यशवंत क्रांती संघटनेमुळे मेंढपाळांना वन विभागातर्फे २८ हजार रुपये नुकसान भरपाई.

यशवंत क्रांती संघटनेमुळे मेंढपाळांना वन विभागातर्फे २८ हजार रुपये नुकसान भरपाई.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 28/12/2023 :
सावर्डे येथील मेंढपाळ संपत राजाराम शेळके व कृष्णात सोमा शेळके यांच्या मेंढरांच्या तळावर तरससदृष्य वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात ११ मेंढरांची पिल्ले ठार झाली होती. याची नुकसान भरपाई म्हणून वन विभागाकडून मेंढपाळांना २८ हजार रुपये देण्यात आले. या प्रकरणाचा पाठपुरावा यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सावर्डे गावातील मेंढपाळ संपत राजाराम शेळके व कृष्णात सोमनाथ शेळके यांची मेंढरे बसायला शेतात असल्याने मेंढरांची पिल्ले व व्यालेली मेंढरं गावाशेजारी असणाऱ्या परीट मळा सरकारी दवाखान्याजवळ वाघरीत ठेवली होती. शनिवार दिनांक १६ सप्टेंबर २३ रोजी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान तरसदृश्य वन्य प्राण्यांच्या कळपाने कुंपण तोडून आत मध्ये प्रवेश करून कोकरांवरती हल्ला केला. या हल्ल्यात संपत राजाराम शेळके यांची आठ व कृष्णा सोमा शेळके यांची तीन अशी एकूण 11 पिल्ले ठार झाली होती. या हल्ल्याची घटना सदाशिव शेळके यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना ताबडतोब कळविताच त्यांनी तात्काळ वनपाल साताप्पा जाधव व पशुसंवर्धन अधिकारी यांना घटनेची माहिती कळवून घटनास्थळी रीतसर पंचनामा करण्याची विनंती केली होती. सदर घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी या घटनेचा यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करण्यात आल्यामुळे मेंढपाळ संपत राजाराम शेळके यांना २२ हजार रुपये, कृष्णात सोमा शेळके यांना ६ हजार रुपये नुकसान भरपाई वन विभागाकडून देण्यात आली.
नुकसान भरपाई मिळाल्याने मेंढपाळांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी बोलताना वाघमोडे म्हणाले की वन विभागाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाई बाजारभावापेक्षा अतिशय कमी मिळत असल्याने आणि होणारे नुकसान जास्त असल्याने मेंढपाळानी आपल्या पशुधनाची काळजी घेऊन नुकसान होणार नाही याबाबत जागरूक राहावे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी डॉ निवृत्ती खराडे, पशुसंवर्धन पर्यवेक्षक डॉ. रवींद्र जंगम सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन कार्यालय इचलकरंजी, वनपाल साताप्पा जाधव, वनरक्षक श्री पवार एम एस नरंदे, दिलीप यशवंत गुळवदे वनसहाय्यक नरंदे, यांचे मोलाचे सहकार्य मिळाले यावेळी यशवंत क्रांती संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, जिल्हा संघटक पिंटू गावडे,शिरोळ तालुका अध्यक्ष दादासो गावडे, हातकणंगले तालुका अध्यक्ष यशवंत वाकसे, संपर्कप्रमुख सोमाजी शेळके शाखा अध्यक्ष तानाजी संकटक रामदास बंडगर उपसरपच अण्णापा शेळके मा. उपसरपंच सदाशिव शेळके माणिक शेळके यशवंत शेळके अमर शेळके शुभम शेळके अजित शेळके मेढपाळ संपत शेळके कृष्णात शेळके सागर शेळके व समाज बांधव उपस्थित होते.