सहकार महर्षि अभियात्रिकी महाविदयालयामध्ये जयोत्सव २०२५ उत्साहात संपन्न

सहकार महर्षि अभियात्रिकी महाविदयालयामध्ये जयोत्सव २०२५ उत्साहात संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 18/03/2025 : येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी दि. १५ मार्च २०२५ रोजी “जयोत्सव-२०२५” हे वार्षिक स्नेहसमेलन संस्था अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील व महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सोलो डान्स, ग्रुप डान्स, सिंगिंग, ड्रामा, फॅशनशो या कलागुणांचे सादरीकरण केले.
जयोत्सव-२०२५ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन स.म.शंकरराव मोहिते-पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालय विकास समिती सदस्य वसंत जाधव, प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, कार्यालयीन अधीक्षक, समन्व्यक, विद्यार्थी जनरल सेक्रेटरी आमसिद्ध बिराजदार, सांस्कृतिक विद्यार्थी प्रतिनिधी रुद्रतेज माने देशमुख, विद्यार्थी प्रतिनिधी कु. वर्षाराणी बुधनवर हे उपस्थित होते. तसेच परीक्षक म्हणून निषाद गाडेकर व अजिंक्य नवगीरे हे उपस्थित होते. त्यानंतर उद्घाटन प्रसंगी बोलताना वसंत जाधव यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी, शिस्त, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यानी महाविद्यालयातील सांस्कृतिक उपक्रम हे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासास प्रवृत्त करतात, त्यांचा आत्मविश्वास वाढवतात, त्यांची प्रतिभा शोधण्यास मदत करतात असे सांगितले.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यानी युवानेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस भव्य स्वरूपात साजरा केला. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी सयाजीराजे मोहिते पाटील यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. मीनाक्षी राऊत यांनी तर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी समन्वयक म्हणून प्रा. अनिल कोकरे व सर्व कर्मचारी वृंद यानी काम पाहिले.