सरपटणाऱ्या महाविकास आघाडीला सत्तेची सुरसुरी

सरपटणाऱ्या महाविकास आघाडीला सत्तेची सुरसुरी
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 02/01/2024 :
जनतेने दिलेला जनमताचा कौल झुगारून देऊन भाजपला स्वार्थासाठी सत्तेपासून दूर ठेवत जी अभूतपूर्व महाविकास आघाडी स्थापन झाली आणि अडीच वर्षे घराबाहेर न पडता फक्त हा काढा घ्यावा आणि तो काढा घ्यावा असे आवाहन करून ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्या महाविकास आघाडीला आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर सत्ता मिळवण्याची चांगलीच सुरसुरी आली आहे. तथापि ही सुरसुरी काही केल्या फक्त बोलाची कढी आणि बोलाचा भात अशा स्वरूपात असून त्यांची ही सत्तेची सुरसुरी असणारी भांग लोकसभा निवडणुकीत पुरती उतरणार आहे त्यामुळे या तकलादू महाविकास आघाडीला जेमतेम अठ्ठेचाळीस पैकी केवळ चार पाच जागा मिळतील तेंव्हा सतत भांगेच्या नशेत बेफाम तोंडपाटीलकी करणाऱ्या विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचा पुरता राजकीय बोजवारा उडालेला असेल परिणामी केवळ थांबा आणि पहा इतकेच बाकी आहे .
आजकाल महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना भलताच चेव चढला आहे त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने वाट्टेल ती भाजपवर मुक्ताफळे उधळून जनतेची चांगली करमणूक करत आहे. परिणामी हे सगळे एकजात हास्स जत्रेतील कलाकार आहेत आणि त्यांचे विदूषक आहेत अर्थात विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत. “अजितराव हवा बहोत तेज चल रही है , जरा टोपी संभालो” अशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर शेरेबाजी करणाऱ्या राऊतांना दादांनी डायरेक्ट सोम्या गोम्या करून टाकलं त्यावर राऊतांनी यांचे सोम्या गोम्या दिल्लीत असतात असा चिमटा काढला खरा पण याच राऊतांचा एक सोम्या मातोश्रीवर असतो तर दुसरा गोम्या सिल्व्हर ओकवर असतो हे साधं आणि सोपं गणित खुद्द राऊतांनी आपल्या अकलेचे तारे तोडून सिध्द केले याला काय म्हणावे नाही का ॽ
सरणावर जाताना जशी एखाद्या व्यक्तीची जगण्यासाठी शेवटची धडपड असते त्यापेक्षा वेगळी अवस्था शिल्लक शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता मिळवण्यासाठी सुरू आहे. परिणामी या दोन पक्षांची गलितगात्र झालेली अवस्था पाहून काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मात्र आतून चांगल्याच गुदगुल्या होत आहेत. त्यामुळे तर मातोश्रीवर जाऊन शरदचंद्र पवारसाहेब यांच्या गटाचे नेते जयंत पाटील व आधुनिक तीन बटनधारी नेते बाह्या सरसावून बैठकीत रमले असताना राज्यातील काॅंग्रेसचे झाडून सर्व नेते दिल्लीत जाऊन मुजरा करण्यात दंग होते. त्यामुळे काॅंग्रेसच्या वर्तुळात उध्दव ठाकरे काय किंवा पवारसाहेब काय यांना कुणी हिंग लावून विचारत असतील का ॽ याची कल्पना केलेली बरी. त्यात काॅंग्रेसला लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा मिळाली होती. त्यामुळे त्यांनीही उगाच फुकाचे बाण हवेत सोडू नयेत .
आजकाल शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलंबित खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांनी तर आपल्या पतीला व मुलांना पुढील दहा महिने मुंबईत येणार नसल्याचे सांगत आता आपण पुणे जिल्हातच तळ ठोकून आहोत असे जाहीर करून टाकले. याचा अर्थ ताईसाहेबांच बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येण फारच कठीण आहे. त्यामुळे त्या सध्या विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या भाषणाने भलत्याच प्रभावीत झालेल्या आहेत. त्यात त्यांच्या पिताश्रींना राऊतांची हवेतील टोलेबाजी तितकीच भावलेली दिसल्याने त्यांची गालातल्या गालात हसून चांगलीच मुरकुंडी वळली आहे. अर्थात या वयात साहेबांनी अशाच हास्य जत्रेचा मनसोक्त आनंद लुटला पाहिजे कारण त्यांनी आजपर्यंत सत्तेत असताना भरपूर काही भोगलं आहे आणि दुसऱ्याला देशोधडीला लावले आहे हे काय नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही वाचकांनो या महाविकास आघाडीच्या जत्रेतील प्रत्येक नगदी कलाकारांना भरभरून प्रतिसाद देत आपली करमणूक कशी होईल याकडे बारकाईने लक्ष देत असाल अशी माझी खात्री आहे .
राजाभाऊ त्रिगुणे .
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व पत्रकार