कृषी तंत्रज्ञानाचा माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमात समावेश होणे गरजेचे: वैभव गांधी

कृषी तंत्रज्ञानाचा माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमात समावेश होणे गरजेचे: वैभव गांधी
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 24/12/2023 : कृषी तंत्रज्ञानाचा माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमात समावेश होणे गरजेचे आहे असे मत वैभव गांधी यांनी व्यक्त केले.
रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे शनिवार रोजी सकाळी 9:00 वाजता बाजार दिवसचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाघाटन महावीर मगनलाल गांधी व आनंद अशोक फडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंतलाल दोशी (संस्थापक अध्यक्ष रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर) हे होते.
“देशातील तसेच महाराष्ट्रातील कृषी संशोधकांनी अभ्यास करून आणि विशेष परिश्रम घेऊन विविध विषयांसंबंधी सुधारित कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून करून दिले आहे. पिकांचे सुधारीत वाण, खताच्या मात्रा, पेरणीपध्दती, सिंचनपध्दती, पाणी व्यवस्थापन, अंतर्गत मशागत, पीक संरक्षण, जमिनीची मशागत, सुधारित अवजारे व यंत्रे आणि इतर शेतीसंबंधी विषयावर सुधारित तंत्रज्ञान संशोधनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच विविध पिके, भाजीपाला, फळशेती, फुलशेती, पशुसंवर्धन, चारा पिके आणि यांत्रिक शेती याबाबत मोठ्या प्रमाणात उपयुक्त कृषी तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. तेच उपलब्ध असणारे कृषी तंत्रज्ञान जर शाळेच्या माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश झाला तर भविष्यातील आदर्श शेतकरी निर्माण होतील व तरुण पिढीचा शेतीकडे पाहण्याचा
दृष्टिकोन बदलेल.”
यावेळी मार्गदर्शन करताना आनंद फडे( संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज) म्हणाले कि,” भविष्यातील वाढत्या मागणीनुसार अन्नधान्य प्रक्रियेला खूप महत्व आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी यांनी अन्नधान्य, फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगाकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच कृषि पदवीधरांसाठी तर प्रक्रिया उद्योग ही खूप उत्तम संधी आहे. केवळ प्रक्रिया करूनच नाही तर त्यामध्ये पुढे जाऊन मार्केटींग व त्या वस्तूचे स्वतःचे ब्रँडीग करणे गरजेचे आहे.समाजातील विविध घटक म्हणजे शेतकरी महिला बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यातील योग्य समन्वयाने खूप चांगल्या प्रकारे प्रक्रिया उद्योग उभा करता येतो. तृणधान्यामध्ये देखील प्रक्रिया उद्योगाला प्रचंड संधी आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, असे कृषि प्रक्रीया उद्योगासाठी शासनाच्या विविध योजनांचे पाठबळ देण्यात आलेले आहे. तरी सर्वांनी या विविध योजनांचा लाभ घ्यावा व प्रक्रिया उद्योगांची उभारणी करावी. परंतु यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.”
🟣विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक विकासासाठी रत्नत्रय शैक्षणिक संकुल सदैव प्रयत्नशील: महावीर गांधी
विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक विकासासाठी रत्नत्रय शैक्षणिक संकुल सदैव प्रयत्नशील असते. चांगल्या दर्जाचे शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून विविध उपक्रम विद्यार्थ्यासाठी या शैक्षणिक संकुलामध्ये राबविण्यात येतात. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्याची इच्छा असते. अशा विद्यार्थ्यांना रत्नत्रय मुळेच दर्जेदार शिक्षण मिळते. असे मत श्री महावीर गांधी (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज) यांनी शेतकरी दिनानिमित्त बाजार दिवस या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी निमित्ताने मांडले.
🟡विद्यार्थी घडविण्यात सहशालेय उपक्रम महत्त्वाचे: अनंतलाल रतनचंद दोशी
विद्यार्थी घडविण्यात सहशालेय उपक्रम गरजेचे असतात. विद्यार्थ्यांना घडविताना शालेय शिक्षणाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. यामध्ये विविध उपक्रमांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी आज आपण आपल्या शाळेमध्ये शेतकरी दिना निमित्त बाजार दिवस हा उपक्रम राबवित आहोत. यामधून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळणार आहे . त्यामुळेच शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. त्यासाठी शिक्षक प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना,खरेदी-विक्री, नफा-तोटा यातून व्यावहारिक ज्ञान येण्यासाठी हा उपक्रम प्रत्येक वर्षी आयोजित केला जातो. बाजारात विविध प्रकारचे 172 स्टॉल लावले होते.या बझार डे मध्ये दोन लाख 45 हजाराची उलाढाल झाली. घरच्या शेतातील पिकलेला माल आणून ग्राहकांना विकण्याचे धडे विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून मिळाले.
रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर चे सचिव प्रमोद दोशी रत्नत्रय ग्रामीण भागातील शाळा आहे. या शाळेमध्ये सर्वात जास्त मुले शेतकऱ्यांचीच आहेत म्हणून बाजार दिवस हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम या विद्यार्थ्यांसाठी आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पालकांना करावे लागणारे शेतीतील कष्ट आणि त्रास विद्यार्थ्यांना कळेल. याच माध्यमातून उत्पन्न खर्च व नफा हा हिशेबही कळेल. त्यामुळे विद्यार्थी पालकांकडे कोणता हट्ट करावा ही समजही येईल. ते पुढे बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून आनंद मिळवावा तसेच यापुढे तीन दिवसाचा रत्नत्रय फेस्टिवल सुरू करणार असल्याचे सांगितले.
सदर प्रसंगी वैभव किशोर गांधी संचालक वैभव ऑटो अँड ऍग्रो टेंभुर्णी, संजय प्रेमचंद गांधी संचालक चंद्रप्रभू एज्युकेशन सोसायटी नातेपुते, सदाशिवगरचे सरपंच विरकुमार अनंतलाल दोशी, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रमोद अनंतलाल दोशी, प्रशालेचे सदस्य वैभव शहा, अभिजित दोशी, बाहुबली दोशी, संजय गांधी, कुंदन सूर्यवंशी, महादेव सपकाळ, अमित गांधी, रामदास कर्णे, अजय गांधी, बबन गोफणे, संजय दोशी, सौ.मृणालणी दोशी, सौ.पूनम दोशी , विनश्री दोशी, रामदास गोपणे, भाग्यश्री दोशी,जगदीश राजमाने, विठ्ठल अर्जुन, सुरेश धाईजे, दत्ता भोसले, ज्ञानेश् राऊत, तुषार ढेकळे , धनश्री दोशी, पार्वती जाधव, रेश्मा गांधी, प्रशाला कमिटी सदस्य, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्व शिक्षक पालक विद्यार्थी यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रमोद दोशी सूत्रसंचालन निंबाळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन वीरकुमार दोशी यांनी केले.