ताज्या घडामोडी

उद्धव ठाकरे यांची सध्याची अवस्था एखाद्या स्पेन फोर्स सारखी

उद्धव ठाकरे यांची सध्याची अवस्था एखाद्या स्पेन फोर्स सारखी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 13/01/2024 :
उद्धव ठाकरे यांची सध्याची अवस्था एखाद्या स्पेन फोर्स सारखी झाली आहे. काय कसं चाललंय पाव्हणं असं म्हणण्याची आपल्याकडे प्रथा आहे अगदी त्याच प्रथा परंपरेला धरून उर्वरित शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारलं तर ते म्हणतात की काय उबाठा उबाठा म्हणून मला अजिबात हिनवू नका कारण उबाठा म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे असं आहे हे विसरू नका आणि माझ्या जखमेवरची खपली काढण्याचा कुणीही प्रयत्न केला तर ती मर्दाची अवलाद नाही हे लक्षात ठेवा. उध्दव ठाकरे यांचा राग परवाच्या सायंकाळपासून अगदी त्यांच्या मेंदूच्या छतावर पोहचला आहे. अर्थात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या विरोधात दिलेला आमदार अपात्रतेचा निकाल त्यांच्या अतिशय जिव्हारी लागला आहे त्यामुळे त्यांचा ऐन लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या बारगेनिंगचा घोडा आता रेसमध्येच नाही .
एकेकाळी स्वतःला वाघ म्हणून घेणारी शिवसेना आजच्या घडीला अक्षरशः मांजर झाली असून ना त्यांना वाघासारखी गर्जना करता येत ना मांजरीसारख म्या म्या करता येत. कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांची अवस्था घायाळ मी हरिणी यासारखी करून ठेवली आहे त्यामुळे त्यांचा सत्तेचा माज आणि साज पुरता उतरंडीला लागला आहे. अशा विकलांग परिस्थितीत उर्वरित शिल्लक शिवसेनेचे विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत हे आजही इंडिया नामक आघाडीकडून लोकसभेसाठी तब्बल तेवीस जागांची अपेक्षाच नाही तर मागणी कायम ठेवून आपला घोडा दामटताना दिसतायत पण उध्दव ठाकरे यांना आपल्या पक्षाची औकात माहिती असल्याने दहा बारा जागा दिल्या तरी ते तथास्तु म्हणतील अशी अवस्था आहे. कारण त्यांना हात दाखवून अवलक्षण करण्यात अजिबात स्वारस्य नाही .
तेवीस जागा जर शिवसेनेला मिळाल्या तर त्या त्या मतदारसंघातील उमेदवार कोण ? कारण त्यांचा आजही शिल्लक शिवसेनेला आता पत्ता नाही. बरं उमेदवार मिळाले तर त्यांच्याकडून तिकिटे दिल्याबद्दल बिदागी घेण्याची औकात उद्धव ठाकरे यांच्याकडे आजच्या घडीला किंचित सुध्दा राहीली नाही. मग याच उमेदवारांना पक्षाकडून म्हणजेच उध्दव ठाकरे यांच्याकडून निवडणूकीसाठी चार दोन कोटी रुपये द्यावे लागतील. पण त्यासाठी ठाकरे काही केल्या पक्षाच्या खजिन्याचा दरवाजा उघडतील असं अजिबात वाटत नाही. कारण ती त्यांची सवयच नाही. हां जोपर्यंत शिवसेनेत आजचे केंद्रीय मंत्री नारायण राणे होते तोपर्यंत शिवसेना उमेदवारांना वारेमाप पैसा मिळत होता. कारण ती राणे यांची दाणत होती. पण राणे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला तेंव्हापासून दाणत हा शब्दच उध्दव ठाकरे यांच्या लाल किताबातून गायब झाला आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विश्व प्रवक्ते हे तेवीस जागांची मागणी करत राहिले तरी काही केल्या इतक्या जागा काॅंग्रेस देऊ शकणार नाही कारण उर्वरित शिल्लक शिवसेनेला यापुढेही मोठाले भगदाड पडणार आहे याचा थांगपत्ता उध्दव ठाकरे यांना नसला तरी तो काॅंग्रेसच्या महाराष्ट्रातील जेष्ठ नेत्यांना नक्कीच अवगत आहे. त्यामुळे संजय राऊतांनी कितीही जिवाचा आटापिटा केला तरी ते शक्य नाही आणि तसं होऊ नये म्हणून उध्दव ठाकरे यांनी देव पाण्यात घालून ठेवले आहेत. का तर संजय राऊत हे भले पोपट असतील पण उमेदवारांना खिरापत देण्याची वेळ येईल त्यावेळी ठाकरेंवरच ती जबाबदारी असणार याची जाणीव मातोश्रीवरून कारभार करणाऱ्यांना निश्चित आहे. परिणामी काही केल्या उध्दव ठाकरे ऐनकेन प्रकारे इंडिया नामक आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीला जात नाही किंवा यापुढेही जाणार नाहीत कारण त्यासाठी त्याचं मनोधैर्य किंचीत सुध्दा धजावत नाही. अर्थात यात काही गैर नाही कारण शिवसेनेचा वाघ भाजपने म्हणण्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रातोरात चोरुन नेत आपला राजकीय हिशोब पुरता चुकता केला आहे. त्यामुळे म्या म्या करणाऱ्या शिवसेनेला काॅंग्रेसवाले कवडीचीही किंमत द्यायला अजिबात धजावत नाही आणि यापुढेही धजावणार नाही हे वास्तव आहे. आणि ते उध्दव ठाकरे यांनी अंतस्थ स्विकारल आहे. त्यामुळेच त्यांची अवस्था एखाद्या स्पेन फोर्स सारखी झाली आहे आणि हीच नेमकी वस्तुस्थिती आहे .

राजाभाऊ त्रिगुणे .
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button