अकलूजच्या रत्नाई कृषी महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहाचा शुभारंभ

अकलूजच्या रत्नाई कृषी महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहाचा शुभारंभ
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/02/2024 : येथील रत्नाई कृषी महाविद्यालयमध्ये युगंधर क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहाचे दि. 20 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत आयोजन केले आहे. यामध्ये रस्सीखेच, हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ, क्रिकेट इत्यादी स्पर्धांचे आयोजन केलेले आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रांगोळी स्पर्धा, चेहरा रंगरंगोटी, चित्रकला, मेहंदी, ट्विन्स डे, गॉगल डे, मिस मॅच डे आणि ट्रॅडिशनल डे इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा प्राचार्य आर.जी.नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असून क्रीडा शिक्षक प्रा.पी.एस.पांढरे तसेच सांस्कृतिक विभागाचे प्रा.एस.आर.आडत, प्रा.एन.बी.गाढवे तसेच पंच म्हणून डॉ.डी.एस.ठवरे, प्रा.डी.ए.मेटकरी, प्रा.आर.व्ही.कणसे, डॉ.एस.आर.माने काम पाहत आहेत.
क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.