गाय वाचवा ! धर्म वाचवा !

गाय वाचवा ! धर्म वाचवा !
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
अकलूज दिनांक 02/03/2024 :
धर्म म्हणजे मूलभूत स्वभाव. पाण्याचा धर्म म्हणजे प्रवाहीपणा. साखरेचा धर्म म्हणजे गोडवा. सेवा करणे हाच जीवाचा खरा धर्म आहे. नुसत्या कर्मकांडावर आधारित धर्म म्हणजे अंधश्रद्धा तर नुसत्या तत्त्वज्ञानावर आधारित धर्म म्हणजे वैचारिक बुद्धीभेद वा नुसतेच वैचारिक तत्त्वज्ञान. वेदांतानुसार धर्म म्हणजेच सत्य आणि धार्मिक म्हणजे त्या सत्याकडे जाणारा माणूस. आपल्या स्वतः मधील काही गोष्टींना दूर करून माणूस हा त्या सत्याकडे जाऊ शकतो. त्या सत्याचे जेव्हा ज्ञान होईल, तेव्हा तो ज्ञानी होईल. जगात भरपूर धर्म, पंथ आहेत पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एकच धर्म म्हणजे मानवता धर्म होय. मानवता धर्म म्हणजे सर्व जीवमात्रांवर प्रेम, दया करणे व त्यांची सेवा करणे. व्यक्ती मनुष्य योनीमध्ये जन्म घेतो तेव्हा मानवता त्यांचे सोबत जोडली जाते. मानवता पेक्षा कोणताही मोठा धर्म होऊ शकत नाही.
भारत देश हा गाईला माता म्हणून संबोधतात. हिंदू राष्ट्रात गो मातेला मृत्यूच्या मुखात लोटले जाते. ती तुम्हाला त्या कर्माचे फळ देईलच. कोणत्याही जीवाला विकणे योग्य नव्हे. कसाबाला गाईला देऊ नका. गाईची सेवा केली तर तुम्हाला जन्मभर सुख मिळेल. राष्ट्रसंत लहर की बरखा मध्ये म्हणतात.
कट जायगी गौ मौत में, तब याद तुमरी लेयगी।
कर प्रार्थना प्रभूसे, तुम्हे अपना किया फल देयगी।।
किसी जीवको मत बेच भाई, तू कसाबोको कभी।
सेवा सदा कर जो बने, सुख पायगा आखिर जभी।।
गोपालन आणि गो संवर्धन हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग असलेल्या कृषिचा मूलाधार आहे. गाईला वैदिक काळापासून भारतीय धर्म आणि संस्कृतीचे प्रतिक मानले गेले आहे. प्रत्यक्ष वेद गायीला नमन करतात. ऋग्वेदातही असे म्हटले आहे की, ज्या स्थानावर गाय सुखपूर्वक निवास करते, त्या स्थानावरील धूळ देखील पवित्र होते. ते स्थान तीर्थ बनते. गायीच्या शरीरामध्ये सर्व देवांचा वास आहे म्हणून गायीला सर्वदेवमयी असे म्हणतात.
गायीच्या शरीरात सर्व , कल्पिले जे देवी-देव।
तयांचा हाचि असे भाव, गाय अधिष्ठान देशाचे।।
आपल्या पूर्वजांनी प्राणपणाने गायीचे रक्षण केले. आपण निदान आपल्या गायी गोऱ्यांना कसाबाला विकू नये. ज्या गायीने आपल्यावर अनंत उपकार केले आहेत, तिला कापण्यासाठी कसाबाकडे दिले तर संपूर्ण गावालाच हळहळ, दुःख वाटायला पाहिजे. संत गाडगे महाराज सांगतात की, “अरेरे, तुम्ही दरिद्री नारायण का झालेत? तुम्हाला देव मालूम नाही, तुम्ही बनले कसबाचे गुरु.”
गाय कसाबासी देती ।
त्याच्या संसाराची माती ।।
ज्या गो मातेने जन्मभर दूध देऊन तुमची, पोराबाळांची पोटं भरली, ती गाय म्हातारी झाली म्हणून तुम्हाला पोसवत नाही काय? तिला कसाबाला विकता? आणि तिच्या हाडामांसाचे पैसे घरात आणून पोटात घालता? काय तुम्ही माणसे आहेत की भूत? गाईला विकण्यापेक्षा गोरक्षण संस्थेला दान का देत नाही. गोरक्षणात गायीच्या आरोग्याची, चारापाण्याची उत्तम व्यवस्था असते. गाईचे उपकार जाणा. गाय कसायाला विकणे महापाप आहे. आपण कधीतरी कत्तलखाण्यात जावून बघा. “गाय वाचवा, धर्म वाचवा.”
गाईच्या लेकरांना तुम्ही दूध दिलं नाही. गाईला चार स्तन असतात. एका स्तनाचे दूध तिच्या वासराला आणि उरलेल्या तीन स्तनाचं दूध तुमच्या करिता काढून घेता. गाईला तुम्ही कत्तलखाण्यात पाठविता. त्या कत्तलखाण्यात गाईला चारापाणी न देता उपाशी ठेवल्या जाते. एकदम कडक झालेले पाणी गाईचे अंगावर टाकल्या जाते, कारण तिची कातडी अलग निघावी म्हणून तिला उलटे केले जाते. तिचे कातडे अलग, हाडे अलग आणि मांस वेगळे केले जाते.
त्या गाईने तुम्हाला बैल, वासरे, कालवड दिली. तुम्ही तिला खुट्यावर मरेपर्यंत चारापाणी देऊ शकत नाही का? गायीची कत्तल होत आहे म्हणून तर उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात हिवाळा, हिवाळ्यात उन्हाळा पडायला लागला. हे आपणास विसरुन चालणार नाही. माणसं असून असे वागू नका. माणसासारखे वागा ना?
ज्याच्या गोठ्यात गाय व घरात माय असेल तो खरा भाग्यवंत आहे. घरी गावरान गाय असावी, जर्शी गाय नको. आपल्या मायला वृद्धाश्रमात पाठविता आणि आपल्या सासू मायला घरात ठेवता, हे बरे नव्हे. महाराज म्हणतात.
दया करा काही मानवांनो।
कसायाला विकू नका गाय।।
तान्ह्याबाळाचे आईला दूध आले नसेल तर डाॕक्टर आपल्याला गावरान गाईचे दूध बाळाला पाजायचा सल्ला देतात. गाईचे दूध आईच्या दुधापेक्षा पवित्र असते. शेतकरी बंधूनों, आईचे दूध सर्वांसाठी असते काय? मुळीच नाही. गाईचे दूध सर्वांच्या मुलांकरिता उपयोगी पडते. एवढे गाईचे उपकार असताना गाईला कसायाला विकतो, तो महापापी आहे. गाईला गोरक्षण संस्थेला दान करा. गायीची सेवा तेथे योग्यप्रकारे केली जाते. ऋषी घुसरकर महाराज म्हणतात की, आपल्या देशात गाय कापल्या जाते आणि आम्ही पूजापाती करतो हे पाप आपल्याला भोगावे लागेल.
ये गैय्या कटती जाती, और हम करते पूजापाती।
तो यह पाप नही टलनेका, पडेगा हमे भरना पडेगा।।
आज गावात गाईचं शिल्लक राहिल्या नाही. पूर्वी देशात दुधाची रेलचेल होती. आता खायला दही, दुध, माखन मिळत नाही. गाय जर कापल्या जात असेल तर श्रीकृष्ण कन्हैय्या सुद्धा खुष राहणार नाही. एवढे पाप वाढले आहे. त्यासोबतच जमाना बदलेला आहे. ऋषी घुसरकर महाराज म्हणतात.
कहता है इतिहास यहाॕपर।
दुधकी नदियाँ बहती थी।
हरे भरे इस देशमें जनता।
सदा सुखमें रहती थी।
मगर आज खानेको,मिलतीना रोटी।
दही दुध माखन की, आशा ही झुटी
यहाॕपर करोडो कटती है गैय्या।
कैसे खुष रहेगा इसमें कन्हैय्या।
इस दुनियाका खेल खिलौना।
सब है उनके हाथमें।।
जमानेमें बदल आजकल पड रहा है।
जरा गौर से देखो,तो सब पाप बढ रहा है।।
राष्ट्रसंतानी गायीच्या दुधाचे महत्त्व सांगितले आहे. गायीच्या दुधात कायाकल्प करण्याचे सामर्थ्य आहे. पंचगव्य म्हणजेच दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण यांचे जसे धार्मिक महत्त्व आहे, म्हणजेच कोणताही संस्कार, कोणतेही धार्मिक विधी, कोणतेही अनुष्ठान हे पंचगव्याशिवाय पूर्ण होत नाही. तसेच यातील आयुर्वेदात अनेक व्याधींवर औषधी उपयोग सांगितले आहे. गोदुग्ध तर जराव्याधी नाशक रसायन आहे. राष्ट्रसंत गाईच्या दुधाला अमृताची उपमा देतात.आजारी व्यक्तीला गाईचेच दूध देतात.
गोदूध नित्य सेवन करता।
कायाकल्पचि होय तत्वता।।
शक्ती, चपलता, बुद्धीमत्ता।
आरोग्य हाता नित्य राही।।
राष्ट्रसंत म्हणतात की, शेती असणाऱ्याने गायीचे पालन अवश्य केले पाहिजे. गाईचे दूध, मलमूत्र वाया जात नाही. शेतीसाठी खत तयार होते. शेतीत भरघोस पिक येईल. आजकाल शेतीत रासायनिक खताचा वापर होतो, त्यामुळे जमिन निकस होते. पिकांवर किटकनाशके फवारणी केल्यामुळे अन्यधान्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
ज्याचे घरी शेती आहे।
त्याने आवश्यक पाळावी गाय।
मळमूत्र सर्व उपयोगी।
ऐसी गाय माऊली ती।।
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677