ताज्या घडामोडी

दरोडेखोर…❗.”इलेक्ट्रॉरल बाँड मागचे सत्यमेव जयते”‼️

दरोडेखोर…❗.”इलेक्ट्रॉरल बाँड मागचे सत्यमेव जयते”‼️

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 21/03/2024 :
गेल्या चार-पाच दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा विभागाचा दौरा करत असताना मी फेसबुक सोशल मीडिया वर “दरोडेखोर” या नावाने एक पोस्ट सोशल मीडिया वर व्हायरल केली होती. त्या पाठीमागचं सत्य हे एका शोध पत्रकारिता बातमी, मी माझ्या माहितीप्रमाणे भारतीय मराठी जनतेच्या समोर कव्हर स्टोरी इलेक्ट्रॉरल बाँड पाठीमागचा “दरोडेखोर,, कोण हे आरबीआय, एसबीआय आणि निवडणूक आयोग किंव्हा भारतीय अर्थ मंत्रालयाला एक ना एक दिवस भारतीय जनतेच्या समोर सत्यमेव जयते जाहीर करावेच लागेल.?
तुम्ही अनेक सिनेमांमध्ये पत्रकार आणि सिनेमाची स्टोरी पाहिलेली असेल शोध पत्रकारिता हा अत्यंत महत्वपूर्ण विषय असून तो देशाला सुरक्षित ठेवणारा एक जागरूक पत्रकार म्हणजे शोध पत्रकारिता होय.! पत्रकारितेत माहेर असलेली तत्कालीन टीव्ही चॅनेलची पत्रकार आणि जर्नालिजम पूनम अगरवाल आणि दोन हजार रुपयांचे ‘इलेक्टोरल बॉंड’! या बाबत केंद्र सरकारकडून जाहीरपणे प्रेस कॉन्फरन्समध्ये बातम्या म्हणून सांगितलेल्या गोष्टी या बातम्या नसतात तर त्या असतात जाहिराती. पण ज्या गोष्टी सरकार मोठ्या कष्टाने लपवायचा, प्रयत्न करतात
तेथेच दडलेल्या असतात त्या खऱ्या बातम्या, आणि बातमी पाठीमागचे सत्यशोधून काढलेल्या असतात त्याला खर्या बातम्या म्हणतात, जे पत्रकार खऱ्या बातम्या लोकांच्या पुढे आणतात त्यांच्या शोध पत्रकारितेबद्दल लोकांच्या मनात आदर असतो, तो खऱ्या अर्थाने भारतीय घटनेचा चौथा स्तंभ असून देश सेवा करण्यामध्ये त्याचा हा चौथा डोळा अत्यंत महत्त्वाचे काम करीत आहे.
आणि जे फक्त ‘एजन्सी’ ने दिलेल्या बातम्या दाखवतात ते फक्त आपलं अर्थ साम्राज्य मोठं करत धंदा वाढवत असतात. आपला धंदा करत असतात, त्याला व्यवहारात दंड (धंदा) असे ही म्हणतात.! मोदी सरकारने जेव्हा ‘इलेक्टोरल बॉंड’ भारतीय लोकांसमोर आणले तेव्हा सर्वत्र सांगण्यात आलं होतं कि ही एक अशी जादूची वस्तू कांडी आहे ज्याच्यामुळे निवडणूक प्रक्रिया स्वच्छ होईल! पण त्या पाठीमागची गौड-बंगाल काही वेगळीच आहे ते एसबीआय, भारत सरकारच्या अर्थ मंत्रालय, अर्थमंत्री यांनी पुढे का आणले नाही, हा महत्वपूर्ण गुपित विषय आहे तो पुढे वाचा.
“इलेक्ट्रॉरल बॉण्ड नंतर फक्त आणि फक्त पांढरा पैसा ‘सिस्टीम’मध्ये राहील. असे सगळ्यांनीच त्याचे फायदे सांगणे सुरु केले.! अन् ‘‘युरेका…युरेका’’ म्हणून ओरडणे सुरु केले. आता सर्व उद्योगपती कोट्यावधी रुपयांची देणगी बँकेमार्फत देतील. ( जे आता इलेक्ट्रॉनिक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाच वाचत आहात ते.) एकीकडे हे सर्व चालू होते. त्यावेळी दिल्लीतील एक तरुण महिला पत्रकार विचार करत होती कि इलेक्ट्रॉरल बाँड मागचे सत्य आपल्याला शोधून, सत्यामागे दडलेलं सत्य शोधून काढायचे आहे.?

अखीर तिने माहिती शोधून काढलीच.
तिचं नाव आहे पूनम अगरवाल.
आता फ्री लान्स पत्रकारिता करणाऱ्या पूनमने एनडीटीव्ही, टाइम्स नाऊ, क्विंट मध्येही काम केलेले आहे. ‘‘इलेक्टोरल बॉंड’’च्या योजनेला रिझर्व बँकेचा विरोध होता.! यामुळे ‘मनी लाँडरिंग’ होईल, काळा पैसा वाढेल
असं सांगण्यात येत होतं. भारत सरकारच्या कायदे मंत्रालयाचासुद्धा विरोध होता. तरीही इलेक्ट्रॉरल बॉंड आलेच. ते बॉंड आपण विकत घेतल्याशिवाय आणि तो कागद स्वतः बघितल्याशिवाय आपल्याला ठामपणे काहीच सांगता येणार नाही. हे तिला माहित होते. *”एका बॉंड ची किंमत एक कोटी रुपये होती. दहा लाख रुपये, एक लाख रुपये, दहा हजार रुपये आणि एक हजार रुपये अशा किमतीचेही बॉंड आहेत हे तिला समजले.,,
पण शक्यतो लोकांनी एक कोटीचे एक असे बॉंड घ्यावे, अशी अपेक्षा होती.
सर्वच पत्रकारांसाठी हे बॉंड म्हणजे ‘‘बड्डे लोग, बड्डी बाते!’’ म्हणून सरकारने दिलेल्या बातम्याची पिपानी तेच वाजवत होते.! ती योजना सुरु झाल्याबरोबर ती पत्रकार स्वतः स्टेट बँकेत गेली. आता स्टेट बँकेचा कारभार. या शाखेत जा. त्या शाखेत जा. त्यावेळी तिला अमक्याच अधिकाऱ्याला भेटा, बॉंड ची माहिती तमक्याच अधिकाऱ्याकडे आहे, असे सांगण्यात आले.! पण तिने हिम्मत हरली नाही. ‘‘मला एक हजार रुपयांचा एक, इलेक्टोरल बॉंड”’ खरेदी करायचा आहे यावर ती ठाम होती. तिने असे म्हंटल्यावर तो बँक अधिकारी परेशान झाला. ‘कशाला घेता? असे बारा बहाणे सांगत आताच योजना आली.’ वगैरे तो बोलू लागला. पण “ती,, नाही मला बघायचे आहे ‘इलेक्टोरल बॉंड’ पाहिजेच.! आणि एका राजकीय पक्षाला देणगी द्यायची आहे.’ ती तिच्या निर्णयावर ठाम होती.
शेवटी आधार, पॅन वगैरे देऊन ‘केवायसी’ झाली. आणि थोड्या वेळात तिला एक हजार रुपयांचे ‘इलेक्टोरल बॉंड’ अखेर तिने मिळवलेच.
कदाचित ते बँकेने विकलेले पहिलेच बॉंड असावे. त्यावर विकत घेणाऱ्याचे नाव नव्हते. त्यावर कुठलाच सिरियल नंबर नव्हता. फक्त तारीख आणि रक्कम. ‘अरे याला काही नंबर नाही का?’ असा प्रश्न तिला पडला.
उत्तर मिळाले -‘नाही’. असा कुठलाच क्रमांक नसेल हे शक्य नाही,
असं तिला मनोमन वाटत होतं.
‘कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होणार आहेत, आणि त्याला कुठलाच नंबर नाही, हे शक्य नाही. शिवाय बँकेला आपले व्यवहार तर नोंदवावे लागणार आहेत. त्यात एव्हढा मोठा पसारा!
काहीतरी गडबड आहे, हे लोक माहिती लपवत आहे, असं तिला वाटणं स्वाभाविक होतं. तिने तो कागद घेतला. आणि सरळ ‘फोरेन्सिक लॅब’मध्ये पाठवला. दरम्यान तिने अर्थ मंत्रालयातूनही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण तेच उत्तर – ‘असा कुठलाही क्रमांक नाही!’ अर्थात तिला ते पटत नव्हते. “काही दिवसांमध्ये ‘फोरेन्सिक लॅब’चा रिपोर्ट आला. आणि काय आश्चर्य! त्या बॉंड वर सांकेतिकस्वरुपात एक नंबर होता. तो नंबर फक्त ‘अल्ट्रा वायोलेट रेज मध्येच दिसत होता, हे त्याच्या पाठीमागचे मोठे आश्चर्य होय,, “त्याशिवाय त्यावर काही वाटर मार्क होते, मग तो नंबर त्याच बॉंड चा आहे. कि सगळ्याच बॉंड वर असेल हे पाहण्यासाठी ती पत्रकार परत स्टेट बँकेत जाते आणि परत त्याच अधिकाऱ्याला भेटून आणखी एक हजार रुपयांचे बॉंड विकत घेते. परत तसेच सवाल जबाब! परत ‘फोरेन्सिक लॅब’! जेव्हा रिपोर्ट येतो तेव्हा कळते दुसऱ्या बॉंडवरचा नंबर वेगळा आहे. याचाच अर्थ प्रत्येक बॉंडचा एकस्वतंत्र सांकेतिक नंबर आहे.

*”सिक्युरिटी एक बहाना..,,
मग ती परत बँक आणि अर्थ मंत्रालयाला सांगते कि बॉंड वर नंबर आहेत. त्यांना ते मान्य करावे लागते.
पहिल्यांदा कारण दिले जाते ‘सिक्युरिटी’! नंतर सांगितलं जातं, ‘ऑडीट’! म्हणजे प्रत्येक बॉंड ची नोंद करून ‘रेकॉर्ड’ बनवलेला आहे. सात वर्षांपूर्वी दोन हजार रुपये देऊन विकत घेतलेले ते दोन ‘बॉंड’ आज अतिशय महत्त्वाचे दस्त बनले आहेत. त्यामुळे ज्या लोकांनी देशाच्या तिजोरी वरती घाला घातला आहे त्याला मराठी भाषेमध्ये “दरोडेखोरी,, असे म्हणतात, स्टेट बँकेकडे सर्व रेकॉर्ड आहे आणि ते एका क्षणात बाहेर येऊ शकते, आता हेच यातून सिद्ध होते. सुप्रीम कोर्ट, पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ, स्टेट बँक, आणि इलेक्शन कमिशन, भारत सरकार, आपल्या देशातील सर्वसामान्य जनतेला 77 वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठी “दरोडेखोरी उजेडात आणून सत्य मेव जयते चे दर्शन दाखवून भारत देश हादरवणारी ही वास्तवता समोर येणार आहे.
हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करून न्यूज चॅनल्स चालवणाऱ्यांना जे जमलं नाही ते त्या शोध पत्रकारिता करणाऱ्या तरुणीने फक्त दोन हजार रुपयांची गुंतवणूक करून एखाद्या बातमीमागील बातमी कशी शोधावी,
हे दाखवले आहे. असे शोध पत्रकारिता करणारे पत्रकार आपल्या भारत देशात आहेत, “त्यामुळे पुनम अगरवाल यांच्या शोध पत्रकारितून बऱ्याचशा गंभीर गोष्टी आणि गुपिते समोर येतील.,, आणि पत्रकारिता करणाऱ्या नवीन पिढीला निश्चितच मार्गदर्शन करणारी आणि प्रेरणा देणारी ही घटना आता सोशल मीडियाच्या माध्यमातून हळूहळू बाहेर येऊ लागली आहे. असे शोध पत्रकार आणि अनेक सतर्क नागरीक आपल्या देशात आहे म्हणूनच अजूनही आपली लोकशाही टिकून आहे.

*विठ्ठल राजे पवार….*
*मुख्य संपादक साप्ताहिक पुण्यमत योद्धा शेतकरी.*
*लेखक शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ नवी दिल्ली महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.*

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button