ताज्या घडामोडी

रत्नत्रय शैक्षणिक संकुल ग्रामीण भागाचे वरदान: आ. राम सातपुते

रत्नत्रय शैक्षणिक संकुल ग्रामीण भागाचे वरदान: आ. राम सातपुते

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 16/02/2024 :”सदाशिवनगर येथील दोशी परिवार हा ध्येयवेडा परिवार आहे. त्यांच्यामुळेच यापरिसरातील गोरगरीब, मजूर,शेतकरी वर्गास दर्जेदार शिक्षण मिळत आहे. रत्नत्रय शैक्षणिक संकुल ग्रामीण भागाचे वरदान आहे. असे मत आ.राम सातपुते यांनी व्यक्त केले.रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संचलित, रत्नत्रय इंग्लिश मेडियम, विद्यालय वकनिष्ठ महाविद्यालय मांडवे याशाळेचा 12 वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. त्यावेळी आमदार सातपुते बोलत होते. दोशी परिवार हायशस्वी उद्योजक परिवार आहे. भविष्यात याशैक्षणिक संकुलात महाविद्यालय, मेडिकल सुरू होईल हाआत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. दोशी परिवार हास्वतःपेक्षा समाजास केंद्रस्थानी ठेवून काम करीत आहे, याचे मला खूप समाधान आहे व त्यांनी पुढे संस्थेच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.
उमंग 2024 या संकल्पनेवर आधारित भारतीय लोकनृत्य कलेचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये वेगवेगळ्या 27 गीतांमध्ये 512 विद्यार्थी सहभागी होते. त्यावेळी विविध गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन पूजन व रंगमंचाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रमोद अनंतलाल दोशी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला. तसेच त्यांनी वर्षभरामध्ये संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घेण्यात आलेले विविध उपक्रम व भविष्यात घेण्यात येणारे वेगळे उपक्रमाची माहिती दिली. संस्थेच्या व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विद्यार्थी पालक संचालक मंडळ हे सर्व दक्ष असून अल्पवधी काळातच संस्थेची भरभराट झाली असल्याचे त्यांनी सांगितले.त्याचबरोबर इयत्ता दहावी व बारावीचा निकाल संस्थेच्या स्थापनेपासून ते आज पर्यंत शंभर टक्के निकाल लागत असल्याचे सांगितले. विविध क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे असे त्यांनी सांगितले.


सदर प्रसंगी आ. रामभाऊ सातपुते, संजीव जैन चेअरमन, सत्यम बुक्स पालघर, विकासकुमार बाकलीवाला शिक्षणप्रेमी पुणे , प्रीतम शहा युवा उद्योजक पुणे, धनंजय देशमुख (गटशिक्षणाधिकारी माळशिरस)
अनंतलालदादा दोशी(संस्थापक अध्यक्ष रत्नत्रय परिवार सदाशिवनगर),रामानुज मर्दा मंगळवेढा, सपना बाकलीवाल
निराली शहा,संतोषकुमार सिंग,मॅनेजर सत्यम बुक्स पालघर, सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी, सदाशिवनगर चे सरपंच वीरकुमार अनंतलाल दोशी,संस्थेचे सचिव प्रमोद अनंतलाल दोशी, उपाध्यक्ष विशाल गांधी, सहसचिव अभिजीत दोशी, व्यवस्थापक वैभव शहा, अमित गांधी, अभिजीत दोभाडा, वीरेंद्र दोबाडा, बाहुबली दोशी , विठ्ठल अर्जुन, सुरेश धाईंजे, सनतकुमार गांधी, निलेश गांधी, रामदास कर्णे,बबन गोपने महादेव सपकाळ, देविदास ढोपे, सतीश बनकर, चंद्रकांत तोरणे,राहुल पिसे, विष्णू भोंगळे, दत्ता भोसले, तुषार ढेकळे, मृणालिनी दोशी, विनयश्री दोशी, भाग्यश्री दोशी,पुनम दोशी , रेश्मा गांधी,धनश्री दोशी, ज्योती राऊत, पार्वती जाधव, सर्व पालक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणदिवे, आभार प्रदर्शन अमित पाटील यांनी केले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button