्वराज्य निर्माण झाले. कौसल्या व देवकी ह्यांची प्रचिती आपणास इतिहासाने करुन दिलीच आहे. घरादारामध्ये नवचैतन्य जागं करणारी ही स्त्री माताच ठरते.
आज स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचे स्थान दिले आहे. स्त्री क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता आहे, हे लक्षात आणले तर स्त्रियांवरील अत्याचार थांबतील आणि समाजात ती सन्मानाने व ताठ मानेने जगायला शिकेल. स्त्री ने जर का चंडिकेचे रौंद्र रुप धारण केले तर ती कुठलेही संकट सहज परतवू शकते. स्त्रीला अबला म्हणणे योग्य ठरत नाही तर ती सबला आहे.
म्हणोनि विधिने सेवन उचित बोलीले।
महिले विन विश्व न चाले।।
काय होते पुरुषाने केले?।
अभद्र झाले घर सारे

प्रत्येक घरोघरी स्त्री शक्तीचा वास आहे. प्रत्येक जीव हा स्त्री तत्वाशिवाय अपूर्ण आहे. स्त्रीने ठरविले तर जगाचे उत्थान होते. स्त्रियांना योग्य सन्मान जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत ह्या समाजाची प्रगती होणे शक्य नाही. घरातील स्त्री ही समाजाचे ऋण फेडण्यास महत्त्वाची कामगिरी बजावते व मानव समाज संतुलित ठेवण्यास ही प्रथम कारणीभूत ठरते. स्वार्थाने बरबटलेल्या कुविचाराने माखलेल्या ह्या समाजाने सर्वप्रथम स्त्री जातीचा सन्मान करणे शिकलं पाहिजे. मातेला मातेसमान, मुलीला मुलीसमान, बहिणीला बहिणीसमान आणि स्वतःच्या अर्धागिनीला सहचारिणी समान वागणूक दिल्या गेली पाहिजे. तरच समाज विघटनापासून वाचु शकेल व समाज आदर्श राष्ट्र निर्मितीसाठी सक्षम ठरेल.
स्त्री हे मानवतेचे प्रतिक असून आज्ञापालक, एकता, प्रेम, दया व आकर्षण हे गुण निसर्गतःच तिच्यात आढळतात. श्रीरामाची पत्नी सीता काय अबला होती? नक्कीच नाही परंतु तिच्या एका चुकीमुळे तिला अबलेसारखे जीणे जगावे लागले. रावणाच्या राज्यातील सगळ्या स्त्रीया अबलाच होत्या. पांडवाच्या लाचारीचे परिणाम द्रोपदीला अबला होऊन भोगावे लागले. पाच पती असून एकही तिची अब्रु वाचवू शकला नाही.
दुर्योधन, दुशाषन द्रोपदीची वस्त्र फेडताना दिसले तर श्रीकृष्ण वस्त्र पुरवितांना दिसले. आज आपण स्त्री सशक्तीकरणाच्या गप्पा करीत असलो तरी पण वस्त्र पुरविणारे श्रीकृष्ण फार कमी दिसतात. परंतु वस्त्रहरण करणारे करणारे दुर्योधन, दुशाषन आज गल्लीबोळात दिसतात. प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रीयांचा सन्मान केला गेला पाहिजे. पतीचे निधन झाल्यानंतर स्त्री संसाराचा गाडा खंबीरपणे व आत्मविश्वासाने चालविते. स्त्री ही संसाराचा कणा, आधारस्तंभ व अविभाज्य घटक आहे. स्त्रीला पशुवत वागणूक न देता समाज तिला सन्मानाने वागवेल व मनापासून आदर करण्यास शिकेल, तो दिवस भाग्याचा समजावा. स्त्री ही नदीसारखी प्रवाही असते. “स्त्री अबला का सबला” हे विधान कायमचे पुसून टाकायला पाहिजे.
अबला नव्हे तू सबला आहेस.
सत्य एवढे जाण.
या देशाची नारी आहेस.
भाग्य तुझे गं महान.
नव हृदयात ठाव घेऊनी.
अश्रू येती नयनातूनी.

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button