“सहकार महर्षि”च्या ९ लाख ७१ हजार १७१ व्या साखर पोत्याचे व ५ कोटी ५५ लाख ५५ हजार ५५५ वीज विक्री युनिटचे पूजन संपन्न…

“सहकार महर्षि”च्या ९लाख ७१ हजार १७१ व्या साखर पोत्याचे व ५ कोटी ५५ लाख ५५ हजार ५५५ वीज विक्री युनिटचे पूजन संपन्न…
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/03/2024 :
अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३–२०२४ च्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या ९ लाख ७१ हजार १७१ व्या साखर पोत्याचे पूजन मार्गदर्शक संचालक विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांचे हस्ते तसेच बगॅसवर आधारीत ३३ मे. वॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पामधून आतापर्यंत एक्स्पोर्ट (विक्री) केलेल्या ४ कोटी ५५ लाख ५५ हजार ५५५ वीज विक्री युनिटचे पूजन कारखान्याचे संचालक संग्रामसिंह अजितसिंह जहागिरदार यांचे हस्ते संपन्न झाले. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर बाटचाल करीत आहे.
फोटो :अतुल बोबडे मोबा.नं.९९१७५३५२२०० कारखान्याचा सिझन २०२३-२०२४ चा ऊस गळीत हंगाम दिनांक ०१/११/२०२३ रोजी सुरु झाला असून दि. १२/०३/२०२४ अखेर ९ लाख ८६ हजार १०० मे.टन ऊसाचे गाळप होऊन ९ लाख ६० हजार ९०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले असून साखर उतारा सरासरी बी-हेवीसह १०.७६ % आहे.
चालू सिझन २०२३-२०२४ मध्ये को-जन वीज निर्मिती प्रकल्प दिनांक २८/१०/२०२३ रोजी सुरु झाला असून दि.१२/०३/२०२४ अखेर त्यामध्ये वीज ७ कोटी ९७ लाख ४३ हजार ९१८ युनीट निर्माण झाली असून त्यामधुन वीज विशी ४ कोटी ६६ लाख ८७ हजार ९२१ युनिट केलेली आहे. तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीमध्ये दि.१२/०३/२०२४ अखेर बी-हेवी पासून १ कोटी २९ लाख ६८ हजार ५१७ लिटर्स व सी-हेवी पासून ११ लाख ७१ हजार ४७९ लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट तसेच बी-हेवी पासून १ कोटी २२ लाख ३२ हजार ६६० लिटर्स व सी-हेवी ७ लाख ७८ हजार ७८६ लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले आहे. अॅसेटीक अॅसिड प्लॅटमध्ये २५९.५०० मे.टन अॅसिटाल्डीहाईड व २८७.८०० मे.टन अॅसिटीक अॅसिडची निर्मिती झाली असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, तसेच संचालक लक्ष्मण शिंदे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, भिमराव काळे, अमरदिप काळकुटे, गोविंद पवार, सुभाष कटके, जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक, प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत- पाटील, संचालिका सुजाता शिंदे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण, विनायक केचे, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, श्रीकांत बोडके, सौ. हर्षाली निंबाळकर, श्रीमती पुष्पा महाडीक तसेच माजी संचालक भिमराव काळे, रामचंद्र चव्हाण, विजय माने-देशमुख, राजेंद्र मोहिते, मोहन लोंढे, केशव ताटे, महादेव घाडगे, चांगदेव घोगरे, विठ्ठल ताटे तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख तसेच कामगार उपस्थित होते. सदर साखर पोती पुजन प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालकसाहेब विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे स्वागत चिफ केमिस्ट चिफ़ इंजिनिअर.एस.के. गोडसे व एस.एन. जाधव यांनी केले व त्यांचा सत्कार कार्यकारी संचालक राजेंद्र बौगुले यांनी केला. तसेच वीज विक्री युनिट पुजन प्रसंगी संचालक संग्रामसिंह अजितसिंह जहागिरदार व मान्यवरांचे स्वागत व सत्कार को-जनरेशन मॅनेजर वाय. के. निंबाळकर यांनी केला.