प.पू. सदगुरू मामासाहेब देशपांडे पुण्यतिथी महोत्सव व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सप्ताहास प्रारंभ
प.पू. सदगुरू मामासाहेब देशपांडे पुण्यतिथी महोत्सव व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सप्ताहास प्रारंभ
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/03/2024 :
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील संग्रामनगर-अकलूज येथील श्रीपाद सेवा मंडळ, दत्त मंदिर, लोणकर वस्ती यांच्यावतीने परमपूज्य सद्गुरु मामासाहेब देशपांडे पुण्यतिथी महोत्सव व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सप्ताहास प्रारंभ झाला. गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 ते 3 एप्रिल 2024 या कालावधीत आयोजित केलेल्या या धार्मिक सोहळ्यात पारायण वेळ सकाळी 8:30 ते 11:30, राहील व्यासपीठ चालक ह.भ.प. सुरेश महाराज सूळ (ज्ञानाई गुरुकुल संग्रामनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या धार्मिक सोहळ्याची समाप्ती बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी सकाळी दहा वाजता पारायण समाप्तीने होऊन10:05 ते 12:00 या वेळेत पंढरपूर तालुक्यातील सुपली चे विनोदाचार्य ह भ प मच्छिंद्र महाराज कवडे यांचे सद्गुरु पुण्यतिथी निमित्त कीर्तन आणि पुष्पवृष्टी होईल. त्यानंतर दुपारी 12:15. ते 3:00 वा. पर्यंत महाप्रसाद लाभ होईल.
श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचकांसाठी गुरुवार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी अरण, माढा, पंढरपूर, मंगळवेढा या तीर्थक्षेत्री एक दिवसाच्या मोफत भक्तीयात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक दिलीप गजानन लोणकर यांनी साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता आणि aklujvaibhav.in ला सांगितले.या धार्मिक सोहळ्यासाठी अंगद महाराज हजारे (मोबा.8329523425) अनिकेत शिरकांडे (मोबा.9834172629) यांच्यासह श्रीपाद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य परिश्रम घेत आहेत