ताज्या घडामोडी

“काँग्रेस मुक्त भारता ‘ऐवजी, भ्रष्टाचार युक्त भाजपा होतोय”! – विठ्ठल पवार राजे

“काँग्रेस मुक्त भारता ‘ऐवजी, भ्रष्टाचार युक्त भाजपा होतोय”! – विठ्ठल पवार राजे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 15/02/2024 : “काँग्रेस मुक्त भारता ‘ऐवजी, भ्रष्टाचार युक्त भाजपा होतोय”! असा घनाघाती आरोप शेतकरी विचार मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय प्रवक्ते विठ्ठल पवार राजे यांनी अमरावती येथील पत्रकार परिषदेमध्ये केला.
भाजपाकडून भ्रष्टाचाराची गटार साफ करत असताना काँग्रेस मुक्त भारताऐवजी भ्रष्टाचाराने बरबटलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन काँग्रेस ऐवजी भाजपाच भ्रष्टाचार युक्त पक्ष झाल्याने नागरिकांमध्ये भाजपा व त्यांच्या नेत्यांविषयी संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. त्याला भाजपमधील नेतेच जबाबदार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस मधील भ्रष्ट नेते जेल ऐवजी भाजपमध्ये गेल्याने २०२४ ला काँग्रेस मधील कट्टर व जुन्या जाणत्या कोऱ्या पाट्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीत संधी मिळनार असल्याने काँग्रेस चे प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारताच्या प्रजासत्तेला अमृत महोत्सव साजरा होत असताना गेल्या साडेसात दशकांमध्ये देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कष्टकरी कामगारांचा सहकार लुटून गडगंज झालेली भ्रष्ट काँग्रेसची गटार हे वास मारत होते. म्हणून भारतीय जनतेने 2014 ला मोदीजी को लाने वाले है मान्य केलं! आणि गेल्या साडेसात दशकात काँग्रेस मधील नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची गच्च भरलेली गटारं वास मारत होती! ती भ्रष्टाचाराची गटार साफ करण्याचं मोफत कॉन्ट्रॅक्ट हे भारतामधील सर्वात मोठ्या पक्षाने हाती घेतल्याने “काँग्रेसमध्ये मुक्त भारताऐवजी भ्रष्टाचार युक्त भाजपा” कार्यक्रम सुरू असलेल्याने काँग्रेसमध्ये 2014 निवडणुकीमध्ये कदाचित भारतामध्ये प्रोग्राम उलटू शकतो आणि भाजपा हा तिसरा क्रमांक जाऊ शकतो अशी परिस्थिती भाजपाने कोणतेही कारण नसताना भ्रष्टाचारी लोकांना भाजपमध्ये घेऊन काँग्रेसमुक्त भारताऐवजी भ्रष्टाचार नियुक्त भाजपा करून घेतल्याने भाजपाने स्वतःहून निवडणुकीच्या तोंडावर संकटमोही परिस्थिती निर्माण केलेली आहे. अशी माहिती शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी अमरावती येथे दिली ते पत्रकारांशी बोलत होते. जे काम काँग्रेसला गेल्या साडेसात दशकात जमलं नाही ते काम दोन-चार वर्षात भाजपाने करून दाखवलं त्या मुळे काँग्रेस मध्ये अनेक वर्षांपासून रखडलेल्या कार्यकर्त्यांत, युवकांत मोठी संधी उपलब्ध झाली असल्यामुळे काँग्रेसमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. जरी भाजपला वाटत असले की काँग्रेस मुक्त भारत करत आहोत तर ते तसं नसून भ्रष्टाचार गटर मुक्त भारत होत! असताना भाजपा मात्र कलंक भ्रष्ट चारी मुक्त काँग्रेस आणि भारत करत भ्रष्टाचार्यांना वाचवण्यासाठी पुढाकार घेतलेला भ्रष्ट भाजपा पक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असल्याची माहिती राजे पवार यांनी यावेळी दिली.
दिनांक ०८ जानेवारी २०२४ पासून शेतकरी संघटनांचे सुरू असलेलं बेमुदत संप, आंदोलनाच्या माध्यमातून शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने महाराष्ट्र राज्यात शेतकरी संवाद यात्रा आंदोलन सुरू केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज ते अमरावती येथे शेतकऱ्यांच्या भेटी गाठी साठी आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अमरावती जिल्ह्याचे शेतकरी नेते राज्याचे मंत्री दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांची भेट घेतली. त्यावेळी शेतकरी चळवळ व प्रहार चे अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष व विदर्भ विभागाचे अध्यक्ष महिला व पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button