दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथे जागतिक महिला दिन संपन्न

दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथे जागतिक महिला दिन संपन्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
अकलूज दिनांक 09/03/2024 :
दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथे ८ मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात सर्व महिला शिक्षिकांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रारंभी हायस्कूल चौकातील गेटपासून व्यासपीठा पर्यंत मुलींनी शिक्षिका सविता क्षीरसागर, वैशाली पांढरे,उमा महामुनी, रजनी चवरे,किशोरी चौरे,वैशाली बनकर,रूपाली नवले,मनिषा नलवडे,मेघा जोशी,सविता पोटे, सुप्रिया झगडे,निशा दळवी,आशा रानमाळ,सुवर्णा पोळ,कांताबाई सर्जेराव,अफसाना शेख यांचा हातात हात घेऊन व्यासपीठावर स्थानापन्न केले व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले “बाई हि शिवबाची तलवार “हे छान गीत ईश्वरी गोरे प्रणाली घोळवे, तनिष्का गायकवाड यांनी गायले तर वैष्णवी नेवसे हिने महिला दिनावर कविता सादर केली. सिद्धी हेगडकर,पल्लवी माळी, सृष्टी बनकर साईप्रिया यादव, शिक्षिका रजनी चवरे यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य कल्लापा बिराजदार, उपप्राचार्य रितेश पांढरे सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमास इ.७ वी मधील विद्यार्थिनी समीक्षा शिंदे,वैष्णवी राठोड,वैभवी वाघमारे,श्रेया कांबळे,श्रावणी कोळी,कोमल चोरमले,शुभ्रा लोंढे,श्रेया काटे तसेच शिक्षक संजय बांदल,रणजीत लोहार, बाळासाहेब सोनवणे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी काळे हिने केले तर श्रावस्ती कांबळे हिने आभार मानले.