⭕अन अकलूज नगर परिषदेने घेतली अकलूज वैभव च्या वृत्ताची दखल 🟢 इरिगेशन कॉलनीतील दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा प्रश्न निकाली

⭕अन अकलूज नगर परिषदेने घेतली अकलूज वैभव च्या वृत्ताची दखल
🟢 इरिगेशन कॉलनीतील दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा प्रश्न निकाली
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 22/11/2023 : अकलूज तलाठी कार्यालया शेजारील इरिगेशन कॉलनी मधून रहदारीच्या रस्त्यावर दररोज येणाऱ्या मैलायुक्त घाण पाण्या मुळे रस्त्यावर खड्डे पडून त्यात पाणी साठून राहत होते आणि परिसरात दलदल निर्माण होऊन घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यावर डासांची बेसुमार निर्मिती होऊन परिसरातील लोकवस्ती आणि शंभर फुटावर असलेल्या अकलूज ग्रामीण रुग्णालय परिसरात साथींच्या रोगाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे.
तलाठी कार्यालया पासून महावीर स्तंभापर्यंत इरिगेशन कॉलनी च्या पाठीमागील रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांनाच अनेक महिन्यापासून या दुर्गंधीयुक्त पाण्याने साठलेल्या डबक्यांचा सामना करावा लागत होता. अनेक छोटे-मोठे अपघात या ठिकाणी घडले आहेत. तथापि याकडे कोणीही लक्ष वेधले नव्हते. परंतु साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता आणि akluj vaibhav.in या प्रसिद्धी माध्यमां द्वारे सदर ठिकाणचे फोटो आणि बातमी प्रसिद्ध करण्यात आली.
सदर बातमीची दखल घेऊन अकलूज नगर परिषदेने तातडीने सदर ठिकाणी अनेक दिवसांपासून उद्भवलेली समस्या कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टीने आज बुधवार दिनांक 22 रोजी इरिगेशन कॉलनी ने बांधलेल्या भिंती लगत जेसीबीच्या सहाय्याने गटारीसाठी चर खोदाई करण्यात आली. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार महावीर स्तंभ ते चावडी पर्यंत या रस्त्याचे काम देखील सुरू करण्यात येणार आहे.
इरिगेशन कॉलनीतून येणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने अकलूज नगर परिषदेने घेतलेल्या दखली बद्दल ग्रामस्थांच्या वतीने शहरातील नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात येत आहेत. तसेच अकलूज वैभव परिवाराचे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, सहसंपादक नागनाथ बाबुराव साळुंखे यांना अनेक नागरिकांचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करणारे फोन येत आहेत.