“मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकाचे कुटुंबीयांनी जल्लोषात स्वागत करावे,” विठ्ठल राजे पवार यांचे जाहीर आव्हान

“मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकाचे कुटुंबीयांनी जल्लोषात स्वागत करावे,” विठ्ठल राजे पवार यांचे जाहीर आव्हान
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 27/01/2024 :
“मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकाचे कुटुंबीयांनी जल्लोषात स्वागत करावे,”असे जाहीर आवाहन शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचेराष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी केले आहे.
“गरजवंत मराठा समाजाचे मराठा आरक्षण इंडिया विरुद्ध भारताच्या चौथ्या मराठा समाजाचे निर्णायक आरक्षण युद्धातील, मराठा आंदोलनातील योद्धाचे धार संस्थान राजे पवार कुटूंबीयांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मराठा संघर्ष योद्धा मराठा वीर शेतकरी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी ते मुंबई संघर्ष आंदोलनातील युवा मराठा आंदोलक रवी राणा उर्फ प्रेमजीतसिंह राजे पवार यांचे कुटुंबियांकडून शनिवार दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी जल्लोषात स्वागत झाले.भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिना नंतरच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २७ जानेवारी २०२४ रोजी भारत भरा दिपावली साजरी, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताचे इतिहासातील पहीला विजय घडला. मराठा वीर संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात कोट्यावधी मराठा युवकांनी मुंबईवर चाल करून ट्रिपल इंजिन सरकारला गुडघे टेकायला लावले, त्या मराठा आरक्षण आंदोलनाचे साक्षीदार व आंदोलनाच्या युद्धामध्ये सहभागी झालेल्या युवा मराठा आंदोलकांचे त्यांच्या प्रत्येक कुटुंबीयांनी जल्लोषात स्वागत केले. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात कोट्यवधी मराठा युवा, युवती जेष्ठ शेतकरी कष्टकरी कामगार महिला बालगोपाळांनी कोटींच्या उपस्थितीत मुंबईला धडक दिली आणि मराठा आरक्षणाचे मराठे विरुद्ध निर्दयी ट्रिपल इंजिन सरकार विरुद्धचे गेल्या ७५ वर्षातील मराठा कुणबी आरक्षणाचे युद्ध जिंकले. ह्या ऐतिहासिक निर्णायक आंदोलन, व आरक्षण युद्धातील इतिहासाचे आणि मराठा आंदोलनाचे प्रत्यक्ष सहभागी, साक्षीदार आणि त्या आंदोलनाच्या योद्धामध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम साडेचार कोटी युवकांचं गरजवंत मराठा समाजातील प्रत्येक कुटुंबीयांनी आपल्या घरी जल्लोषात स्वागत केले.
या आंदोलनात शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे युवक अध्यक्ष व यांच्या आंदोलनातील राष्ट्रीय अध्यक्षांसह संपूर्ण महाराष्ट्रभरातील टिम मराठा शेतकरी पदाधिकारी लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते. त्या शेतकरी मधील संघटनेचे युवक अध्यक्ष रवी राणा उर्फ प्रेमजीतसिंह राजे पवार यांचे कुटुंबीयांनी आज शनिवार दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी जल्लोषात स्वागत केलं.