ताज्या घडामोडी

बंगालमध्ये पाचशेपेक्षा अधिक महिलांवर सामुहिक बलात्कार

बंगालमध्ये पाचशेपेक्षा अधिक महिलांवर सामुहिक बलात्कार

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 25/02/2024 :
उत्तर प्रदेशात हतरजमध्ये एका मुलीवर बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली त्यावेळी देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चिखलफेक करत होते आता तेच विरोधक पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथे घडलेल्या पाचशेहून अधिक महिलांच्या यौन शोषण व त्यातील काहींच्या हत्येबाबत का गप्प आहेत ? याबाबत काॅंग्रेस पक्षाला दिवसागणिक खड्यात घालणारे राहुल बाबा आता कोणत्या न्यायाची भाषा करून न्याय यात्रेला सुरूंग लावण्यात व्यस्त आहेत? त्यामुळे यापश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला जन्माचा धडा शिकविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला लोकसभा निवडणुकीत बेच्याळीस पैकी जवळपास तीस जागी भरघोस यश मिळू शकते वदक्षिण भारतात शंभरीचा टप्पा गाठता येईल असा तर्क एकेकाळचे ममतांच्या विधानसभा निवडणुकीतील तारणहार प्रशांत किशोर अर्थात पी.के.यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला आहे .
प्रशांत किशोर हे पश्चिम बंगालच्या मागील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विजयासाठी त्यांचे राजकीय रणणितीकार म्हणून चांगलेच नावारूपाला आले होते कारण त्यांनी भाजपचा विजयरथ शंभरी पार करू दिला नाही परिणामी ममता यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या टी.एम.सी.पक्षाला आमदारांचे दुहेरी शतक करता आले तर याच बंगालमध्ये काॅंग्रेसला दोन जागा जिकंता आल्या , तर अशा या पाशवी बहुमताच्या जोरावर ममता बॅनर्जी यांनी आपल्या मनगटाशाहीच्या जोरावर पश्चिम बंगालमध्ये राजरोसपणे धुडगूस घालायला सुरुवात केली आहे त्यामुळे या राज्यात शासन आणि पोलिस यंत्रणेचा कोणताही वचक अथवा दबदबा राहिला नाही , यापेक्षा याच राज्यात घुसखोरी करणाऱ्या बंगाली लोकांची भलतीच चैन सुरू आहे. त्यातून सर्वत्र अराजकता उसळली आहे. त्याचाच भाग म्हणून मागील काही महिन्यांपासून संदेशखाली या विशिष्ट भागात सरफराज शेख नावाच्या टी .एम.सी .आमदाराने ममतांच्या मर्जीतील उत्तम सरकार व शिबू हराना या दोन साथीदारांच्या मदतीने हैदोस घातला आहे .या संदेशखाली भागात मागील काही महिन्यांपासून मुली व महिलांवर अगणित शारीरिक द्रष्ट्या भयानक अत्याचार केले जात आहेत ज्या मुली किंवा महिला या त्रिकुटातील कोणा एकाला आवडली की त्याने संध्याकाळी मिठाई करण्याच्या ‘कोड वर्ड ‘ चा वापर करून वाड्यावर बोलवत होते ही संख्या थोडीथोडकी नसून आतापर्यंत जवळपास पाचशेहून अधिक महिलांचे केवळ यौन शोषण झाले नाही तर त्यांच्यावर सामुहिक बलात्कार झाले आहेत.यातील होरपळलेल्या काही महिलांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात आवाज उठवला असता त्यांची हत्या करण्यात आली आहे. ही संख्या सुध्दा कमी नाही. पण ममता यांनी या अत्याचार करणाऱ्या त्रिकुटांच्या टोळीला राजकीय संरक्षण दिल्यामुळे पश्चिम बंगालच्या पोलिसांनी आपले हात टेकले आहेत. त्यामुळे यातील एकही आरोपी आतापर्यंत पोलिसांना सापडत नाही. इतकी ममतांची दहशत आहे.तथापि मागील आठ दिवसांत भाजपने जनतेचा आवाज बनून संदेशखाली भागातील लोकांना भयमुक्त केले असल्याने येथील आठशेहून अधिक पिडीत कुटुंबाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यापूर्वी पोलिस फिर्याद सुध्दा घ्यायला तयार नव्हते. हे वास्तव कुणी नाकारू शकत नाही .
अशा परिस्थितीत काॅंग्रेसचा आवाज बनून या पाशवी वृत्तीला लगाम घालावा यासाठी राहुल गांधी यांना न्याय यात्रेला थोडी विश्रांती देऊन संदेशखाली भागातील पिडीत महिलांचे अश्रू पुसायला वेळ का मिळत नाही ? कारण येथे सरफराज शेख नावाचा मतपेटीतून येऊ पाहत असलेला करिष्मा त्यांच्या पडझडीला आलेल्या हवेलीच्या आड येणार हेच खरे वास्तव आहे .
येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीतील मतदार डोळ्यासमोर ठेवून काॅंग्रेस व इंडी नावाची आघाडी देशभरात जातीयवादी व सरकारविरोधात दंगली घडवून आणण्यासाठी हरियाणा व पंजाब राज्यातील काही शेतकरी दलालांना हाताशी धरून दिल्लीत शेतकरी आंदोलनातून पडद्याआड राहून अराजकता निर्माण करत आहे , तर इकडे महाराष्ट्रात आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांना हाताशी धरून शिल्लक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालना जिल्ह्यातील आमदार राजेश टोपे यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचे अवडंबर माजवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जातीयवादाचे निखालस खोटे आरोप करून त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. हे आता लपून राहिलेले नाही .
त्यामुळे जरांगे हे आंदोलनाची दाहकता वाढवण्याचा नको तितका केविलवाणा प्रयत्न करत अनेक नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहत आहे. हे कोणत्या आणि कसल्या आंदोलनाच लक्षण आहे ? पण ठाकरे व पवार यांना काही करुन भाजपचा राजकीय विजयी डाव असफल करायचा आहे पण तो या जन्मात तरी महाविकास आघाडीला शक्य नाही. कारण सत्य आणि असत्य यातील फरक मतदारांना चांगलाच कळतो आहे. त्यामुळे या माथेफिरूंना काही करायचे ते करू द्यात.

राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
दिनांक _ २५/२/२०२४ .
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button