सायलेन्स अमाऊंट टू क्राईम
प्रासंगीक…..
सायलेन्स अमाऊंट टू क्राईम
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 संकलक आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 01/04/2024 :
एखाद्या गुन्ह्यात प्रत्यक्ष भाग नसला तरी त्या गुन्ह्याची माहिती होऊन आपण योग्य त्या पोलीस स्टेशनला ते कळवले नाही तर हा पण एक प्रकारचा गुन्हाच आहे
गुन्हेगारांना मदत करणे त्यांना आसरा देणे त्यांच्यासाठी वाहने
उपलब्ध करून देणे असा कोणताही प्रकार हा गुन्हेगारा इतक्याच शिक्षेस पात्र असतो
*ॲड राम जेठमलानी व दाऊद इब्राहिम
इब्राहिम यास फरार घोषित केल्यानंतर एकदा ॲड जेठमलानी यांच्या फोनवर एक फोन आला व त्यांनी दाऊद इब्राहिम बोलतोय मी भारत सरकारला शरण जाणार आहे आपण माझे वकीलपत्र घ्याल का त्यावेळी आपण ज्यावेळी शरण जाल त्यानंतर या गोष्टीचा विचार करता येईल असे सांगून ॲड जेठमलानी यांनी फोन ठेवून दिला
व त्वरित रात्रीचे दहा वाजून गेले होते ते जवळच्या पोलीस स्टेशनला गेले व त्यांनी आपणास आलेल्या कॉल बद्दल पोलीस स्टेशनला नोंद केली
त्यांनी असे का केले बरे ?
उद्या दाऊदचे फोन कॉल्स
हे पोलिसांना मिळाले तर त्यामध्ये वरोल फोन कॉल दिसून येणार व ॲडव्होकेट राम यांना नको त्या चौकशीस व प्रसंगी अटकेस सामोरे जावे लागले असते
*गुन्हेगाराला आसरा देणे
कल्पनाथ एक केंद्रीय मंत्री होते ते इंदिराजींच्या पासून राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात होते
ते तीनदा राज्यसभेवर व चार वेळा लोकसभेत निवडून गेले होते त्यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या गेस्ट हाऊसवर दाऊद इब्राहिम टोळीचे पाच आरोपी त्यामध्ये सुभाष सिंग ठाकूर सामील होता याना आसरा दिला होता
हे सर्व आरोपी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट करण्यासाठी आले होते
ते त्यावेळी सापडले नाहीत पण ज्यावेळी सापडले त्यावेळी त्यांनी कल्पनाथ यांनी आसरा दिला होता हे पोलिसांना तपासात सांगितले त्याबरोबर कल्पनाथ याना पण टाडाखाली अटक झाली व त्यांच्यावर गुन्हा सिद्ध होऊन ते शिक्षा भोगावयास गेले
माझ्या स्मरणाप्रमाणे ते तुरुंगातच 99 साली निधन पावले
वाचक बंधू भगिनींनो आज हा विषय सांगण्याचे मुख्य कारण म्हणजे
*चवन्नी सापडत नाही
दिल्लीचे केजरीवाल यांनी आपल्याकडे कोणतीही खाते ठेवले नव्हते व शराब घोटाळे मध्ये त्याची कुठेही संमतीसाठी सही नाही असे असताना त्यांना आरोपी का केले आहे हे चुकीचे आहे असा कंठशोष विरोधी आघाडी व आप पक्ष करत आहे
मंत्रिमंडळाच्या कोणत्याही निर्णयास मुख्यमंत्री प्रथम जबाबदार असतो जर हा शराब घोटाळा सुरू आहे हे केजरीवाल याना माहीत असून त्यांनी शांतता पाळली त्यांच्यासमोर घोटाळा होत असताना ते मम् राहिले तर सायलेंन्स अमाऊंट टू क्राईम
त्यांचे शांत राहणे हे त्यांच्या गुन्ह्यांमध्ये भाग असणे असेच ठरते
आता कितीही आमच्याकडे काही सापडले नाही “चवन्नी” पण मिळाली नाही अशी पत्रकार परिषद घेतली तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग घेऊन अगर शांत राहुन एखादा गुन्हा घडला असेल किंवा घडविला असेल तर असे आरोपी शिक्षेस पात्र असतात
मला माहीत नव्हते हे मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीने म्हणणे हे कोणासही पटणारे नाही.
ॲड अनिल रुईकर
98 232 55 0 49
इचलकरंजी