धनशैल्य शिक्षण संस्था अकलूज संचलित धनशैल्य विद्यालय गिरझणी येथे 79 वा स्वातंत्र्य दिन संपन्न

धनशैल्य शिक्षण संस्था अकलूज संचलित धनशैल्य विद्यालय गिरझणी येथे 79 वा स्वातंत्र्य दिन संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 16/8/2025 :
धनशैल्य शिक्षण संस्था अकलूज संचलित धनशैल्य विद्यालय गिरझणी आणि किडझी अकलूज या ठिकाणी 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
निवृत्त सेना अधिकारी नायक हिम्मतराव बळवंतराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रीय ध्वजास सलामी देण्यात आली.
” बालवयापासूनच अशा देशभक्तीपर उपक्रमातून देशभक्ती आणि राष्ट्रीय सद्भावना विद्यार्थ्यांच्या तनमनात रुजवून त्यांना ज्ञानामृत पाजून सुसंस्कारक्षम बनविणे हाच धनशैल्य शिक्षण संस्था अकलूज चा मुख्य हेतू आहे” असे याप्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष मनीष गायकवाड यांनी म्हटले. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेत संचलन, कवायत सह विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर वर्ग विद्यार्थी पालक आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.