आ. मोहिते पाटलांची केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालय अधिकाऱ्यांसी चर्चा

आ. मोहिते पाटलांची
केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालय अधिकाऱ्यांसी चर्चा
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860956764.
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 4/12/2023 : आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालय अधिकाऱ्यांसी चर्चा केली.
केंद्र शासनाच्या माध्यमातुन शहरी भागात पाणीपुरवठा योजनांसाठी “अमृत-२” हे राष्ट्रीय जल मिशन अभियान राबवले जात आहे.या अभियानात अकलुज नगरपालिकेचा समावेश करण्यात आला असुन त्या अंतर्गत पाणीपुरवठा,मलनिस्सारण सुविधासह पायाभूत सुविधांची कामे केली जाणार आहेत.
आज आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेवुन अकलुज नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला.