ताज्या घडामोडी

भाजप व मित्र पक्षाचे स्वार्थी राजकारण रामदास आठवले यांनी ओळखण्याची गरज

भाजप व मित्र पक्षाचे स्वार्थी राजकारण रामदास आठवले यांनी ओळखण्याची गरज

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 18/03/2024 :
सध्या देशात लोकसभेच्या निवडणुक तारखा जाहीर झाल्या आहेत सर्वच राजकीय पक्षांनी युतीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न म्हणून जागा वाटपाचे सुत्र पाळले आहे मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा पक्ष गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप बरोबर संधान बांधून आहे याही वेळी विद्यमान लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट भाजप मित्र पक्षा बरोबर युतीत सहभागी आहे पण जागा वाटपात भाजपने अद्याप रामदास आठवले यांचे नेतृत्वाखाली असणार्या त्यांच्या पक्षाला अद्याप एकही जागा सोडलेली नाही तसेच आरपीआय आठवले गट वगळून एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ला जागा सोडण्याचे संदर्भात दिल्लीत तीन ते चार बैठका भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांचे बरोबर झाल्या आहेत भाजपने आता पर्यंत लहान घटक पक्ष आघाडीला वापरा फेकून द्या हे तंत्र अवलंबले आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपचे स्वार्थी राजकारण वेळीच ओळखण्याची गरज आहे एक दोन जागा द्या म्हणून त्यांना अनेकदा मागणी करूनही भाजप तोंड उघडायला तयार नाही जर भाजपला आरपीआय ची गरज नाही असे वाटत असेल तर त्यांनी त्वरित तसा निर्णय द्यायला हवा पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर गाफील ठेवून कोंडीत पकडून आरपीआयचे मतदान मिळवायचे व नंतर त्या बदल्यात एखादे सत्तेचे पद द्यायचे आणि सर्व पक्ष आपल्या दावणीला बांधून ठेवायचा हे विश्वास घातकी धोरण दलितांवर अन्यायकारक आहे
अशा आत्मघातकी व स्वार्थी भाजपचे खेळीला आरपीआय कार्यकर्त्यांनी वेळीच रोखले पाहिजे.
सन्मानाने स्वाभिमानाने अस्मिता जागृत असणारे पद प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आपला कोण वापर तर करत नाही ना हे आरपीआय कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन लाचारी करणारी सत्ता काय कामाची स्थानिक पातळीवर सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यकर्त्यांना खड्या सारखे बाजूला फेकले जात असताना मित्र पक्ष युतीचा राजधर्म पायदळी तुडवून कार्यकर्त्यांच्या अस्मितेवर फुंकर मारत असतील तर त्यांच्या मागे मागे का म्हणून लागायचे एक वेळ आपलीही ताकद काय आहे हे रामदास आठवले यांनी भाजपला सप्रमाण दाखवून देण्यातच स्वाभिमान आहे आरपीआय ला जाणूनबुजून डावलण्यात येत असल्याने कार्यकर्त्यांत प्रचंड रोष संतप्त भावना आहेत त्यांच्यात संतापाचा उद्रेक खदखदत आहे रामदास आठवले यांनी सारासार विचार करून कार्यकर्त्यांचा स्वाभिमान ज्वलंत ठेवायचा असेल तर युती बाबत सकारात्मक विचार करून लवकर निर्णय घेतला पाहिजे अशा प्रतिक्रिया भावना गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या आरपीआय कार्यकर्त्यांच्या आहेत

बी. टी. शिवशरण
ज्येष्ठ पत्रकार

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button