ताज्या घडामोडी

“महिलांना विमानाने मोफत तिरुपती बालाजी दर्शन घडविण्याचा संकल्प” : महादेव कावळे, डॉ.निलेश ननवरे

“महिलांना विमानाने मोफत तिरुपती बालाजी दर्शन घडविण्याचा संकल्प” : महादेव कावळे, डॉ.निलेश ननवरे

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 3 जानेवारी 2025 :

महिलांना विमानाने मोफत तिरुपती बालाजी दर्शन घडविण्याचा संकल्प समाजसेवक महादेव कावळे आणि डॉ.निलेश ननवरे यांनी सोडला आहे. त्यांनी हा संकल्प महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार रामभाऊ सातपुते, माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सोडला आहे.


सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबात महादेव कावळे व डॉ.निलेश ननवरे यांचा जन्म झालेला आहे. “समाजाची व जनतेची सेवा करण्याकरिता घरची परिस्थिती कशीही असो मात्र, मनाची श्रीमंती लागते” याचाच प्रत्यय सामाजिक कार्यकर्ते महादेवराव कावळे व डॉक्टर निलेश ननवरे यांच्या सामाजिक कार्यातून पहावयास मिळत आहे.
कोरोना महामारीच्या काळामध्ये ३०० महिलांना रोज सकाळ-संध्याकाळ जेवणाचे डबे घरपोच केले जात होते.खऱ्या अर्थानं माणुसकीचे दर्शन कोरोनाच्या कालावधीत पाहावयास मिळत होते.अशा कठीण परिस्थितीत गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचे काम केलेले आहे. गोरगरीब व सर्वसामान्य महिलांना स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी आजपर्यंत २०० शिलाई मशीनचे वाटप केलेले आहे.गरीब परिस्थितीमुळे शाळेमध्ये जाण्याकरिता शालेय मुला मुलींना २०० सायकलचे वाटप करण्यात आलेले होते. कुडाच्या काडाच्या घरामध्ये लोकांची अडचण होती, यासाठी १२५ कुटुंबांना पत्र्याचे वाटप करून त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत.
माळशिरस नगरपंचायत हद्दीमधील ३७५ महिलांना ट्रेनने बालाजी दर्शन घडवलेले आहे. १२५ महिलांना विमानाने बालाजी दर्शन घडविलेले आहे. उर्वरित महिलांना तिरुपती बालाजीचे दर्शन विमानाने घडविण्याचा संकल्प केलेला आहे. दरवर्षी २०० महिला तिरुपती बालाजी दर्शनासाठी घेऊन जाणार आहेत.सदरच्या महिलांचे विमान सेवेचे तिकीट काढण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे.तिरुपती बालाजी दर्शन जाण्यासाठी अनेक महिला इच्छुक आहेत,त्या महिलांना विनंती आहे की त्यांनी महादेव कावळे (९९२२८३४२३२) व डॉक्टर निलेश ननवरे (९७६६४९९१००) या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा. श्रावण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तिरुपती बालाजी दर्शनाची मोहीम विमानाने जाणार आहे.तरी इच्छुक महिलांनी या नंबरवर संपर्क साधावा, असे महादेव कावळे व डॉ.निलेश ननवरे यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button