अयोध्यातील श्रीराम मंदिर नक्की कोणाचे..? आणि का..?

अयोध्यातील श्रीराम मंदिर नक्की कोणाचे..? आणि का..?
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 05/01/2024 :
जशी जशी २२ जानेवारी २०२४ जवळ येत आहे तशी तशी राम मंदीराविषयीची उत्कंठा शिगेला पोहोचत आहे.. खरोखरच ही एवढी पराकोटिची अस्मिता का बनत गेली..?
वास्तविक पाहता श्रीरामाची केवळ अयोध्याच नव्हे तर या विश्वाचे चराचरही त्याच्याच अस्तित्वाने व्यापले आहे. ही हिंदू समाजाची श्रद्धा आहे.. मग तरीही अयोध्यातीलच हे श्रीराममंदीर कोणाचे..? का..? कोणासाठी..?
अयोध्यातील हे मंदीर केवळ श्रीरामाचेच नाही तर शेकडो वर्ष दबलेल्या हिंदू मनाच्या आक्रोशाचे.. त्याच्या चिरडल्या गेलेल्या अस्मियतेचे हे मंदीर आहे.. लाखो विरांच्या बलिदानाचे, त्यांच्या मातीत मिळालेल्या स्वप्नांचे हे मंदीर आहे..
अनेक व्यथाच नव्हे तर व्यथांच्या गाथा बनतील एवढा संघर्ष.. एवढा अत्याचार.. एवढा त्याग केलेल्या त्या लाखो महापुरुषांची स्वप्नपूर्ती म्हणजे हे मंदीर आहे.. जे कधीकाळी आपलेच पूर्वज होते.. आणि ते याच मंदीर निर्माणसाठी लढले..
गेली शेकडो वर्ष पिढ्यांपिढ्या हेच दिव्य स्वप्न घेऊन आपले पुर्वज जगत आले.. मातीमोल झाले.. त्यांचे ते दिव्यस्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेला अट्टाहास म्हणजे हे श्रीराम मंदीर आहे..
हे मंदीर कशासाठी..? तर मुर्दाड झालेल्या हिंदू समाजाच्या आत्मउत्थानासाठी होय.. मृत झालेला आत्मसन्मान पुर्नजागृत करण्यासाठी हे मंदीर होय.. या मंदिरातून निघणारा शंखनाद त्या हिंदू समाजाला नेहमीच पुरुषार्थाचा संदेश देत राहील जो आज हिंदू विसरत चालला आहे..
विकलांग झालेला आत्मविश्वास आणि स्वाभिमान पुन्हा सचेतन होऊन, गर्वाने म्हणेल की होय! मी हिंदू आहे असा ठाम विश्वास मनामनात जागृत करण्यासाठी उभे राहिलेले हे श्रीराम मंदीर होय..
अशा या प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण सोहळा २२ जानेवारी २०२४ ( पौष शु. द्वादशी) या शुभमुहूर्तावर संपन्न होत आहे.. शेकडो वर्ष अंधारात राहिलेल्या हिंदू समाजाच्या मनामनात, घराघरात श्रीरामाचे तेज पसरवू या.. म्हणूनच श्रीरामाच्या स्वागतासाठी घरोघरी, दारोदारी रांगोळी काढू या.. दिव्यांची आरास सजवू या.. गुढी पताका उभारु या.. आणि खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करू या..
राजतिलक की करो तैयारी..!
आ रहे है भगवाधारी..!!
जय श्रीराम।।
देशप्रेमी – संपत कौदरे (पुणे महाराष्ट्र)