पवारसाहेबांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाचा खेळखंडोबा केला

पवारसाहेबांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाचा खेळखंडोबा केला
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
अकलूज दिनांक 09/03/2024 :
राजकारणात जर कोणती कर्तृत्वान व्यक्ती नसेल तर ते बारामतीचे करामती करणारे एकमेव जादुगार रघुवीर शरदचंद्र पवारसाहेब आहेत त्यांनीच तर महाराष्ट्रातील राजकारण नासवल व कुजवल आहे इतकंच नव्हे तर ते सर्वतोपरी लयाला घालवल आहे , कारण तुम्हाला आम्हाला सतत प्रत्येक गोष्टीचं कारण हवं असतं म्हणून त्या सर्व नाशालाही कारण असतं त्यामुळे
कारणाशिवाय कोणत्याही गोष्टी होत नाही हेच खरं वास्तव आहे , परिणामी पवारसाहेब हे राजकीय दूधात मिठ घालून ते कसं नासवता येईल याची पुरेपूर काळजी घेतात हे मी विनाकारण लिहित नाही त्याला काही संदर्भ आहेत .
शरदचंद्र पवारसाहेबांच्या राजकारणाच्या आतील खुबेगिरी ज्यांना माहित आहे त्यांनी कधीच साहेबांना सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे साहेबांच्या राजकीय जीवनात काहीच फरक पडला नाही पण जसा आपला पुतण्या आपल्यापासून वेगळा होतोय हे कळताच साहेबांसमोर याच जन्मी केलेल्या केलेल्या आपल्याच कर्माची कहाणी समोर आली तेंव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली , याच साहेबांनी दहा वर्षांपूर्वी भाजप – शिवसेनेचे सरकार बिनदिक्कतपणे येणार आणि आमच्या पक्षाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मतदारांनी दिला आहे असं सांगत अगदी ऐनवेळी शिवसेनेला वगळून भाजपला बाहेरून पाठिंबा दिला याचा अर्थ काय ? तर त्याचा अर्थ स्वतः साहेबांनी एका नव्हे तर दैनिक सामनाच्या कार्यकारी संपादक असलेल्या व विश्व प्रवक्त्याची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारून आपल्या अकलेचे तारे तोडणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की भाजप व शिवसेनेमध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून मी जाणीवपूर्वक भाजपला बाहेरून पाठिंबा दिला परिणामी त्यामुळे शिवसेनेचा वाघ दुखावणार व तो भाजपचा पुढच्या काळात चावा घेणार हे मला माहीत होते आणि अगदी नेमके तेच झाले .
त्यावेळी भाजपने शिवसेनेला मंत्रीमंडळात अतिशय हिन वागणूक दिली म्हणून शिवसेनेचे महाभ्रष्ट व भाईगिरीत मश्गूल असणारे मंत्री रामदास कदम यांच्यासह अनेक मंत्री खिशात राजीनामे घेवून फिरत होते त्यात पक पक पकाक करणारे आजचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे सुद्धा आघाडीवर होते पण त्यांनी काही केल्या खिशातील न लिहलेला राजीनामा पाच वर्षांत बाहेर काढला नाही , पण यातून शिवसेना व भाजपमधील अंतर्गत जळफळाट बाहेर आला याचीच तर आम्ही विरोधक वाट पाहत होतो असा अनाहूत अभिप्राय देण्यात शरदचंद्र पवारसाहेब मश्गूल होते पण त्याचा थांगपत्ता शिवसेनेला नव्हता कारण त्यावेळी सत्तेच्या मदमस्तीत राऊतांसह सर्वच ‘तारे’ मोजत होते , हे सर्व जाहीर व्यासपीठावर झालेल्या एका मुलाखतीत साहेबांनी आपली करामत काय किंवा यापेक्षा कुरापत सांगितली पण त्याकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधीच गांभीर्याने पाहिले , ना त्यावर विचार करून मलमपट्टी केली मग त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि अखंड शिवसेनेला नुसते भगदाड पडले नाही तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वकष्टाने स्थापन केलेल्या शिवसेनेला बारामतीच्या करामतखोराने लिलया मुंबईचा धोबीघाट दाखवला हीच तर त्यांनी शिवसेनाप्रमुखांशी असलेल्या मैत्रीचा केलेला राजकीय सौदा होता .
मग नियतीने बारामतीच्या काटेवाडीचा सुड उगवायचा तो हळुवारपणे उगवला आणि याच करामती करणाऱ्यांना त्यांनीच केलेल्या कर्माची फळे चाखायला मिळत गेली आणि त्यातून तर त्यांचे पुतणे अजितदादा पवार हे भाजपच्या गळाला लागले , आणि एका दिवसात नाही तर एका तासात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भगदाड पडले हे कशाचे द्योतक आहे . अहो नियती नावाचा शब्दकोश ज्यांना माहित नाही त्यांना नितीमत्ताच्या बाता कराव्या वाटतात यापलिकडे दुसरं काही असू शकत , आता काय तर महाविकास आघाडीच्या भंगारात निघालेल्या गाड्याला वंगण घालण्याच काम याच बारामतीकरांच सध्या सुरू आहे पण त्यातही वंचितांच्या प्रकाश आंबेडकरांनी वाटेमारी करून आपल्या तिरप्या चालिचे दर्शन घडवलं आहे , त्यामुळे या महाभकास आघाडीच्या नादाला न लागता आंबेडकरांनी आपलं बुध्दीचातुर्य दाखवून आपला सवतासुभा केला असल्यात जमा आहे कारण या आघाडीच्या इंजिनात राॅकेल काय किंवा पेट्रोल कोण आणि कधी घालणार याचा पत्ताच नाही कारण या आघाडीला मतांचा दाम नाही तर काम कोण करणार ? अशी तिकडमबाजी सुरू आहे म्हणून मग निकालानंतर सगळा कपाळमोक्ष ईव्हीएम मशिनवर आहे .
राजाभाऊ त्रिगुणे
सातारा .
दिनांक -०७/०३/२०२४ .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक