ट्रॅव्हलबस व दुचाकीच्या अपघातात दोन जिवलग मित्रांचे निधन

ट्रॅव्हलबस व दुचाकीच्या अपघातात दोन जिवलग मित्रांचे निधन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 04/02/2024 :
येथील सहकार महर्षि कारखान्याच्या पेट्रोल पंपासमोर ट्रॅव्हल्स बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोन जिवलग मित्रांचे निधन झाले आहे. ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अकलूज पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकास अरुण रिसवडकर (वय:२९) व बॉबी उर्फ शुभम शिवाजी पांढरे ( वय:२९) हे सदभाऊ चौक येथुन सहकार महर्षि कारखान्याच्या पेट्रोलपंपावर स्कूटीवरुन पेट्रोल भरण्याकरिता जात असताना निखील ट्रैवल्सची गाडी नं एनएल ०१ बी ३०१३ या गाड़ीचा चालक अक्षय शिवाजी ननवरे रा खुड्स, ता माळशिरस याने स्वतःचे ताब्यातील वाहन जोराने, हयगयीने चालवुन स्कुटीला धडक दिल्याने गंभीर दुखापत होवुन त्यात ते मयत झाल्याबाबतची तक्रार दिली. अकलूज पोलिसांनी चालका विरुध्द भारतीय दंड संहिता १८६० कलम २७८,३०४-अ,३३६,३२०,१८६,४२७ व,मोटरवाहन अधिनियम, १८४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास एपीआय चौधरी करीत आहेत.
विकास रिसवडकर आणि शुभम पांढरे हे लहानपणापासूनचे जिवलग मित्र होते या दोघांचा एकाच वेळेस अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आहे. या दोघांचा अकलुज येथील अकलाई मांदिराजवळील स्मशान भूमीत एकाचवेळी अंत्यविधी करण्यात आला.