ताज्या घडामोडी

श्री शंकर स. सा. कारखाना निवडणुकीत ६५.६३ टक्के मतदान

श्री शंकर स.सा.कारखाना निवडणुकीत ६५.६३ टक्के मतदान

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 25/02/2024 :
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण ५८७७ पैकी ३८५७ सभासदांनी मतदान केलेने मतदानाची टक्केवारी ६५.६३ टक्के झाली.माळशिरस आणि इस्लामपूर याफक्त दोन गटांमध्येच विरोधी गटाचे दोनच अर्ज राहिल्याने यादोन गटामध्येच निवडणूक लागली बाकी सर्व गट बिनविरोध झाले होते.
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या २१ जागांसाठी २३ अर्ज राहिले होते. या निवडणुकीत माळशिरस उत्पादक गटातून गोपाळराव गोरे व इस्लामपूर गटातून उत्तम बाबर हे दोन विरोधी उमेदवारांचे अर्ज असल्याने या दोन गटांमध्ये निवडणूक लागली होती. माळशिरस गटातून मिलिंद कुलकर्णी, सुरेश पाटील, महादेव शिंदे व गोपाळ गोरे तर इस्लामपूर उत्पादक गटातून बाळासाहेब माने, दत्तात्रय रणवरे, कुमार पाटील व उत्तम बाबर या दोन गटात निवडणूक झाली.
मतदान केंद्रनिहाय झालेले मतदान :
माळशिरस मतदान केंद्रातून एकूण ५७१ पैकी ४११ मतदान (७१.९८ टक्के) झाले. बोंडले केंद्रातून ४८० पैकी ३०५ मतदान (६६.३०) झाले. मांडवे केंद्रातून १५६ पैकी १४६ (९३.५९) मतदान झाले. इस्लामपूर केंद्रातून ५२९ पैकी ४२२ मतदान (७९.७७) मतदान झाले. नातेपुते केंद्रातून ४१४ पैकी २७१ मतदान (६५.४६) झाले. फोंडशिरस केंद्रातून ५०३ पैकी ३२० मतदान (६२ ६२) झाले. दहिगाव केंद्रातून ५०० पैकी ३३१ मतदान (६६.२०) झाले. बोरगाव केंद्रातून ६०० पैकी ४५६(७६.००) मतदान झाले.
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी केंद्रातून ३०३ पैकी २३२ मतदान (७६.५७) झाले.
माण तालुक्यातील म्हसवड केंद्रातून ४३५ पैकी २३१ मतदान (५३.१०) मतदान झाले. दहिवडी केंद्रातून ४४४ पैकी १५३ मतदान (३४.४६) झाले. गोंदवले बुद्रुक केंद्रातून ३७९ पैकी १४३ (७३.३७) मतदान झाले.
करमाळा तालुक्यातील वांगी केंद्रातून ६५ पैकी ५६ ( ८६.१५) मतदान झाले.
माढा तालुक्यातील अकोले खुर्द केंद्रातून २२५ पैकी १८९ मतदान (८४.००) झाले. आढेगाव केंद्रातून २९३ पैकी १९१ मतदान (६५.१९) झाले. असे एकूण ५८७७ पैकी ३८५७ मतदान होऊन ६५.६३ टक्के मतदान झाले. यानिवडणुकीसाठी १५ बूथवर मतदान झाले. त्यापैकी सर्वाधिक मतदान टक्केवारी(93.59) मांडवे मतदान केंद्रावर तर सर्वात कमी मतदान टक्केवारी(34.46) दहिवडी मतदान केंद्र येथे नोंदली गेली.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button