भारतासाठी राज्यघटनेचे मूल्य कायमस्वरूपी राहणार : ॲड.अविनाश टी. काले.

भारतासाठी राज्यघटनेचे मूल्य कायमस्वरूपी राहणार : ॲड.अविनाश टी. काले.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 05/12/2023 : “विविध भाषा , प्रांत , रूढी , धर्म असलेल्या भारतासाठी राज्य घटनेचे मूल्य कायमस्वरूपी राहणार” असे मत ऍड. अविनाश टी. काले यांनी व्यक्त केले.
दलीत मित्र कदम गुरुजी इंग्लिश मिडीयम स्कूल येथील प्रशालेत संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय राज्य घटना काल आज व उद्या ची उपयोगिता या विषयावर प्रमुख मार्गदर्शक वक्ता या नात्याने मार्गदर्शन करताना त्यांनी वरील विवेचन केले.
पुढे बोलताना ऍड. अविनाश काले यांनी सांगितले की ब्रिटिश कालीन 150 वर्षाची गुलामी संपवून देश स्वंतत्र झाल्या नंतर या देशाचा कारभार कसा सुरळीत राहील व देशातील विविध भाषा रूढी परंपरा प्रांत इत्यादी भेदावर मात करून देश कसा अखंड राहील हे ठरवण्यासाठी नियम असणे आवश्यक होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11महिने 18 दिवस राबून मूळ 395 कलम व 8 परिशिष्ट असणारी राज्य घटना लिहिली. व्यक्तीचे मूल्य समान असून एक मत एक मूल्य या आधारित राजकीय समता घटनेने दिली. समानता , बंधुभाव , समता , न्याय ही तिची वैशिष्टय आहेत , घटनेत सर्वांना समान संधी असताना ही आरक्षण का आले ? याचे कारण भारतीय समाज रचनेत आहे , हजारो वर्ष ज्या वर्गाला शिक्षण , व्यवसाय , अर्थार्जन करण्याचे अधिकार हिरावले गेले त्यांचे प्रतिनिधित्त्व व्यवस्थेत आले पाहिजे म्हणून शिक्षण , नौकरी , प्रशासन , आणि राजकीय प्रतिनिधित्व आरक्षण तरतुदी ने दिले गेले
घटना निर्मिती नंतर 1950साली मद्रास स्टेट ने 1927चे कायद्याचा आधार घेऊन मेडिकल व इंजिनियरिंग मधील 300जागा पैकी 14जागा विविध घटका साठी राखीव ठेवल्या , ज्यात गैर ब्राम्हण 6 मुस्लिम व ख्रिचन यांचे साठी प्रत्येकी 1 मयताचे विधी करणाऱ्या ब्राम्हण यांचे साठी 2 तर अस्पृश्य वर्गासाठी 2अशा जागा राखीव ठेवल्या ,
चंपकम दोरायस्वामी या ब्राम्हण महिलेने या राखीव जागा मुळे मला मेडिकल एडमिशन मिळाले नाही व त्यामुळे माझ्या मूलभूत हक्कावर अतिक्रमण झाले अशी याचिका हायकोर्टात दाखल केली , त्याचा निकाल त्या महिलेच्या बाजूने लागला , व हाच निकाल सुप्रीम कोर्टाने ही कायम केला , परिणामी पहिली घटना दुरुस्ती संसदेला करणे भाग पडले , सामाजिक सुधारणा करत असताना अश्या केसेस भविष्यात होऊ नये म्हणून कलम 15,19, 85, 87, 174, 176, 341, 342, 372, 376, या मध्ये संशोधन करावे लागले. कायद्याच्या रक्षणासाठी भूमी सुधा, संपत्ती अधिग्रहण अश्या अनेक कायद्यांना न्यायालयीन समीक्षे पासून दूर ठेवण्यासाठी 9 वे परिशिष्ट लागू केले.
आज पर्यंत 105 घटना दुरुस्ती झाल्या असल्या तरी, घटनेच्या मूलभूत ढाच्याला बदलता येत नाही. हा ढाच्या च राज्य घटनेचा प्राण आहे ,
देशाचे भविष्य असलेल्या उद्याच्या पिढीने जात धर्म पंथ,भाषा, रूढी यावर भेदभाव न करता आपण भारतीय आहोत ही भावना ठेवणे , रुजवणे आवश्यक आहे. तरच देश महासत्ता बनेल.
प्रारंभी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रणजित सरवदे यांनी प्रास्ताविक केले. ज्यात त्यांनी भारतीय राज्य घटनेचां सरणामा विषद केला विचार पीठावर आर. बी पवार , मुख्याध्यापक संजय काका देशपांडे. उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ इंग्लिश स्कूल , सौ स्मिता पिसे उपाध्यक्षा शिक्षक पालक संघ इंग्लिश स्कूल वेळापूर , शिवशरण सर पर्यवेक्षक इंग्लिश स्कूल वेळापूर , गणेश करमाळकर पत्रकार उपस्थित होते , या शिवाय 2100विद्यार्थी/विद्यार्थिनी , सर्व शिक्षक , शिक्षिका , कर्मचारी स्टाफ उपस्थित होता ,
सभेच्या प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर व दलीत मित्र कदम गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यातआले.