ताज्या घडामोडी

अशक्य ते शक्य करणारे, “धैर्यशिल मोहिते पाटील.”

अशक्य ते शक्य करणारे, “धैर्यशिल मोहिते पाटील.”

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 20/12/2023 :
धैर्यशिल राजसिंह मोहिते पाटील यांची काम करण्याची शैली हा संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय आहे. कोणताही निर्णय घेताना ते सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू विचारात घेऊन सोडवितात.
अकलूजच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या उद्घाटन सभारंभ असाच मनात घर करून राहिला. केंद्रशाळेच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन ११ फेब्रुवारीला घेण्याचे ठरले. ११ तारीख दोन दिवसावर आलेली असताना जुनी इंग्रजकालीन इमारतसुद्धा पूर्णपणे पाडून झालेली नव्हती. समोर दगड मातीचा प्रचंड मोठा ढिगारा होता. अवघड आणि अशक्य आहे… असे उद्‌गार प्रत्येकाच्या तोंडून निघत होते. १० तारीख उजाडली… ढिगारा तसाच… आणि सकाळी सकाळीच धैर्यशील मोहिते पाटील आले. त्यांनी ढिगाऱ्यावर नजर टाकली. सोबतच्या कामगारांना, अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले. मित्र कंपनीस बोलाविले. त्यांना कामे वाटुन दिली. आणि कांमाला सुरवात झाली. सकाळी दहापासून रात्री दोन वाजेपर्यंत स्वतः तिथे थांबले, तो ढिगारा दिसेनासा होईपर्यत. सकाळी उद्‌घाटन सभारंभ संपन्न झाला. ज्यांनी ज्यांनी आदल्या दिवशीचा तो ढिगारा पाहिला त्यांना स्वानुभवातून जाणवलं. धैर्यशिल मोहिते पाटील यांच्याकडे अशक्य हा शब्द माझ्या शब्दकोशातच नाही असं म्हणणाऱ्या नेपोलियनची आठवण आली.
If you think you can do it,
you can do it
If you think you cannot do it
you are right!
राजकारण हा धैर्यशिल मोहिते पाटील यांचा पिंड नाही. सामाजिकता त्यांचा स्थायीभाव आहे. विजय-प्रताप युवा युवा मंच आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बांधलेल्या बंधाऱ्यासाठी श्रमदान करताना प्रत्येकवेळी त्यांची भूमिका सामान्य कार्यकर्त्यांची होती. दुसऱ्यांना आदेश देण्यात त्यांना स्वारस्य नाही.चाकोरीतून जाणे त्यांना पटत नाही.
रॉबर्ट फ्रॉस्ट एके ठिकाणी म्हणतो –
and I took the one less
travelled by and that has made
all the difference
जीवनात समोर धोपट मार्ग आणि आडवाट असे दोन रस्ते आढळले. मी आडवळणाचा रस्ता पकडला. त्यामुळे जीवनात सारे
निराळेच घडले आहे.
धैर्यशिल मोहिते पाटील यांची दृष्टी प्रत्येकवेळी नाविन्याचाआणि कल्पनांचा शोध घेते.
म्हणूनच वाटते दूरदृष्टी असलेला आपला माणूस आत्ता खासदार झालाच पाहिजे…”आपला माणूस आपला खासदार”!

प्रेमनाथ रामदासी
लेखक

(आवश्यक ठिकाणी उचित बदलासह प्रसिद्ध.
संपादक.)

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button