ताज्या घडामोडी

गुरु दत्त आणि दत्तात्रय प्रभू एक नाहीत! निमित्त सारंखेडा यात्रा!

गुरु दत्त आणि दत्तात्रय प्रभू
एक नाहीत!
निमित्त सारंखेडा यात्रा!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 26/12/2023 :
आज 26 डिसेंबर 2023 मार्गशिर्ष पौर्णिमा. गुरु दत्त जयंती. गुरु दत्त म्हणजे त्रिमूखी दत्त. अत्री आणि अनुसया यांचा पुत्र. याला तीन डोकी म्हणजे 3 मुख आहेत. यालाच आपण त्रिमूखी दत्त असे म्हणतो. हे तीन मुख म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आहेत.
दुसरा दत्त आहे तों दत्तात्रय प्रभू. याला आपण एक मुखी दत्त म्हणतो. त्रिमूखी दत्त आणि एकमुखी दत्त यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. त्या एकमुखी दत्त म्हणजे दत्तात्रय प्रभू यांचं खांदेशातील सारंगखेडा येथे भव्य मंदिर आहे. यां दत्तात्रय प्रभू यांची आज पासून यात्रा सुरु होतं आहे ती इथून पुढे दीड महिना सुरु राहील. आशिया खंडातील सर्वात मोठा जगप्रसिद्ध घोडे बाजार या यात्रेत भरतो. त्या सोबत आपल्या संसाराला लागणाऱ्या सर्वं वस्तू इथे विक्रीला असतात. बैल गाडे, कापड, साड्या, टिकली, बांगडी, बेला(काषाची जोडावी), मसाल्याचे सर्वं पदार्थ, खाद्य पदार्थ, यात गुळाची गरम जिलेबी अधिक पसंत करतात. सर्वं काही इथे मिळत. अनेक तमासे असतात.
सारंग हे श्रीकृष्णच्या धनुष्याच्या नावावरुन ठेवण्यात आले नावं आहे, तर अलीकडे इथल्या घोडे बाजाराचे नावं महाराणा प्रताप यांच्या घोड्याच्या नावावरुन चेतक मोहत्सव ठेवण्यात आले आहे.
तर इथली इष्ट देवता, दत्तात्रय प्रभू हे महानूभावं पंथातील श्रीकृष्ण अवतार मानले जातात.
महानुभाव पंथ खरं तर सनातन धर्मापेक्षा स्वतंत्र वेगळा धर्म आहे. श्रीकृष्ण आणि गीता ग्रंथ एवढे एकच साम्य या दोन्ही धर्मात आहे. बाकी सर्वं भिन्न आहे.
सनातन धर्मात अद्वैत तत्व आहे तर महानुभाव पंथात द्वैत तत्व आहे. सनातनी मूर्ती पूजक आहेत तर महानुभाव पंथात मूर्ती पूजेला विरोध करतात. सनातन धर्मातील 10 अवतारातील कृष्ण अवतार सोडला तर महानुभावी ईतर सर्वं अवतार नकारतात. ते विठ्ठल, विष्णू वा सत्यनारायण यांना मानत नाहीत. ते श्रीकृष्ण हां मूळ देव मानतात आणि त्याचे ईतर चार अवतार म्हणजे 5 अवतारं मानतात. द्वाराकधीश श्रीकृष्ण महाराज, दत्तात्रय प्रभू, चांगदेव राऊळ, गोविंदप्रभू आणि चक्रधर स्वामी.
हे पाच अवतार सोडून महानुभावी ईतर कोणताही देव मानत नाहीत. देवी मानत नाहीत. गीता हां एकमेव धर्म ग्रंथ मानतात. ईतर ग्रंथ म्हणजे, विवेक सिंधू, सुभद्रा चंपू, लीळा चरित्र हे ग्रंथ ते मानतात. मृत व्यक्तीला ते जाळत नाहीत पुरतात. ते मूर्ती पूजा नं करता अवतार पुरुषांनी स्पर्श केलेल्या वस्तुंना चुमतात. माथ्याला लावतात. गोवर्धन पर्वता वरील दगड मातीला नतमस्तक होतात. एकमेकांला अभिवादान करताना दंडवत शब्दाचा वापर करतात. मांसाहार या पंथात निशिद्ध मानतात. ते शुद्ध शाकाहारी भोजन घेतात. महानुभाव पंथ पंजाब, अफगाणिस्थान पर्यंत पोहचला आहे. पण प्रत्येक भागात ते मराठीच भाषेचा वापर करतात. साधारण 1972 मध्ये अमरावती आश्रमात वृषभराज महाराज होते. ते पंजाबी असूनही अस्खलीत मराठी बोलायचे. त्यांचं व्याख्यान आमच्या spdm महाविद्यालय शिरपूर येथे झाले होते. ते ऐकून मी खूपच प्रभावित झालो होतो.
महानुभाव पंथात जातीभेद नाही. भारतात बुद्धा नंतर अस्पृश्यता नं पाळनारा दुसरा संप्रदाय म्हणजे महानुभाव संप्रदाय होय. त्यांना चातुरवर्ण्य व्यवस्था मान्य नाही. विधवा निराधार स्त्रियांना, अनाथ बालकाना ते आश्रय देतात स्व . सिंधूमाई संपकाळ यांनी सुद्धा अमरावतीच्या आश्रमात काही दिवस आश्रय घेतला होता.
महान समाज सुधारक संत गाडगे बाबा हे सुद्धा महानुभाव संप्रदायातील होते. म्हणून ते मूर्ति पूजा, करत नसत. सत्यनारायण, प्रभुराम, विठ्ठल या देवावर ते विश्वास ठेवत नसतं. परंतु कृष्णावर त्यांची नितांत श्रद्धा होती. म्हणून ते त्यांच्या भजनाचीं सुरवात जय जय राम कृष्ण हरी या ओळीने न करता, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. या ओळीने करत असत. गाडगे बाबा नास्तिक कधीच नव्हते. त्यांची कृष्णावर दृढ श्रद्धा होती. गाय ही कृष्णाला प्रिय होती, वंदनीय होती. म्हणून बाबांनी विदर्भात अनेक गोशाळा/पांजरपोळ सूर करून तिथे गायीना आश्रय दिला. शिक्षण शाळा महाविद्यालये स्थापन केले. म्हणून तर अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा यांचे नावं सर्वांनू मते दिले आहे.
भडगाव तालुक्यात कनाशी नावाचे एक गाव आहे. कनाशी हे नावं कान्हाश्री नावाचा अपभ्रश आहे. कनाशी इथे काही काळ चक्रधर स्वामींचे वास्तव्य होते. म्हणून त्या गावाला कान्हाश्री नावं मिळाले. त्याचा अपभ्रश कनाशी झाला. हे नावं आता प्रचलित आहे. हे संपूर्ण गाव शाकाहारी आहे. त्यांच्यात आपल्या सारख्याच अनेक जाती आहेत. पण त्या सर्वं जाती शाकाहारी आहेत.
अशा यां महानुभाव पंथाचे दुसरे अवतार पुरुष दत्तात्रय प्रभू यांची यात्रा आज पासून सारंगखेड्यात सुरु आहे. त्याचा पौराणिक संदर्भ असा कीं, हे गाव श्रीकृष्णाच्या सारंग धनुष्यां वरुन वसवीण्यात आले आहे. तापी आणि यमुना या दोघी सख्या बहिणी आहेत. दोघी सूर्य कन्या आहेत. म्हणून कृष्ण यमुना सोडून आला आणि त्याने तापीच्या काठावर सारंगखेडा गाव वसंविले. इथे त्याचा लष्करी तळ होता. नंद राजाच्या नावावरुन राजधानी नंददरबार वसविली. त्याचा अपभ्रश नंदुरबार झाला. कान्हाचा देश म्हणून कान्हदेश. कान्हदेशचा अपभ्रश खान्देश झाला.

बापू हटकर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button