अकलूजच्या राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धेत कलाकारांचे दर्जेदार सादरीकरण.

अकलूजच्या राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धेत कलाकारांचे दर्जेदार सादरीकरण.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 24/12/2023 : येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ४३ व्या राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेत विद्यार्थी कलाकारांनी दर्जेदार सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. रसिकांनी त्यांना भरभरून दाद दिली.
स्मृती भवन शंकरनगर येथे दिनांक २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय शालेय मुला-मुलींच्या व खुल्या गटातील राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धा सुरु आहेत. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष व जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील या बंधूंच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त सदर स्पर्धेचे आयोजन केले आहे. मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या स्पर्धेत सहा गटांमध्ये १३४ संघांनी सहभाग घेतला आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील व स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी प्रत्येक गीत सादर करणाऱ्या कलावंतांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन दिले.
स्पर्धेचा निकाल
गट क्रमांक ३ (८ वी ते १० वी- बॉलिवूड गीते ) ग्रामीण गट
प्रथम क्रमांक- श्री बाणलिंग विद्यालय, फोंडशिरस, द्वितीय क्रमांक – अकलाई विद्यालय, अकलूज, तृतीय क्रमांक – श्री सावतामाळी विद्यालय, माळेवाडी-अकलूज गट क्रमांक ३ (८ वी ते १० वी- पाश्चिमात्य गीत, शहरी गट प्रथम क्रमांक- जिजामाता कन्या प्रशाला, अकलूज, द्वितीय क्रमांक (विभागून) सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज, महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर,
तृतीय क्रमांक – लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर
गट क्रमांक २ (५ वी ते ७ वी- पारंपरिक लोकनृत्य) अतिग्रामीण गट, प्रथम क्रमांक – श्री. संत तुकाराम विद्यालय बोंडले, द्वितीय क्रमांक- जि. प. केंद्रीय शाळा, पुरंदावडे , तृतीय क्रमांक (विभागून)
-जि. प. प्राथमिक शाळा, तरंगफळ
तृतीय क्रमांक(विभागून -जि. प. प्राथमिक शाळा, पिरळे
गट क्रमांक २ (५ वी ते ७ वी- पारंपरिक लोकनृत्य) ग्रामीण गट प्रथम क्रमांक(विभागुण)-श्री. बाणलिंग विद्यालय, फोंडशिरस, स. म. शंकरराव मोहिते पाटील विद्यालय, वेळापूर, द्वितीय क्रमांक
– विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय, विझोरी, तृतीय क्रमांक (विभागून)-श्री गणेश विद्यालय, पिंपळनेर, सदाशिवराव माने विद्यालय, माणकी. सर्व विजेत्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह प्रमाणपत्र उपस्थितांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. दीपकराव खराडे पाटील, उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, सचिव बिभीषण जाधव,स्पर्धाप्रमुख मुख्याध्यापक संजय गळीतकर, पोपटराव देठे, डॉ. विश्वनाथ आवड, अमोल फुले, सर्व सदस्य, परिसरातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, विविध प्रशालेचे सभापती, सदस्य व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.