23 फेब्रुवारी पासून गाळपास येणा-या ऊसाकरीता प्रति मे. टन शंभर रुपये अनुदान : जयसिंह मोहिते पाटील

23 फेब्रुवारी पासून गाळपास येणा-या ऊसाकरीता प्रति मे. टन शंभर रुपये अनुदान : जयसिंह मोहिते पाटील
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 21/02/2024 :
दिनांक २३/०२/२०२४ पासून पुढे गाळपास येणा-या सभासद व बिगर सभासद यांचे संपुर्ण ऊसाकरीता (यापुर्वी अनुदान जाहीर केलेला आडसाली ऊस वगळून) प्रती मे.टन रक्कम रु.१००/- (रु. शंभर फक्त) इतके अनुदान दिपावली सणापुर्वी द्यावयाचे धोरण ठरले असले बाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी दिली.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२०२४ चा गळीत हंगाम दि. १/११/२०२३ रोजी सुरू झालेला असून गाळपास आलेल्या ऊसाकरीता प्रथम ॲडव्हान्स रक्कम रु.२,६००/- प्रमाणे अदा करण्यात येत आहे. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. चालू गळीत हंगाम २०२३-२०२४ मध्ये १० लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट संचालक मंडळाने ठेवले असून आज अखेर ८,६२,४९० मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे. सर्व ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद यांनी कारखान्यास ऊस पुरवठा करावा असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी केले. सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, भिमराव काळे, अमरदिप काळकुटे, गोविंद पवार, सुभाष कटके, जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक, प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, कालीदास मिसाळ, दत्तात्रय चव्हाण, विनायक केचे, राजेंद्र भोसले, अमृतराज माने- देशमुख, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, अनिलराव कोकाटे, श्रीकांत बोडके, सौ. हर्षाली निंबाळकर, श्रीमती पुष्पा महाडीक तसेच सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.