ताज्या घडामोडी

प्रताप क्रीडा मंडळाने सामाजिक बांधिलकीतून एक आदर्श निर्माण केला : प्रमोद शिंदे.

प्रताप क्रीडा मंडळाने सामाजिक बांधिलकीतून एक आदर्श निर्माण केला : प्रमोद शिंदे.

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

शंकरनगर प्रतिनिधी दिनांक 5/11/2023 : प्रताप क्रीडा मंडळाने सामाजिक बांधिलकीतून एक आदर्श निर्माण केला आहे असे मत अकलूज आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केले.
कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शंकरनगर अकलूज च्या प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने समाजातील सर्वसामान्य गरजू लोकांना दिवाळी चा सण साजरा करता यावा, या उद्देशाने ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर रत्नाई मिठाई विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.
या ‘रत्नाई मिठाई’ केंद्राचे उदघाटन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अकलूज आगाराचे प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या शुभहस्ते व मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
सुरुवातीला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपक्रमाचे प्रमुख विजय उबाळे यांनी केले. त्यांनी मंडळाच्या कार्याची, उपक्रमाची माहिती दिली. अनेक वर्षापासून मंडळाने बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली अनेक स्तुत्य उपक्रम, राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. ‘रत्नाई मिठाई’ हा देखील सामाजिक बांधिलकीतुन ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर सुरु केलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे. यास ग्राहकांचा देखील यास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षी ४७४७ किलो विक्री झाली होती. यंदाही यास भरघोस प्रतिसाद मिळत असून ३२३१ किलो ऍडव्हान्स बुकिंग झाले आहे. तसेच नियमित विक्रीही जोमाने चालू आहे.
यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते प्राथनिधिक स्वरूपात ग्राहकांना ‘रत्नाई मिठाई’ चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे प्रमोद शिंदे म्हणाले , मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम, उदबोधनपर कार्यक्रम, राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
‘रत्नाई मिठाई’ हा देखील एक स्तुत्य उपक्रम असून या उपक्रमामुळे महिलांचा त्रास कमी होणार असून किफायतशीर दरात स्वादिष्ट पदार्थ मिळणार आहेत. तरी या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन ही त्यांनीं केले.
सदर रत्नाई मिठाई वाटप केंद्र मारुती मंदिराजवळ, शंकरनगर येथे आहे. दि.५ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२३ या काळात सकाळी १०.०० ते रात्री ८.०० या वेळेत सुरू राहणार असून या केंद्रात चिवडा, लाडू, बालुशाही, शंकरपाळी व शेव इत्यादी फराळाचे पदार्थ किफायतशीर दरात उपलब्ध होणार आहेत. हे पदार्थ स्वच्छ व उच्च दर्जाच्या साहित्यापासून बनवलेले आहेत. या केंद्रातील पदार्थांचे प्रती कि.ग्रॅ. प्रमाणे दर चिवडा -रु २३५./-, लाडू- रु.२४५/- , बालूशाही -रु.२४५/- , शंकरपाळी- रु.२३५/- , शेव -२३० / – असे किफायतशीर दर ठेवण्यात आले आहेत. मिठाईच्या मागणीसाठी नामदेव कुंभार- ९५११८०८००४, जयंतराव माने देशमुख – ७७२००६७८२, शिवाजीराव पारसे ८३२९५९००६५, बाळासाहेब सावंत – ९९६०१९५८३९ यांच्याकडे नोंदणी करण्याचे आवाहन मंडळाचे सचिव बिभीषण जाधव यांनी केले आहे. तरी याचा लाभ सर्वांनी घ्यावा व दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास पांडुरंग (तात्या) एकतपुरे, उत्कर्ष शेटे, मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, संचालक बाळासाहेब सावंत, रामचंद्र मिसाळ, संजय झंजे, विशाल लिके, राहुल गायकवाड, खजिनदार सुहास थोरात, फिरोज तांबोळी, मल्हारी घूले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी केले व आभार प्रताप तोरणे यांनी मानले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button