पांडुरंग कारखाना सभासद ठेवीवरील व्याजापोटी 96 लाख रुपये बँकेत जमा : प्रशांतराव परिचारक

“पांडुरंग कारखाना सभासद ठेवीवरील व्याजापोटी 96 लाख रुपये ठेवीदारांच्या खात्यावर बँकेत जमा” : प्रशांतराव परिचारक
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/11/2023 : सोलापूर जिल्ह्यातील श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सभासद शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याजापोटी 96 लाख रुपये ठेवीदाराच्या बँक खात्यावर वर्ग केले असल्याची माहिती चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली.
पुढे बोलताना,”प्रत्येक वर्षी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याजाची रक्कम देण्याची परंपरा कारखाना व्यवस्थापनाने आजही कायम राखली आहे. कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जमा असणाऱ्या सुमारे 12 कोटी रुपये ठेवीवर द.सा.द.शे. 8% प्रमाणे 96 लाख रुपये ठेवीदाराच्या विविध बँकेमधील खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत”. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलासराव खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासले असून सोलापूर जिल्ह्यात सातत्याने सर्वाधिक ऊसदर दिलेला आहे. आदरणीय मोठया मालकांचा आदर्श घेवून कारखान्याच्या सभासदांना प्रत्येक वर्षी व्याज बिल दिले जात असून यावर्षीही ठेवीदारांना व्याज बील दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच ठेवीदारांनाही दिलासा मिळाला आहे. सध्या बँकाकडून ठेवीवर 5 ते 6 टक्के इतके व्याज दिले जाते. परंतू कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडून बँकांच्या व्याजापेक्षाही ज्यादा म्हणजेच 8 टक्के इतका व्याजदर ठेवीदारांना दिला आहे. कारखाना गळीत हंगाम 2023-24 मध्ये उच्चांकी गाळप क्षमतेने सुरु असून या हंगामात 11 लाख मे.टन ऊस गाळप करणेचे उदिष्ट कारखान्याने ठेवलेले आहे. कारखाना चालू गळीत हंगामात प्रतिदिन 9000 मे.टन गाळप करणार असून कारखान्याचा डिस्टीलरी प्रकल्प 90 के. एल. पी. डी. क्षमतेने व्यवस्थीतपणे सुरु आहे. को-जनरेशनही सुरळीत सुरु असून त्यामधूनही जास्तीत जास्त वीज एक्स्पोर्ट करीत आहोत.
यावेळी बोलताना कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की कारखान्याचा गाळप हंगाम 2023-24 हा वाढीव गाळप क्षमतेने चालवित आहोत. चालू गळीत हंगाम चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खूळे व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने कारखाना इतिहासातील सर्वोच्च गाळप क्षमतेने सुरु आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हणमंत कदम, सुदाम मोरे,विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, सिताराम शिंदे, राणू पाटील, तज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.