उपोषणावर प्रचंड दहशत, दडपणाचे सावट
संपादकीय……..✍️
उपोषणावर प्रचंड दहशत, दडपणाचे सावट
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
अकलूज दिनांक 11/03/2024 : येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणावर प्रचंड दहशत, दडपण आणि तणावाचे सावट पसरत चालले आहे अशी भावना उपोषणकर्ते समाजसेवक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी उपोषण स्थळी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केली. दिनांक 26 फेब्रुवारीपासून शासकीय कार्यालयीन वेळेत उपोषण सुरू आहे. अकलूज येथील सिटी सर्वे नंबर 987/ 61 (तत्कालीन दि बॅकवर्ड क्लास को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी अकलूज) रस्त्यावरील व खुल्या जागेतील अनधिकृत अतिक्रमण काढून मिळण्याबाबत उपोषणकर्ते समाजसेवक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, सामाजिक कार्यकर्ते विलासनंद विठ्ठल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ मोहन जाधव या तिघांनी उपोषण लावले आहे. जिल्हाधिकारी सोलापूर आणि तहसीलदार माळशिरस यांचे आदेशान्वये सदर जागेवरती महाराष्ट्र शासनाची नोंद झालेली आहे. त्यानुसार अंतर्गत रस्ते व खुल्या जागेतील अनधिकृत अतिक्रमण काढावे. अधिक प्रमाणात असलेले एखाद्या व्यक्तीचे अतिक्रमण काढून त्या जागेवरती आणि अंतर्गत रस्त्यातील अतिक्रमित रहिवाशांचे त्याच ठिकाणी जागा वाटप करून त्यांना त्या ठिकाणी शासनाच्या कोणत्याही योजनेतून घरकुल बांधून द्यावीत. थोडक्यात तेथील अतिक्रमित लोकांचे त्याच ठिकाणी रीतसर पुनर्वसन करून देऊन त्यांना जीवन जगण्याचा मूलभूत हक्क मिळवून द्यावा असा उपोषणकर्त्यांचा हेतू आहे. या ठिकाणी ज्यांचे अतिक्रमण आहे अशा जवळपास 80 टक्के रहिवाशांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना आपला पाठिंबा व्यक्त केलेला आहे, करीत आहेत. मात्र ज्यांनी अती अतिक्रमण करून अधिक जागा बळकवलेल्या आहेत, अनधिकृत बांधकामे केलेली आहेत, काहीजण अद्यापही अनधिकृत बांधकामे करीत आहेत. स्वतः आणि स्वतःच्या सगे सोयऱ्यांचे भले होण्यासाठी आपल्याच दलित बांधवांचा जीवन जगण्याचा हक्क हिरावून घेणाऱ्यांकडून या उपोषणावर प्रचंड दहशतीचे दडपणाचे आणि तणावाचे सावट निर्माण करण्यात आलेले आहे. उपोषणास पाठिंबा देणाऱ्या वयोवृद्ध महिलाना दमबाजी करणे, घालून पडून शिव्या देणे, मुद्दामहून भांडण उकरून काढणे, नाहीत्या कुरापती करणे, नाहक शिवीगाळ करणे इत्यादी विविध मार्ग त्यांच्याकडून अवलंबिने मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उपोषणकर्त्यांना पाठिंबा देऊ नका नाहीतर बघून घेऊ. एवढेच नव्हे तर उपोषणकर्त्यांच्या नावाने या वृद्ध महिलांसमोर अर्वाचे भाषेत शिवीगाळ करणे अशा नानाविध प्रकारे त्रास देणे मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. असेही उपोषणाच्या 9 व्या दिवशी उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या वयोवृद्ध महिलांनी सांगितले. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी या उपोषणाकडे चक्क पाठ फिरवली आहे. एवढेच नव्हे तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील तमाम पत्रकारांनीही जाणीवपूर्वक या उपोषणाकडे कानाडोळा केलेला आहे तथापी जेष्ठ उपोषणकर्त्यांचे वारंवार सांगण्यावरून काही दैनिकां च्या वार्ताहरांनी बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. मात्र अद्यापही काही दैनिकांच्या वार्ताहरांनी आम्ही बातम्या पाठविल्या आहेत पण लागल्या नाहीत असे सांगितले. उपोषणाच्या बातम्या तयार करून देऊन त्यांना वारंवार सांगूनही बहुतांशी पत्रकारांनी दहा दिवसात अंकाला बातम्या लावलेल्या नाहीत. त्यांच्या या असहकार्याच्या आणि दलितांप्रती असलेल्या उदासीन भूमिकेबद्दल उपोषणकर्ते नायकुडे यांच्यासह सर्वांनी नाराजी व्यक्त केली.उपोषणाच्या 9 व्या दिवशी सखुबाई सदाशिव धाईंजे, लोचना मोहन जाधव, विजया पांडुरंग गायकवाड, अभिजीत विलासनंद गायकवाड, सागर मोहन धाईंजे, विनायक आगंध गायकवाड, आप्पा निवृत्ती मोरे महाराज, शंकर धर्मा पाटील, सुरेखा राजेंद्र लोंढे, नवनाथ शिवाजी कांबळे, राजू रामा जाधव, भारत महादेव वाघमारे, सागर सिद्धार्थ जगताप, अनिल तानाजी साठे, राजू आगंद गायकवाड, दीपक विलास धाईंजे, सदाशिव ज्ञानोबा धाईंजे, राजेश रमेश पलंगे, निलावती भारत वाघमारे, युवराज सदाशिव धाईंजे, सुरेखा राजेंद्र लोंढे, यश आदिनाथ जाधव, जयश्री मोहन धाईंजे, वैशाली रोहिदास धाईंजे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट अकलूज शहराध्यक्ष राजीव हरिभाऊ गायकवाड, सुभाबाई हुंकार भोसले, मानव कल्याण संरक्षण पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने. इत्यादींनी उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा दर्शविला. अकलूज पोलीस ठाण्याच्या वतीने उपोषण स्थळ परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तरीही उपोषणास पाठिंबा देणाऱ्यांच्या मनामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे. कदाचित उपोषणावर प्रचंड दहशत आणि दडपणाचे सावट पसरल्यामुळेच पाठिंबा देणाऱ्यांची संख्या आज लक्षणीय पणे घटलेली दिसली. उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या महिलांना विविध मार्गाने त्रास देणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध रीतसरपणे पोलिसांकडे दाद मागण्यात येईल असे उपोषणकर्त्यांनी सांगितले. त्याचबरोबर “उपोषणास पाठिंबा म्हणून आम्ही आमरण उपोषणास तुमच्या शेजारी बसणार आहे असा हट्ट दोन दिवसापासून ज्येष्ठ नागरिकांनी धरलेला आहे.” अशी ही माहिती उपोषणकर्त्यांनी सांगितली.
🟣आमरण उपोषणाव्दारे उपोषणकर्त्यांना पाठिंबा
मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी उपोषणा च्या अकराव्या दिवसापासून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणकर्त्यांच्याच शेजारी उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी पाठिंबा म्हणून तीन ज्येष्ठ नागरिक आमरण उपोषणास बसणार आहेत. सखुबाई सदाशिव धाईंजे (वय वर्ष 66), लोचना मोहन जाधव (वय वर्ष 70), भारत महादेव वाघमारे( वय वर्ष 65), या तीन जेष्ठ नागरिकांनी आमरण उपोषणाबाबत रीतसरपणे प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन, आणि अकलूज नगर परिषदेस कळविलेले आहे. पाहूया उपोषणाच्या अकराव्या दिवशी पाठिंबादर्शक सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाची किमया काय होतेय ते!थ