ताज्या घडामोडी

समाजसेवा करताना वर्षातून एकदा जागतिक स्वाभिमान दिनानिमित्त सर्वांनी एकत्र आले पाहिजे – बबनराव आटोळे

समाजसेवा करताना वर्षातून एकदा जागतिक स्वाभिमान दिनानिमित्त सर्वांनी एकत्र आले पाहिजेबबनराव आटोळे

WDSO – वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन ची ऑनलाईन मीटिंग संपन्न

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 22/01/2024 :
“समाजसेवा करत असताना वर्षातून एकदा जागतिक स्वाभिमान दिन साजरा करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे”असे मत वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष बबनराव आटोळे यांनी व्यक्त केले. संघटनेच्या साप्ताहिक ऑनलाइन मिटिंग मध्ये ते मार्गदर्शन करताना बोलत होते. ऑनलाईन मीटिंगमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली. आदर्श समाज कसा असावा, आदर्श कुटुंब कसे असावे, आदर्श कुटुंब बनवण्यासाठी काय काय करावे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे, आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, कुटुंबप्रमुखांनी व्यवसायांकडे लक्ष दिले पाहिजे, त्याबरोबर समाजसेवा सुद्धा केली पाहिजे, अशा प्रकारे सर्वांनी मत व्यक्त केले. तसेच यावर सर्वांचे एकमत झाले आणि बारामती मध्ये रयत भवन मार्केट यार्ड येथे होत असलेल्या 4/02/2024 रोजी आपला स्वाभिमान आपला कार्यक्रम म्हणजेच जागतिक स्वाभिमान दिनाला सर्वांनी येण्याचे मान्य केले.


ऑनलाइन मीटिंगमध्ये संस्थापक अध्यक्ष बबनराव आटोळे बारामती, सागर समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे अकलूज, बंडू आटोळे जालना , बापूसाहेब शिंदे नाशिक, भास्करराव कोल्हे अंबड जालना, प्रदेशाध्यक्ष महादेव सातपुते मुंबई, सचिव अजय गाढवे पुणे, राष्ट्रीय समन्वयक सखाराम नाना खोत इंदापूर,मारुती भावले संभाजीनगर, नितीन झाडे, परमेश्वर पिसे, राजेंद्र देवकर अहिल्यानगर , सचिन ढगे अमरावती , संजय शिरकुले सातारा, सौरभ रोडगे संभाजीनगर, सोमनाथ अनुसे पुणे, अक्षय ठोंबरे, रामदास कोकरे मावळ, मनीष ठोंबरे, योगेश नरोटे सातारा, योगेश खरात पुणे, विठ्ठल वलेकर परभणी, वैजनाथ दरेकर , ईश्वर आखाडे मावळ पुणे, विलास पाचपोळ संभाजीनगर, सुभाष भाई वरक रत्नागिरी , विलास वाघ, सचिन बनसोडे, वासुदेव गोमासे, महादू पोलगिर नाशिक, सुनील ठोंबरे माळशिरस आणि अलकाताई रुपनवर पुणे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. असाच दर रविवारी होणाऱ्या ऑनलाइन मीटिंग मध्ये भाग घेत चला आणि आदर्श कुटुंब बनवूया आणि आपल्या नातेवाईकांना पण सांगावे असेही वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशनच्या ऑनलाइन मीटिंगमध्ये समाज बांधवांना आवाहन करण्यात आले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button