ताज्या घडामोडी

पवार साहेब आज इतके केविलवाणे का झाले आहेत?

पवार साहेब आज इतके केविलवाणे का झाले आहेत?

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 15/12/2023
शरदचंद्र पवारसाहेब आजकाल इतके केविलवाणे का झाले आहेत ? असा सवाल प्रस्तुत लेखांमध्ये ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार राजेंद्र त्रिगुणे यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या मते नरकासुराला ज्यावेळी जसा ब्राह्मण नाही तर ब्रह्म राक्षस दिसला तेंव्हापासून शिल्लक काय किंवा उर्वरित शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांची आजच्या वयानुसार अक्षरशः त्यांनीच वारेमाप पैशांचे लाडू म्हणा अथवा रेवडी देऊन मोठ्या केलेल्या पुतण्याने अगोदर अंधारातील पहाटे नंतर येणाऱ्या दिन ढवळ्या भर उजेडातच पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथविधी उरकून घेतला त्याचवेळी पवारसाहेबांनी राजकीय देव पाण्यात बुडवणार याची साक्ष दिली , कारण त्यानंतरच्या उजेडातच नाही तर सुर्य मध्यावर डोकावत असताना त्याच पुतण्याने पुन्हा अशी कशी काय टांग मारली आणि काकांची त्यावेळची रातोरातीची झोप उडविली त्याला भाजपमध्ये किंवा अन्य ठिकाणी ok म्हणून ती काकांची टांग पुतण्याने काकांच्या संगतीत राहून कशा पध्दतीने खेचली असे म्हणता ग्रामीण भागातील मातीतील युक्तिवाद न करता शरद पवारसाहेब यांनी सहन केली याचा अर्थ काय ?
याचा अर्थ आणि त्याचा अनार्थ तो इतकाच आयुष्यात राजकीय कुकर्म करतो त्याच फळ आज या वयात राजकारणातील विश्व विश्वाचार्य नेत्यांनी चापलून चेपलून चापटलेले किंवा अगोदरच चेपटलेले चेले खासदार संजय राऊत यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या दस्तूरखुद्द शरदचंद्र पवारसाहेबांना हे मात्र शोभादायक नाही , कारण त्यांनी म्हणजे चेल्यांनी : कारण सगळे चेले आयुष्यभर काबाडकष्ट न करता उष्ट्या ताटावरची खरोखरच कुत्री असतात हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे कारण यांना मालक हाड म्हणत नाही आणि पुढ्यात आलेलं हाडुक जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे सगळं लोटांगण चालू असतं त्यात काही वावगं नाही कारण हीच त्यांची खासियत आहे असो .
स्व.यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांनी आयुष्यभर काबाडकष्ट करून जी महाराष्ट्रातील जनता जगवली याचा अर्थ त्यांना कधीच तुप रोटीचा हव्यास नव्हता हे त्यांना अंतर्मुख चांगलं ज्ञात ( साहेबांना ) होतं म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नी सौभाग्यवती वेणूताई चव्हाण यांना पुत्रप्राप्ती नंतर सुध्दा पुन्हा पुत्रप्रेमाला मुकावं लागलं त्यावेळी कधीतरी प्रख्यात पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी भर सभेत यशवंतराव चव्हाण यांची टिंगलटवाळी करताना त्यांचा निपुत्रिक असा उपरोधिक छल केला होता त्यावर वेणूताईंनी ह्याच कर्मठ पण मनमिळाऊ स्वभावांच्या अत्रे साहेबांना दुसऱ्याच दिवशी कांदापोहे खायला आपल्या घरी बोलावून ते पोहे काय चवीचे असतात याचा मिश्किल टोला लगावला आणि देश प्रेमापोटी झालेल्या त्या आंदोलनात अटकेतील ब्रिटिश पोलिसांच्या तुरुंगातील छळामुळे मी कशी वांझोटी झाले याचा मतितार्थ समजावून सांगितला त्यामुळे अत्रेंच्या नेत्रातील डोळ्यांमधून चव्हाण साहेबांच्या द्वेषातील पाणी कायमचे अटून गेले होते हा अजब किस्सा आहे .पण त्यावेळी स्वार्थासाठी पुत्र नसला तरी पुतण्या अशोक चव्हाण यांची तळी उचलण्याची मोहमाया चव्हाण साहेबांच्या मनाला सुध्दा स्पर्शून गेली नाही याचा अर्थ ‘ कंहा राजा भोज और कंहा .. ..! ‘ तर परिणामी तसा तो प्रघात तहयात कधीच नव्हता याचा ‘ अर्थ जिथे खाऊ तिथे गाऊ ‘ हा प्रकार होता दुसरा म्हणजे खाऊ तिथे गाऊच असा घ्यावा , आता मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख देशप्रेम ज्या अजितदादा यांना अतोनात झालं आहे ते प्रेम खरंखुरं नसून ते पुतणा मावशीच आहे परिणामी सत्तेच्या मखलाशीपोटी सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सातत्याने मारत असलेली ही लोणकढी थाप आहे .बारामतीच्या जमीनीत जिरायती किंवा बागायती असा अजिबात प्रकार नाही कारण तिथे तिथे फक्त गल्ला संस्कृती जोपासली जाते या कारणास्तव घरभेदी पुन्हा नडला म्हणून तिथे ‘आनाजी असतात पण पाणी द्यावे असा पाणाजी शोधून सापडणार नाही अर्थात ह्या सगळ्या इतिहासाची राजरोसपणे पुनरावृत्ती होत असते फक्त घर ते आनाजीच नसतं किंबहुना ते पंताजीच असतं पण घर हे सर्वांच एकच असतं त्या घराचं अस्तित्व पाणीदार पाणवठ्यावर सापडलं तर नशीब बलवत्तर समजावं अन्यथा खालपासून वरपर्यंत सगळे एका रांगेतील खाऊपासरेच नाही का ॽ

राजाभाऊ त्रिगुणे
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button