श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराज शाही राज्याभिषेक सोहळा २०२४ यवत येथे श्रीमंत श्री मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते विधिवत संपन्न

श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराज शाही राज्याभिषेक सोहळा २०२४ यवत येथे श्रीमंत श्री मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते विधिवत संपन्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
यवत – श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराज राज्याभिषेक सोहळा २०२४ शुक्रवारी सकाळी १० वाजता यवत या गावी श्रीमंत श्री मालोजीराजे भोसले राजासाहब अक्कलकोट संस्थान यांच्या शुभहस्ते व छत्रपती शाहू महाराज यांचे सरदार वंशज यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये , सुनीलराजे भोसले सुपा परगणा प्रमुख अशोक राजे भोसले पाटील हिंगणीकर शाखा , अमितराजे राजेशिर्के श्रीमंत पिलाजीराजे राजेशिर्के यांचे वंशज , इंद्रजीत सिंह घोरपडे म्हाळोजी बाबा घोरपडे यांचे वंशज ,सत्यशील राजे ढमाले देशमुख श्रीमंत रामजी राऊतराव ढमाले देशमुख यांचे वंशज, सिद्धार्थ कंक सेनापती येसाजी कंक यांचे वंशज, संतराज साठे महाराज ऐतिहासिक मराठा सरदार घराणे भीमथडी , प्रवीण गायकवाड इतिहास अभ्यासक व चांदखेड येथील गायकवाड घराण्याचे वंशज , रवींद्र भापकर , विजयसिंह भापकर , दारासिंह भापकर , बाळासाहेब भापकर , लोणीभापकर येथील भापकर सरदार यांचे वंशज ,. श्रीमंत शितोळे ट्रस्टचे वतीने शिवराज शितोळे देशमुख पाटस, आबासाहेब गोळे सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे वंशज व आग्रा ते राजगड गरुड झेप चे अध्यक्ष, बाबुराजे गाडे धाराऊमाता गाडे यांचे वंशज, जीवनराव कवडे आर पी एफ सेवानिवृत्त सहाय्यक उपनिरीक्षक श्रीमंत आवजीराव कवडे सरदार यांचे वंशज , लहूराज दरेकर -इनामदार महिमानगड किल्ल्याचे किल्लेदार श्रीमंत सरदार सयाजीराव दरेकर यांचे वंशज , महेश पवार जळगाव यांच्या उपस्थितीत पार पडला. ऐतिहासिक यवत गावचे अपरिचित असणारे सरदार घराणे दोरगे शिलेदार व श्री शाहू प्रतिष्ठान यांनी हा राज्यभिषेक सोहळा आयोजित केला होता .
अखंड हिंदुस्तान मराठ्यांच्या ताब्यात घेणारे शंभू पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा अजिंक्यतारा गडावर१२ जानेवारी १७०८ या दिवशी जिजाऊ जयंतीची मुहूर्त साधून स्वतःचा राज्याभिषेक सोहळा करून घेतला स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर होण्यासाठीची महत्त्वाची ऐतिहासिक घटना यादिवशी घडली.
. या सोहळ्यात दोरगे शिलेदार यांचे वतीने ऐतिहासिक, सामाजिक किंवा विशेष असे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला यामध्ये गलांडवाडी एक इंदापूर तालुक्यातील विठ्ठलराव शिंगटे यांचा देहू ते पंढरपूर वारीमध्ये गांजा सारख्या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तींना पकडून चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन करत असतात सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूर गढीतील समाधीवर अतिक्रमण होत असताना तिचे संवर्धन केले . आप्पासाहेब घोरपडे यांचे हर्ष फाउंडेशन मार्फत राज्यभर रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून देतात. जेधे घराण्यातील पराक्रमी वीर पुरुषांचा अपरिचित इतिहास जगासमोर मांडणाऱ्या सौ श्रद्धा जेधे , नगर शहरामध्ये मराठा क्रांती मोर्चा मध्ये सक्रिय असणाऱ्या तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या सौ अन्नपूर्णा ढम , महाराष्ट्रामध्ये 2018साली पहिल्यांदाच मराठ्यांच्या शस्त्रांचे मुंबईसारख्या शहरांमध्ये प्रदर्शन भरवले तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या कृष्णा घाडगे , मराठा तरुणांना व्यावसायिकते बाबत मार्गदर्शन करणारे पुण्यामधील मगरपट्टा सिटी येथील प्रसिद्ध वंदन फर्निचर चे सचिन उत्तेकर बांदल पाटील, पुरंदर दौंड शिरूर अशा पुण्याच्या पूर्वेस असणाऱ्या भीमा तिराच्या भागातील ऐतिहासिक गावांचे युट्युब चॅनेल मार्फत इतिहास मांडण्याचे कार्य करणाऱ्या महेंद्र नवले यांचा. सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे बद्दल सविस्तर समर्पक असे लिखाण करणाऱ्या सोबतच ऐतिहासिक सरदार घराणे यांचेवर यांचे सरदारांवर लिखाण करणारे उरुळी कांचन येथील खलील शेख , वंदनगडावर गड किल्ले संवर्धन करणाऱ्या गणेश बाबर यांचा तसेच या सोहळ्यास खास साताऱ्याहून येणारे महादजी शिंदे यांचे वर अलीजा बहाद्दर नावाचे पुस्तक लिहिणारे लेखक पी एन शिंदे यांचा व सोहळ्यासाठी विधीवत पूजा मंत्रोच्चार तंजावर चे व्यंकोजीराजे भोसले यांनी जेजुरीच्या खंडोबाच्या पुजेसाठी नेमलेले उपाध्ये यांचे वंशज राकेश खाडे यांना आमंत्रित केले होते. या सर्वाचा सन्मान राजासाहब मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला . उपस्थित मान्यवर व सरदार वंशज यांचा सन्मान दोरगे शिलेदार यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी कुंडलिक खुटवड मा. पंचायत समिती सदस्य दौंड , सदानंद दोरगे मा.उपसरपंच यवत , गणेश कदम जिल्हा परिषद , दौंड काॅग्रेस अध्यक्ष विठ्ठल दोरगे, प्रविण भापकर , सतीश दोरगे काळभैरवनाथ ट्रस्ट अध्यक्ष, दशरथ दोरगे चेअरमन विकासो यवत, चंद्रकांत
घिगे , दत्तात्रय दोरगे, अण्णा दोरगे , शिवाजी दोरगे, दादा माने , विलास दोरगे, काका दोरगे, त्र्यंबक रायकर , बाळू कदम सदस्य,ज्ञानेश्वर दोरगे, अक्षय दोरगे, प्रविण दोरगे, शरद दोरगे, बाळासाहेब बागल ,सुरेश दोरगे, सुनिल दोरगे ,राहुल दोरगे, मंगेश गावडे, अमर शिंगटे, शुभम दिवसे इत्यादी उपस्थित होते.
छत्रपती शाहू महाराज यांचे फौजेत असंख्य मराठा सरदार तलवारीची शर्त करून पराक्रम गाजवत होते यातीलच एक सरदार म्हणजे यवत गावचे दोरगे शिलेदार होते शाहू दप्तरी दोरगे शिलेदार असा कागदपत्री उल्लेख असलेली कागदपत्रे उपलब्ध आहेत.यवत या गावचा लष्करी मोकासा छत्रपती शाहू महाराज यांनी राजपुत्र फतेसिंह बाबा भोसले यांस दिला होता म्हणजेच यवत गावचे दोरगे सरदार फतेसिंह बाबा भोसले यांचे सोबत लष्करी मोहिमांमध्ये सहभागी होत होते सन १७१९ मध्ये राजपुत्र फत्तेसिंह बाबा भोसले यांचे लग्न सोहळ्यास उपस्थित असलेल्या सरदारांची यादी उपलब्ध आहे यामध्ये त्रिंबकराव दोरगे यास मानाचा फेटा व शेला देऊन सत्कार केल्याचा उल्लेख आढळतो.
या सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्रातील तमाम ऐतिहासिक शिवकालीन घराण्यांचा वारसा जपणारे श्री शाहु प्रतिष्ठान चे अध्यक्ष राहुल दोरगे , मित्रपरिवार व दोरगे शिलेदार यांच्यावतीने करण्यात आले होते