अकलूज आगाराच्या एसटी ड्रायव्हर व कंडक्टर यांचा मनमानी कारभार

अकलूज आगाराच्या एसटी ड्रायव्हर व कंडक्टर यांचा मनमानी कारभार
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 08/10/2023 :
एसटीची सेवा ही जनतेच्या हितासाठी असून ती एसटी ड्रायव्हर व कंडक्टर यांच्या सोयीसाठी नाही. फक्त बस स्थानकाची रंगरंगोटी व सुशोभीकरण करून जनतेची सोय होत नसते हे कर्मचाऱ्याने व आगर प्रमुखांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
दिनांक 8/10/23 रोजी संध्याकाळी ठीक 5 :15 वाजता अकलूज आगारा ची बस क्रमांक MH 14 , BT 1190 ही बस टेंभुर्णी वरून अकलूज ला निघालेली होती. सदरची लोकल/ साधी बस सव्वा पाच वाजता टेंभुर्णी ते अकलूज रोडवरील माळेगाव पाटी येथे आली असता सौ. सुवर्णा शेंडगे या महिला प्रवाशाने अकलूजला येण्यासाठी सदर बसला बस थांबणेठी हात केला असता एसटी ड्रायव्हरने सदरचा बस थांबा अधिकृत असताना देखील त्या ठिकाणी बस थांबविली नाही.
वास्तविक ड्रायव्हरला ही बस शेवटची बस आहे हे माहित असताना देखील बस न थांबून ड्रायव्हरने मनमानी करून प्रवाशांची गैरसोय केली.
वास्तविक बस चालकाने महिला प्रवाशांची शेवटची बस व वेळेचे भान ठेवून, विशेष काळजी घेऊन सदर बस थांबवून प्रवाशांची सोय करणे अपेक्षित होते. फक्त महिलांचे अर्धे तिकीट करून अथवा वृद्धांसाठी मोफत प्रवासाच्या बाता करून महामंडळाने प्रवाशांची सहानुभूती न घेता प्रत्यक्ष प्रवाशांची सोय कशी होईल हे बघणे महत्त्वाचे आहे. याकरिता महामंडळाने सर्व ड्रायव्हर व कंडक्टर यांना मनमानी, अरेरावी न करणे बद्दल योग्य त्या सूचना / समज देणे गरजेचे आहे.
काही बेशिस्त ड्रायव्हर व कंडक्टर यांच्या मनमानी व अरेरावीच्या भाषेबद्दल प्रवाशातून संताप व्यक्त होत आहे. “मोफत व अर्ध्या तिकिटाची भीक नको पण कुत्रे आवर” अशी म्हणण्याची पाळी प्रवाशात निर्माण झाली आहे. महामंडळाने अशा कर्मचाऱ्यांवर वेळीच कारवाई करणे योग्य होणार आहे, नाहीतर “बुडत्याचा पाय खोलात” असे म्हणण्याची वेळ लवकरच येईल हे मात्र नक्की. अशा मजकुराचे पत्र बबनराव शेंडगे (अध्यक्ष, ग्राहक संरक्षण सेल, माळशिरस तालुका काँग्रेस.) यांनी अकलूज वैभवला प्रसिद्धीसाठी पाठविले आहे.