आपला जिल्हाप्रेरकमहाराष्ट्र

जि.प.शाळांमध्ये विज्ञान शिक्षक संख्या कमी असलेबाबत आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा विधानपरिषदेत प्रश्न.

🔵सेवानिवृत्त शिक्षकांमधुन तात्पुरत्या स्वरुपात विज्ञान शिक्षक भरणारः शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

जि.प.शाळांमध्ये विज्ञान शिक्षक संख्या कमी असलेबाबत आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा विधानपरिषदेत प्रश्न.

🔵सेवानिवृत्त शिक्षकांमधुन तात्पुरत्या स्वरुपात विज्ञान शिक्षक भरणारः शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

मुंबई दिनांक 25/7/2023 :
राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या आरेखानुसार जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये ४५ पटसंख्या असलेल्या वर्गासाठी विज्ञान व भाषा या विषयाचे दोन शिक्षक असणे बंधनकारक आहे. परंतू सोलापूर जिल्हा परिषदेच्या २ हजार ७९८ शाळांपैकी बहुतांश शाळांमध्ये विज्ञान विषयाचे शिक्षकच नाहीत १२ वी विज्ञान धारक शिक्षकांना विज्ञान शिक्षक म्हणुन नियुक्ती देण्यात येत होती. ती पण शासनाने २३ जुन २०२३ मध्ये जी.आर काढुन १२ वी विज्ञानधारकांना पदवी अहर्ता प्राप्त होईपर्यंत विज्ञान शिक्षक म्हणुन पदस्थापना करता येणार नाही हे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभुमीवर आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासंदर्भात विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करून विज्ञान विषयांच्या शिक्षकांची कमतरता भरुन काढण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी शासनाकडे केली.
आ.मोहिते-पाटील यांच्या प्रश्नावर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर उत्तर देताना म्हणाले, शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी – २०२२ मधील गुणांकनाच्या आधारे राज्यातील रिक्त पदांपैकी सुमारे ३०,००० शिक्षकीय पदांची पवित्र प्रणालीद्वारे भरती करण्याची कार्यवाही सुरु आहे.तसेच, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी रिक्त शिक्षकीय पदे तात्पुरत्या स्वरूपात नवीन नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा परिषदांना दिलेल्या आहेत.
प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत झाल्यानंतर मुलांना माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षणात अडचणी येत नाहीत. त्यासाठी विज्ञान सारखा विषय पक्का होणे आवश्यक आहे. त्यासाठी जि.प शाळांमधुन गळती चालु असताना गुणवत्तावाढीसाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button