पवारसाहेबांनी चक्क साताऱ्यातून दंड थोपटलेत ?

पवारसाहेबांनी चक्क साताऱ्यातून दंड थोपटलेत ?
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/03/2024 :
शिल्लक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांनी आता सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची बऱ्यापैकी इच्छा व्यक्त केली आहे , मग तो त्यांचा स्पर्धक कोणीही असो त्यात साहेबांना विचार करण्याची गरज नाही. कारण स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरुन इतरांची जिरवायची हा साहेबांचा जुना हातखंडा आहे. त्यामुळे साताऱ्यातील राजकारणात मोठी मजा येणार आहे असे वाटते. बघू पुढे काय राजकीय आडाखडे कसे जुळतात ते . पण जर साहेबांनी दोन हात केले तर दुसरा पैलवान तितकाच हिंदकेसरी असला पाहिजे तरच कुस्ती निकाली होईल .
खरं तर साहेबांनी शडढू ठोकावा ही माझी अपेक्षा आहे. कारण जर भाजपची आतुरतेने जिरवायची असेल तर सातारा लोकसभेसारखा दुसरा सज्जन मतदार संघ नाही. साहेबांची ही राजकीय परिक्रमा भाजपने पुरती ओळखली आहे. त्यामुळे तर देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय दूत गिरीश महाजन साताऱ्यात येऊन अगोदर जलमंदिर आणि नंतर जाणिवपूर्वक सुरुचीवर चक्रा मारत आहेत. कारण सातारा धोक्यात नाही तर चक्क महा खड्यात आहे याची ही प्रचीती आहे. कारण लोकसंपर्काचा अभाव आणि तो इतरत्र सुध्दा असतो पण त्याला श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अपवाद आहेत. कारण ते सकाळी अकराच्या ठोक्याला त्यांच्या सुरूचीवर नित्यनेमाने हजर असतात. भले त्यातून कुणाचं काम होवो का नका पण त्यामुळे जनसामान्यांना धीर मिळतो हे वास्तव आहे .सातारा लोकसभेसारखा दुसरा मतदारसंघ नव्हता. कारण ज्या प्रतापरावभाऊ भोसलेंनी सलग तीन वेळा निवडून महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या महानिर्वाण नंतर ते सतत येत होते , तोपर्यंत हा मतदारसंघ शाबूत होता. पण त्यानंतर काॅंग्रेसच्या आघाडीच्या नेतृत्वात बिघाडी झाली आणि शिवसेनेचा हिंदुराव निंबाळकर यांच्या माध्यमातून शिरकाव झाला. पण नंतरची दहा वर्षे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सलग आपली खासदारकी खरच उपभोगत राष्ट्रवादी काँग्रेसला अक्षरशः निष्प्रभ केले. कारण ज्यावेळी ते तिसऱ्यांदा निवडून आले. त्यावेळी त्यांच भाजपच प्रेम ओतू झालं परिणामी ते श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभूत झाले. याचा अर्थ त्यांना पराभूत करण्याची मोहीमच सुरू झाली होती. पण त्यांना त्यांचे सल्लागार काय आणि कधी व कसे कोणत्या वेळेला सल्ला देतात हा कळीचा मुद्दा आहे. कारण अनेक लूटमार करणारे हवसे नवसे त्यांच्या जलमंदिरात पुजलेले असतात. त्यामुळे सामान्य माणूस जलमंदिरात जायला बऱ्यापैकी घाबरतो. हे वास्तव आहे. पण बोलणार कोण ? कारण जलमंदिरात सगळ्यांची दातखीळी बसली असते .
सध्या लोकसभेचे वारे सुसाट वेगाने वाढत आहे मग सगळीच मंडळी आपली तानाशाही सोडून दिल्ली दरबारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे चक्क लोटांगण घालत आपली उमेदवारी फिक्स करण्यात दंग आहेत किंवा मश्गूल आहेत हो त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सुध्दा अपवाद नाही. कारण काही करून उमेदवारी मिळाली पाहिजे , पण जे निवडून येणार आहेत त्यांनाच भाजपची उमेदवारी मिळणार मग कुणीही कितीही आपटली तरी त्याचा मुलाहिजा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ठेवणार नाहीत. आता आपण साताऱ्याचा विचार करू. जर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळाली तर शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब हे आमनेसामने ठाकतील कारण ते यावेळी पावसात भिजणार तर नाहीत पण ते करोडो रुपयांची खैरात करत भाजपची चक्क माती करणार आहेत हे आता लिहून ठेवा. कारण साहेबांसमोर साताऱ्यात कितीही कसलेला उमेदवार असला तरी ते काही केल्या ताकासतूर लावू देणार नाहीत यात शंका कुशंका नको. तरीही त्यांनी जर यदाकदाचित राजघराण्यातील व्यक्तींचा निवडणुकीत सन्मान करायचं ठरवलं तर हा मतदारसंघ श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या हातचा खेळ आहे. अर्थात हा खेळ कोण बिघडवतो आणि कोण खेळपट्टीवर टिकून राहून सुधरवतो याला अधिक महत्त्व देतो यांवर सगळं अवलंबून आहे अर्थात श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांचा विजय निश्चित आहे. मग नाक मुरडायची नाही का ?
राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
दिनांक – २२/०३/२०२४ .
पत्रकार जेष्ठ राजकीय विश्लेषक